कंपु

Submitted by पद्म on 21 August, 2019 - 03:04

मागील काही दिवसांपासून अनेक धाग्यांमध्ये त्याचप्रमाणे त्यावरील प्रतिसादांमध्ये कंपू/कंपु हा शब्द वाचायला मिळाला. पण काही केल्या अर्थ कळत नाहीये.
या कंपुमुळे सध्या माबोवर खळबळ माजलीय असे दिसतेय...
कृपया या कंपुबद्दलचे तुमचे विचार कळवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका संस्थळा/व्यक्ती बद्दल जे आक्षेप असतील ते त्याच संस्थळा वर/व्यक्ती सोबत बोलावेत, अन्य ठिकाणी चर्चा करु नये. हे आपलं माझं मत.>>>>>>> मीही याचं मताची आहे. पण तिकडे कोणी आहे का तक्रार ऐकून घेणार?

अमर ने उल्लेख केला मिपा चा तेव्हा कळाले की मिपाचे काही अजून लोक इथे आहेत. काही सेम आयडी वाले पण दिसले. म्हणून उल्लेख केला. बाकी मिपा साइटवर वाचक म्हणून गेले तर वाचायला मजा येते. लेखक म्हणून मात्र......! असो! तुम्हाला माहिती आहेच. Happy

" गोकुळातील कृष्ण आणि त्याच्या गोपी" यांचा कंपू बराच काळ धाक निर्माण करुन होता. >>>>
How cute.... How lucky that person was!!!!
Lol

. How lucky that person was!!!!
Lol

नवीन Submitted by महाश्वेता on 22 August, 2019 - 07:19
>> पण नंतर त्याचं Bad luck सुरू झाले आणि गोपी पण साथ सोडून गेल्या. मधुन मधुन त्या कृष्णाची आठवण काढत "परत ये ना कान्हा " असे आळवत आपलं प्रेम वरवर दाखवत होत्या बरं.

पण नंतर त्याचं Bad luck सुरू झाले आणि गोपी पण साथ सोडून गेल्या. मधुन मधुन त्या कृष्णाची आठवण काढत "परत ये ना कान्हा " असे आळवत आपलं प्रेम वरवर दाखवत होत्या बरं.>>>>
इतना जलना ठीक नही!!
Rofl

मिपा साइटवर वाचक म्हणून गेले तर वाचायला मजा येते. लेखक म्हणून मात्र....>>> <ओहह, असे आहे तर, म्हणजे दुसऱ्या कुणाच्या लेखनाची टीका वाचायला मजा येते, पण तसेच प्रतिसाद आपल्या लेखावर त्रास देतात Proud

साला मैं ऐसेच हवामे गोळ्या मारता हूं, लेकीन वो डायरेक निशानेपर जाकर लगती हैं ये देक्कर मैं अपनी नेम्बाजीपर खूस होता हूं.

<ओहह, असे आहे तर, म्हणजे दुसऱ्या कुणाच्या लेखनाची टीका वाचायला मजा येते, पण तसेच प्रतिसाद आपल्या लेखावर त्रास देतात Proud
>> अगदी अगदी अस्संच आहे बघा.

अमर, vb, किती तो एकांगी विचार Lol
वाचक म्हणून तुमच्या सारखे प्रतिसाद वाचत नाही बसत मी. लेख, कविता, कथा वाचते. ते साहित्य उत्तम दर्जाचे असते. म्हणून मजा येते.

ओहह, तर हे ही एकांगी विचार वाटले का तुम्हाला?

मग अर्धवट अर्थाचे वाक्य का लिहिता? तसेही एकांगी विचार कोणाचे ते चांगलेच लक्षात आलेय, असो ,

Vb, का उगाच वाकड्यात शिरताय?

ते तुमच्या साठी नव्हतेच लिहिलेले वाक्य की पूर्ण लिहावे लागेल आणि मगच कळेल.

हलके घ्या जरा.

का उगाच वाकड्यात शिरताय?>>> मी कशाला वाकड्यात शिरू, रच्याकने तुमचा वरचा प्रतिसाद तुम्हालाही लागू पडतो.

अन हो, इकडे जे लिहिले जाते ते वाचून काही लिहावेसे वाटले की ते वाकड्यात शिरणे होते का?
काहिही

माझे वाक्य लिहून त्यावर प्रतिसाद लिहिला म्हणल्यावर तो मलाच उद्देशून असतो. असो. तुम्हाला वाद घालायला आवडते असे दिसते.

चर्चेला / वादाला माझा पूर्णविराम!

Happy

मला काय आवडते ते जाऊ द्या, पण आता माझी खात्री झाली आहे की तुम्हाला नक्कीच वाद आवडतात, जर मला वाद घालायचेच असते न तर हा धागा कशाला, तुमचा महाभारताचा धागा बेस्ट आहे की Proud

तुमच्याच धाग्यांवरचे नकारात्मक प्रतिसादांना तुम्ही दिलेली उत्तरे वाचा , मग कदाचित तुम्हाला कळेल की वाद करायला कुणाला आवडते

हो सुपु..... vb आणि अमर करतात ती कंपुगिरी नाही बरं का. आपण काही लिहिले की लगेच कंपुगिरीचा शिक्का !

चालू द्या तुमचे, मी आता इकडे माझा वेळ वाया घालवणार नाही, मला जे बोलायचे ते मी लिहिले सो झाले

अन हो, मी माझ्या शब्दावर ठाम असते, तुमच्यासारखी हेमशेपो, बास झाला वाद , मी आता परत लिहिणार नाही करत परत परत तिथेच पडीक अन वाद घालत नाही बसत

पद्म, थोडक्यात का होईना पण उदारणासाहित स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झालाय ह इथे Rofl
नेक कंपू माबोवर उदय पावले व अस्तंगत झाले. एक कंपू गेला की दुसरा येतो. आता ताई आणि ताईचे गुंड भाऊ ( पिलावळ) हा कंपू नुकताच उदयास आला आहे >>>हल्ली इथले प्रतिसाद वाचन कमी झालंय त्यामुळे माझा अभ्यास कमी पडतोय,खूप विचार करून पण कळेना झालय नवा कम्पू कोणता ते

आई ग.....खूप खूप धन्यवाद,समिधा
प्रतिसाद म्हणजे निसता धुरळा आहे जणू Rofl
भरत यांचे प्रतिसाद वाचून अक्षरशः फुटले

ईथे तर कंपुची थेअरी तर झालीच..
नंतर प्रॅक्टीकलसुद्धा भारी झालेत...
आता कंपुबद्दलच्या कन्सेप्ट्स कधीच नाही विसरणार!

झालं ! आता परत प्रतिसादांना पूर येणार !
Lol>>>> मधुरा, बघ नाही आला पूर
तूच पूर आणत होतीस, तुझें प्रतिसाद थांबले पूर थांबला, इकडे आणि तिकडे तुझ्या धाग्यावरपन्

नंतर नंतर कंपूबाजी चा ही कंटाळा येतो . पण समानशीले व्यसनेषु सख्यं या उक्ती प्रमाणे कंपू होत असतात . नंतर त्या खेळण्याचा कंटाळा येत असतो नवीन खेळण शोधाव लागतंय

<<< नंतर नंतर कंपूबाजी चा ही कंटाळा येतो >>>
सहमत. कंपूबाज आणि ड्यु. आयडीच्या नावाने सतत गळे काढणाऱयांचा पण आता कंटाळा आला आहे. बोलणाऱयांना बोलू द्यावे पण स्वतः गप्प बसावे, हे का करत नाहीत सर्वजण? शेवटचे वाक्य माझेच पाहिजे, या अट्टाहासापायी नको ते वादविवाद होतात.

कठीण समय येता' कंपु 'कामास न येतो. एखादा आयडी उडणार हे दिसताच कंपूकर आम्ही त्या गावचेच नाही हे बेमालूमपणे दाखवतात. ते पाहून फार्फार मनरंजन होते हो माझं.

बापरे! खरंच मला हे सगळंच नवीन आहे.
ही माझी पहिली सोशल साईट होती. आता काही लिहावंसं वाटणार नाही.
पद्म, हा धागा काढल्याबद्धल धन्यवाद!

ही माझी पहिली सोशल साईट होती. आता काही लिहावंसं वाटणार नाही.>>>असं नका म्हणू हो,व्यक्ती तितक्या प्रकृती असणारच न,असे काही होईल म्हणून भीतीने आधीच लिखाण करणारच नाही असा पवित्रा घेऊ नका,rather असा अनुभव आला तरीही लिखाण कोणी थांबवू नये

आदू... .. प्रेमळ सल्ल्यासाठी मी तुमची आभारी आहे.
मी कोणी नामवंत नाही. इतक्या गर्दीत पुढे येण्याची धडपडही करावीशी वाटत नाही. लेखन हा माझ्यासाठी सृजन सोहळा आहे. आपल्या निर्मितीतून आपल्याला आनंद मिळतोच पण तो इतरांनाही देता आला तर द्विगुणित होतो इतकंच ! प्रतिसाद म्हणजे त्याची पोचपावती वाटते मला. तो निर्भेळ असावा असं वाटतं. नाहीतर हल्ली सगळीकडेच खऱ्या खोट्यातला फरक कळेनासा झालाय.आणि हे तर आभासी जग आहे.... मनात खोट आली तर लिखाणात सच्चेपणा कसा येणार? म्हणून वाटलं तसं...

लेखन हा माझ्यासाठी सृजन सोहळा आहे. आपल्या निर्मितीतून आपल्याला आनंद मिळतोच पण तो इतरांनाही देता आला तर द्विगुणित होतो इतकंच ! प्रतिसाद म्हणजे त्याची पोचपावती वाटते मला. तो निर्भेळ असावा असं वाटतं. नाहीतर हल्ली सगळीकडेच खऱ्या खोट्यातला फरक कळेनासा झालाय.आणि हे तर आभासी जग आहे.... मनात खोट आली तर लिखाणात सच्चेपणा कसा येणार? म्हणून वाटलं तसं...>>>>>>>>>>>>>>>>> हे खूप गोड आणि नेमके लिहिले आहेस.

Pages