Submitted by झक्की on 10 April, 2009 - 12:19
हा बातमी फलक उघडण्याचे कारण असे की, जे मायबोलीकर बृहन्महाराष्ट्राच्या फिलाडेल्फिया येथे जुलै २, ३, ४, ५ - २००९ या दिवशी भरणार्या अधिवेशनाला येणार असतील त्यांनी आपली नावे, आपल्याबरोबर कोण कोण असतील, तसेच कुठल्या गावाहून किंवा राज्यातून येणार आहोत, ते इथे लिहावे.
जमल्यास सगळे जण थोड्या वेळासाठी तरी एकत्र येऊन एकमेकांना भेटू अशी माझी इच्छा आहे.
पहिले नाव माझे. आनंद म्हसकर (झक्की) व सौ. हेमा (ही बहुधा माझ्याबरोबर सार्वजनिक जागी नसते, तेंव्हा मायबोली च्या लोकांना भेटणार नाही)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>रजीस्ट्रे
>>रजीस्ट्रेशन असल्यास सगळे कार्यक्रम,आशा भोसले यान्चा कार्यक्रम वगळत, मोफत आहेत का?
हो, आदल्या दिवशीचा आशा भोसलेंचा कार्यक्रम वगळता, अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासून जुलै ३ पासून ते जुलै ५ पर्यंतच्या कार्यक्रमांचा रजिस्ट्रेशन फीमध्ये समावेश आहे.
>>रजीस्ट्रेशन न करता फक्त कार्यक्रमाण्चे टिकिट मिळेल का?
नाही. तुमच्या कुटंबातल्या एका तरी व्यक्तीने रजिस्ट्रेशन केले असेल तर मात्र उरलेल्या कुटंबियांना फक्त आदल्या दिवशीचे (आशा भोसले) तिकीट मिळू शकते.
["कार्य
["कार्य सिद्धिस नेण्यास श्री समर्थ आहे"
असे मला तरी त्यांच्या वेबसाईटवर कुठे दिसले नाही. कदाचित् ते सगळेच कार्य सिद्धीस नेण्यासाठी प्रचंड मेहेनत घेत आहेत, (ते सुद्धा पैसे न घेता, हे महत्वाचे) तर श्री. कशाला?
शिवाय मी स्वयंसेवकांच्या यादीत आहेच.
एकंदर पैसे देऊन न का होईना, पण सर्व महाराष्ट्रियांच्या मनात, अमेरिकेत व भारतात व इतरत्रहि लोकांच्यात उत्साह पसरलेला दिसून येतो. शक्य तितक्या लवकर सगळी माहीती (जसे कार्यक्रमांचे वेळापत्रक, जेवण बसून वाढणार, की आपण घ्यायचे? ताटे आधीच वाढून ठेवलेली की हवे ते वाढणार? इ. इ. ) बद्दल लोकांच्यात फार फार उत्सुकता आहे. काही लोकांना आश्चर्य वाटते, की अजून कसे काहीच सांगितले नाही?
पण लोकहो, जरा धीर धरा. हे सर्व पक्के ठरल्याबरोबर नक्कीच लोकांना कळवण्यात येईल. पण आधी ते सर्व नक्की व्हायला नको का? त्यासाठी अनेक लोकांसी संपर्क ठेवावा लागतो, विशेषतः भारतातून येणार्यां लोकांशी. त्यांचे व्हिसा मिळणे आधी महत्वाचे. त्यांची कार्यक्रमाबद्दल (वेळ, व्यवस्था इ.) संमति, या सर्व गोष्टी नक्की झाल्याशिवाय कसे प्रसिद्ध करणार?
बाकी जेवण वगैरे बद्दल लोकांना रास्त शंका आहे की पैसे तर घेतले, पण इतक्या लोकांची सोय करता येईल का? निरनिराळ्या वेळच्या संमेलनाचे अनुभव!
खरे तर त्या बाबतीत या कार्यकारी मंडळाचे करावे तितके कौतुक थोडे आहे.
अहो घरी दहा वीस लोकांची पार्टी असली तरी घरच्यांची काय तारांबळ उडते. स्वैपाक किती नि काय, बसायचे कुठे, प्यायचे पाणी, हात धुवायची सोय इ. मग हजारो लोक आले तर कसे करणार?
खरे तर श्रींचा धावा सर्वांनीच करावा.
मी पण
मी पण कार्यक्रमाला येतो आहे.
पहिल्याच दिवशी (३ तारखेला) रात्री जेवण्याच्या टेबलावर एकत्र भेटण्याची कल्पना कशी वाटते? साधारण त्या वेळेस इतर काही कार्यक्रम नसतात आणि सध्यातरी पहिल्या रात्री काही मोठा कार्यक्रम (जेवणानंतर दिसत नाही)
>> पण लोकहो,
>> पण लोकहो, जरा धीर धरा. हे सर्व पक्के ठरल्याबरोबर नक्कीच लोकांना कळवण्यात येईल.
धन्यवाद झक्कीकाका
वेगवेगळ्या कमिटींमधले स्वयंसेवक आपापला वाटा उचलून सगळी माहिती पुरवण्याचा कसोशीने प्रयत्न करतायत. अधिवेशन अगदी दोन आठवड्यांवर आलंय त्यामुळे कामंही वाढायला लागली आहेत
सगळ्यांनी
सगळ्यांनी ते जेवणाचं पॅकेज घेतलंय का ?मागच्या अधिवेशनाचे अनुभव ( स्वतःचे व ऐकीव) जमेस धरता मी तरी रेडिंग टर्मिनल मार्केट किंवा चायना टाउनमधेच जेवणार आहे सर्व दिवस.
शोनू, Seattle
शोनू, Seattle च्या अधिवेशनाला अप्रतिम सोय होती जेवणाची.... so we have opted for the food package.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
आमचा २००७
आमचा २००७ (सिअॅटलचा) अनुभव खुपच चांगला होता. दुसरा मुद्दा हा की एवढं वैविध्यपूर्ण मराठी जेवण सोडून सॅन्डविच किंवा चायनीज का खा?
अगदी अगदी
अगदी अगदी पुरणपोळ्या की जिलब्या होत्या मागे एका बीएमएमला म्हणे..
सगळे कार्यक्रम म्हणजे कुठच्या म म ने काय कार्यक्रम केला तो आणि प्रत्येक दिवसाचा तिन्ही-चारी वेळचा मेन्यू तेवढा टाका,
आणि मायबोलीवर 'ऑखो देखा हाल' साठी कोण काय 'कव्हर' करणारे ते ठरवा आधीच आपापसात
पहिल्या
पहिल्या दिवशी सकाळी ओपनींग डे परेड आहे. मुलांना ९ वाजता परेडला सोडलं की ३५ ते ४० मिनीटांनी पिकअप करायचे आहे. तेंव्हा भेटता येईल हवं तर. जर काही लोक जेवायला बाहेर जाणार असतील तर हा एक ऑप्शन आहे.
पहिल्या
पहिल्या दिवशी परेडच्या वेळी भेटायची अश्विनीची आयडिया चांगली वाटतीय.
नमस्कार, रि
नमस्कार,
रिचमोन्दहुन मी श्वेता आणि माझा नवरा राकेश येणार आहोत.
नमकार
नमकार मंडळी:
संमेलनाला येणार्यांची यादी खालीलप्रमाणे:
आनंद (झक्की) व हेमा म्हसकर
समीर सरवटे (svsameer) व सुप्रिया जोशी (supriyaj) ------ कॅलिफोर्निया हून
विनय व योगिनि देसाई
मेधा पै (शोनू)
रुपाली (रुनि) व नितीन
संदीप चित्रे
आश्विनी (आश्विनि), नितीन व २ मुले.
पुलस्ति यांच्या मातोश्री
वैभव पुराणिक (vpuranik)------ कॅलिफोर्निया हून
अजय
श्वेता(श्वेता२५) व राकेश ----- रिचमंड हून
कुणाचे नाव राहिले असल्यास राग मानू नये. नजरचूक असेल. आपणहून यादीत नाव लिहा.
काही वाईट नाही.
काय हो.. मला
काय हो.. मला विसरलात....
- अनिलभाई
It's always fun when you connect.
आमचा
आमचा कार्यक्रम 'उभ्या उभ्या विनोद' तिसर्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे ९ वाजता आहे. तरी सकाळी सकाळी उठून (ब्रेकफास्ट चुकला तरी) डोळे चोळत, विनोद ऐकायला येऊन सहानुभुती दाखवावी
विनय
फिलीच्या
फिलीच्या बीएमएमचा गोंधळ मांडिला
गोंधळ मांडिला न देवा गोंधळाला यावे sss
हटकेश्वरा sss गोंधळा यावे
LA च्या सुप्रिये गोंधळा यावे
फिलीच्या शोनूआई, डिसीच्या रुनीदेवी, बोस्टनच्या अश्विनी गोंधळा यावे...
गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे
उदे उदे उदे उदे.....
-------------
(परेडच्या वेळी सकाळी मला जमणार नाही, डिनरच्या वेळी भेटायची अजयची आयडिया मला आवडली. नंतर कार्यक्रम नसेल तर गप्पा मारायला वेळ मिळेल.)
>> आमचा
>> आमचा कार्यक्रम 'उभ्या उभ्या विनोद' तिसर्या दिवशी भल्या पहाटे म्हणजे ९ वाजता आहे.
विनय,
आमचा "माझी माय सरोसती" त्याच दिवशी ९:३० ला आहे. त्यामुळे एका जागी असून देखील तुमचा कार्यक्रम मला बघता येणार नाही.
पुढचे
पुढचे अधिवेशन (२०११) शिकागोला मिळाले आहे. (अजुन जगजाहीर नाही झाले, पण मी असाच गौप्य की काय म्हणतात तो स्फोट करतो. अगदीच राहवत नाहीये.) ह्या अधिवेशनात निमत्रंनाचा एक व्हिडीओ पाहयाला मिळेल. त्यात अस्मादिक पण आहेत.
(काही लोकांनी अगदीच काकाचा लग्नाला यायचं हं, टाईप निवेदन केल आहे.)
विनय , मी
विनय , मी नक्किच तुमचा प्रोग्रॅम पाहायला येईन, मला LA च्या musical मध्ये ईंटरेस्ट नाही:)
लालु, तु केलेला गोंधळ मात्र चुकणार आमचा.. परतिचा flight आहे ४ चं: (
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
२
२ तारखेच्या कार्यक्रमाचे जेवण आम्ही घेतलेले नाहीये. फक्त आशा भोसलेच्या कार्यक्रमाचे घेतलय, तर नुसते आत सोडणार का ते आम्हाला तुम्हा सगळ्यांना भेटायला. परेडच्या वेळी मला जमेल. इतर वेळी (जेवणाच्या सुट्टीत) जमणार असेल तर तेव्हाही चालेल मला.
रुनी, २
रुनी,
२ च्या डीनरला बहुतेक कोणच नसणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे ३ च्या रात्री भेटूया. परेडच्या वेळी जरा कठीणच दिसतय.
केदारभाऊ,
अभीनंदन.. म्हणजे आता २०११ला शिकगो भेट.
ओह म्हणजे
ओह म्हणजे ३ च्या डीनरला भेटायचय का, चालेल ३ आणि ४ या दोन्ही डीनरला भेटता आले तरी उत्तम.
आनंद
आनंद (झक्की) व हेमा म्हसकर
समीर सरवटे (svsameer) व सुप्रिया जोशी (supriyaj) ------ कॅलिफोर्निया हून
विनय व योगिनि देसाई
मेधा पै (शोनू)
रुपाली (रुनि) व नितीन
संदीप चित्रे
आश्विनी (आश्विनि), नितीन व २ मुले.
पुलस्ति यांच्या मातोश्री
वैभव पुराणिक (vpuranik)------ कॅलिफोर्निया हून
अजय
श्वेता(श्वेता२५) व राकेश ----- रिचमंड हून
अनिलभाई (बा. रा. तून)
वैशाली राजे (लालू)
अजून कुणि? ३ च्या डिनरला सर्वांनी एकत्र बसण्याची कल्पना कशी आहे? एकमेकांना साखळी पद्धतीने फोन करून भेटण्याची वेळ व जागा ठरवावी. माझ्याजवळ सुप्रियज व लालू यांचे नंबर आहेत. माझा नंबर ८६२-२२२-३१०५.
चालेल,
चालेल, माझ्याकडेपण लालू, समीर, शोनू यांचे नंबर आहेत.
आणि तुमचा
आणि तुमचा नंबर कुणाकडे??
आणि कुणाला आपले नंबर द्यायचे असल्यास, वरील यादीतील कुणालाहि मा. बो. वरून मेल करून कळवा. धन्यवाद.
अहो झक्की
अहो झक्की ज्यांचे नंबर माझ्याकडे आहेत त्या सगळ्यांकडे माझापण नंबर दिलेला आहे.
३ च्या
३ च्या डिनरला एकत्र भेटायला बहुतेकाना जमेल असं दिसतंय तेंव्हा भेटूयात. (हे पक्कं.)
ज्याना हे जमणार नसेल त्यानी कृपया इथे लिहिलंत ते असे किती जण आहेत हे कळेल आणि त्या दृष्टीने शक्य असेल त्याना परत एकदा भेटण्यासाठी जमवता येऊ शकेल. उदा. ४ तारखेला संध्याकाळी ७ ते ७:३० वाजता आनंदीबाई हॉलच्या समोर. (हे कितीजण असे आहेत त्यावर ठरवूया).
चांगली आहे
चांगली आहे सूचना!:)
सगळ्यांना
सगळ्यांना कार्यक्रमासाठी भरघोस शुभेच्छा

आमच्या कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश मराठे आणि स्वाती मराठे पण येणार आहेत कार्यक्रमाला
म्हणजे
म्हणजे याचे नाव जागतिक महाराष्ट्र संमेलन ठेवले पाहिजे.
काय मज्जा. सगळे जगातले महाराष्ट्रीय एकत्र!
अधिवेशनास
अधिवेशनासाठी ड्रेस कोडः
माझ्या एका मैत्रिणीला आलेली ईमेल. याचे पालन करणे बंधनकारक नाही. परंतु, माहितीसाठी इथे पोस्ट करत आहे. ईच्छा असल्यास करू शकता.
Fri July 3rd:
Lunch (Peshwaai): Paithani saadi with nath and all (or nauwari will also be fine!!)
Dinner (Kolhapuri): Green saadi (with kaath-padar, similar to "irkali) wtih kolhapuri "saaj" and all
Sat July 4th:
Lunch (Nagpuri): Shaalu (lagnaacha shalu waparla jaat naahi na...mhanun: -))
Dinner (Malwani): Since its July 4th, we have decided to wear saree in the American or Indian flag colors: Blue (navy blue), red (blood red), White, Green (bottle green), or Orange (like the orange in the flag). Try to wear a monotone color saree so that the theme is visible. The saree can be a designer saree or traditional marathi saree like narayan peth etc. We would like maximum participants for this so that the theme is obviously visible.
Pages