बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मायबोलीकरांच गटग २००९

Submitted by झक्की on 10 April, 2009 - 12:19

हा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्‍या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा राज्यातून येणार आहोत, ते इथे लिहावे.

जमल्यास सगळे जण थोड्या वेळासाठी तरी एकत्र येऊन एकमेकांना भेटू अशी माझी इच्छा आहे.

पहिले नाव माझे. आनंद म्हसकर (झक्की) व सौ. हेमा (ही बहुधा माझ्याबरोबर सार्वजनिक जागी नसते, तेंव्हा मायबोली च्या लोकांना भेटणार नाही)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रिया, तु कबुल केल्याप्रमाणे वृत्तांत लिहिशीलच; पैठणी, डीझायनर साड्या, दागिने, मेनु ई. सगळ्या डीटेल्ससह

>>>>

श्या:, अखेर **का त्या **काच !!

आज 'सकाळ'मध्ये बीएमएमची बातमी आलीये चक्क! त्यात अजून चक्क म्हणजे 'मायबोली.कॉम' आणि 'कानोकानी'चा उल्लेख आहे! कोणी बातमी दिली होती का? समीर? हे प्रिन्ट एडीशनमध्ये. ईसकाळवर असेल तर लिन्क देईन.

बाकी, धमाल करा. त्यांच्या ड्रेसकोडप्रमाणे कोणी कोणती साडी कधी नेसली होती, तेही सांग सुप्रिया Wink
विनय, संदीप, हाशु. कसा झाला कार्यक्रम हेही सांगा नंतर..
आणि अर्थातच एवेएठिचा वृही लिहा Happy
-------------------------
God knows! (I hope..)

ती बातमी श्री. झुलेलाल यांनी लिहिली आहे.. Happy

पत रखियो मेरी झूलेलालन....

सिन्दडीदा सेवणदा...

सखी शाहबाज कलन्दर..

सर्वांना शुभेच्छा.. कार्यक्रमाचा आनंद लुटालच.. संदीप आणि विनय ह्यांचा कार्यक्रम यशस्वी होवो..

धन्यवाद... नंतर सहनुभुतीची अपेक्षा आहेच Lol

विनय Happy
---------------------------------
* आलात तरच हसाल *

विनय, समीर, लालु (गोंधळ घालणार आहे नं? )कार्यक्रमासाठी शुभेच्छा Happy

बाकी सगळे माबोकर, भरपुर मजा करा. चांगल-चुंगल खा-प्या. छान छान कपडे घालून मिरवा. Happy
नंतर फोटोसहीत वृत्तांत येउ दे. Happy

विनय, संदीप, समीर, लालु.... सगळ्यांना शुभेच्छा!!
सर्वांनी व्हिडिओ शूट करुन ठेवा कार्यक्रम... नंतर आम्हाला कधीतरी बघता येतील... Happy

सर्व कलाकारांना शुभेच्छा आणि अधिवेशन, गटग कसे झाले ते जरूर कळवा लोकहो Happy
झुलेलाल, मस्तच !

    ***
    Assume there is something witty and creative here.

    ह्या अधिवेशनाचे लाईव्ह प्रसारण झग्मग वर चालु आहे. www.zagmag.net

    अरे वा! महागुरु धन्यवाद! तो अमोल बावडेकर दिसतोय आत्ता चालू असलेल्या नाटकात. Happy

    हे नाटक अधिवेशनात चालु आहे का नाही माहित नाही.
    थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार ह्या नाटकाचा कुठे उल्लेख नाही.

    त्या थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटलंय ना २ ते ४ "अवघा रंग"? तेच असणार हे! चला मी विंबल्डन पहायला जातो परत. Proud

    ओह ..धन्यवाद

    बरोबर ... तेच नाटक तोच कलाकार...

    गटग अजून चालूच आहे.. टूकटुक..

    विनय Happy

    ऊद्धव ठाकरेंनी लल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लई बोर केलं...........
    --------------------------------------------------------------------------------
    भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

    शिववडा न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियात आणा असं म्हणाले शेवटी! Proud (मी तेवढाच भाग पाहिला!)
    आशाचा कार्यक्रम दाखवणार नाहीयेत का झगमगवर? Sad

    कसा वाट्तोय आशा भोसलेचा प्रोग्रॅम?

    हुश्श्य्...आत्ता पोहोचले घरी.

    मैतर, शेवतींचे बन, भीमराव पांचोळे, आणि विश्वनायिका....आवडलेले कार्यक्रम.
    जरा उशीर झाला यायला तर विनयनी 'उभ्या उभ्या'चे दारच लावून घेतले. त्यामुळे तो मिस झाला.
    बाकी सवडीने. Happy

    मलमली तारूण्य फारच खरखरीत झालं...पुढचा कार्यक्रम दाखवलाच नाही.
    --------------------------------------------------------------------------------
    भिंतीला कान असतात आणि पाठीला डोळे!!!

    उद्धव ठाकरेनी 'भगवा विधानसभेवर फडकवणे हे माझे पुत्रकर्तव्य आहे ' असे बी एम एम मधील भाषनात सांगितल्याचे वाचले. बी एम एम मध्ये हे सांगण्याचे कारण काय? समोर माणसे दिसली की सुरू यांचे पुराण! बोलावणारांनाच कोणाला बोलवावे हेच कळत नाही असे दिसते....

    बमम झाले. खूप काही चांगले बघायला, ऐकायला आणि खायला मिळाले. त्यात काही गोष्टी खटकल्या. 'सुधारणा' कश्या करता येतील याची एक यादी करून त्यांच्या मंडळाला पाठवता येईल (केदार तर्फे) त्याना वाटलं तर ते त्या अंमलात आणू शकतील...

    (वॄतांत तर येईलच).

    विनय Happy

    Lol पाठवा यादी. शिकागोत काळजी घेउ. Happy

    झक्की तिकडे आलेल्या आणि गटगला भेटलेल्या आपल्या माबोकरांची यादी करणार होते.
    ती मी देते. अजुन कोणाला भर घालायची असेल त्यांनी घाला

    बृ. म.म. ला माबो ए.वे.ए.ठि. ला हजर असलेले माबोकर

    बोस्टन - अजय, अश्विनी
    न्यु जर्सी - झक्की, विनय देसाई, अनिलभाई, स्वाती आंबोळे
    फिलाडेल्फिया - शोनू
    डी. सी. - लालू, रुनी
    वेस्ट कोस्ट (थोडक्यात चुकीच्या किनार्‍यावरुन :फिदी:) - एस व्ही समीर, सुप्रियाजे, व्ही पुराणिक

    व्हि पुराणिक ह्यांचा सकाळ मधे लेख आला आहे का???

    मी पण ऑर्कुटवर टाकलेत फोटो...

    झक्कास गं . अत्ताच पहात होते. मायबोलीकरीणींनी तो ड्रेस कोड अगदी मनापासून पाळलेला दिसतोय Happy

    Pages