कंपु

Submitted by पद्म on 21 August, 2019 - 03:04

मागील काही दिवसांपासून अनेक धाग्यांमध्ये त्याचप्रमाणे त्यावरील प्रतिसादांमध्ये कंपू/कंपु हा शब्द वाचायला मिळाला. पण काही केल्या अर्थ कळत नाहीये.
या कंपुमुळे सध्या माबोवर खळबळ माजलीय असे दिसतेय...
कृपया या कंपुबद्दलचे तुमचे विचार कळवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कंपुगिरी म्हणजे समविचारी, सम आवड असलेल्या आयडींनी एकमेकांची पाठराखण करणं. कधी कधी एकच आयडी अनेक आयडी काढून आपल्या पोस्ट ला अनुमोदन देतो व विरोधी लोकांना झापणारे प्रतिसाद देतो. अशावेळेस कंपूगिरी आहे असे वाटते.

धन्यवाद अमर!

रश्मी, सध्य परिस्थिती पाहता तुमच्याशी सहमत आहे!

अक्कु, तुझा प्रतिसाद का काढलास? कळू दे की तुझा विचार सुद्धा..!

कंपुगिरी ओळखायचं म्हणजे कंपूतील प्रत्येक आयडीचे स्वतंत्र लेखन असते. एकमेकांच्या लेखनाची वाहवा हे करत असतात. विरोधकांना पोटदुखी झाली असे लिहितात.
जर एखाद्या लेखाला पहिलाच प्रतिसाद खूप शाबासकी देणारा असेल ,याच आयडीचे पुढचे प्रतिसाद लेखकाची बाजू जोरकसपणे मांडणारे असतील तर ड्यु आयडी आहे हे सहज लक्षात येते.

जर एखाद्या लेखाला पहिलाच प्रतिसाद खूप शाबासकी देणारा असेल ,याच आयडीचे पुढचे प्रतिसाद लेखकाची बाजू जोरकसपणे मांडणारे असतील तर ड्यु आयडी आहे हे सहज लक्षात येते.>> बहुत सही फ़रमाया जनाब आपने तो। ओर ऐसे वाक़ियात मैंने खुद यहा कई मर्तबा देखे है। कोई कुछ लिखता है जो कभी कभी दखल लेनेके काबिल भी नही होता फिरभी जैसेही पब्लिश होता है वहा चार पाँच तो कमेंट आही जाते है।

ड्युआयडी ह्या विषयावर गहण अभ्यास आहे वाटतं तुमचा.

Submitted by सुपु on 21 August, 2019 - 04:16
फक्त याच नाही तर पुर्ण माबोचा दोन तीन वर्षांत अगदी बारीक अभ्यास केला आहे. माझे निष्कर्ष इथे लिहिले तर कोणीच मोठ्या मनाने मान्य करणार नाहीत. असं काही नसतं हेच म्हणतील म्हणून मी ते सांगत नाही. अगोदर लोक विपू करून कंपूतील लोकांना सुचना करायचे पण इतर सुध्दा पाहू शकतात हे कळल्यावर संपर्कातून मेल करतात.

पद्म, कंपुगिरी आणि डुआयडी हे वेगवेगळे issues आहेत.
कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एकदा मिपावर फेरफटका मारून ये.
Well, I won't suggest that you should do it.
तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट. त्यामानाने मायबोली वर अजून हे जास्त पसरलेलं नाहीये.

कंपुगिरी सहसा चांगल्या हेतूने होत नाही. Those who sums up only to show someone down, are part of this.

एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण किंवा एखाद्याला आपल्या मर्जीने सहमती दाखवत मत मांडणे, त्याच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देणे, एखादं लेखन आवडून त्याला भरभरून प्रतिसाद देणे याला कंपुगिरी म्हणत नाहीत.

गटबाजी, झुंडशाही असे याचे शाब्दिक अर्थ आहेत.

काँलेजमध्येपण आमचा 15 16 जनांचा कंपु आहे. आपल्या लोकांच्या मदतीकरीता सगळे तत्पर असतो. got it.

अजुन एकदा एडिट करावा लागणार ! मधुराताई.
कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एखादा मिपावर फेरफटका मारून ये

एकदा मिपावर फेरफटका मारून ये
(असे हवे ना)

कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एखादा मिपावर फेरफटका मारून ये. तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट.

नवीन Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 14:51

हे असं असताना तुम्ही मिपा वर का लिहिता?

अज्ञानी, बदल केला.

मयु, मला काहींनी मेसेज करून सांगितले की आम्ही वाचतो आहे, पोस्ट करत रहा.

राजकीय पक्षांच्या पाठीराख्यांचे कंपु असावेत. पण कार्यकर्ते भांडत बसतात आणि वरीष्ठ अचानक पार्टी बदलतात.

srd Lol Lol

जुन्या माबोवर होती की कंपुबाजी. लय भांडायचे ते लोक. त्यांच्या चौकटीत न बसणार्‍याला जाम शाब्दिक फटके हाणायचे, पण विरोधक पण लय भारी होते. ते पण कंबर कसुन यायचे आणी शाब्दिक बाण मारायचे. खरे तर मी त्या वेळी वाचनमात्र होते, म्हणजे रोमात होते. कधीतरी एकदा मी, ला आणी ला लावुन कविता केली आणी खोडुन पण टाकली होती. तोच काय तो माझा एक प्रयत्न होता. Proud

जुन्या माबोवर व्हि सी का काय म्हणून जे होते, त्यात पण हे लोक भांडायचे. मग कंपुबाजी, तलवार्बाजी, हाजी हाजी, जी जी रं जी पण दिसायचे. Biggrin

कंपू म्हणजे एकविचारी संघटीत सदस्यांची टोळी. एखाद्या जाल आयडीने गैरमार्गाने (स्वरूप आणि तपशील हवेत) अवैध,गैरवाजवी
प्रतिसादासाठी इतर सदस्यांचा अनिश्चेने पाठींबा मिळवून इतर प्रतिसादांची खिल्ली, हीनवणे आणि तत्सम प्रकारची कृती करून आपल्या प्रतिसादांंना वाहवा मिळवणारी जाlलीय टोळी म्हणजे कंपू. -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ता.क. वरील व्याख्याचा व्यावसायिक अथवा हौसेखातर उपयोग करायचा असल्यास खरड़ करून परवानगी घ्यावी व उचित श्रेयनिर्देश करावेत. धन्यवाद. Wink

-दिलीप बिरुटे
(जालीय बेटावर एकला निघालेला)

धन्यवाद सर्वांना!
कंपुबद्दलचे कन्सेप्ट्स क्लिअर झालेत...
लोकं खरंच व्हर्च्युअल लाईफ ईतकं सिरियसली घेत असतील, वाटलं नव्हतं... कंपुगिरीपेक्षा पॉझिटिवली काही लेखन केलं तर किती बरं होईल...!

कंपुगिरी जाणून घ्यायची असल्यास, एखादा मिपावर फेरफटका मारून ये. तिकडे अपमान पण करून मिळतो फुकट.

मधुराकाकू, हे मिपा काय असतं ?

-दिलीप बिरुटे
(उत्सुक)

डॉक्टर,
विपु. करते.
तिथे बोलू.

काही वेळा लेखक/ लेखिकेचे भक्त तयार होतात. आणि झापडे लावून "आमच्या देवस्वरूप लेखक/लेखिकेला कुणी वाईट लिहिले असे म्हणायचं नाही की विरोधात मत मांडायचे नाही" अशी छान भक्ती करतात. कुत्रं गाडीखालून चाललं की त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय. तसं या भक्त मंडळींचा कंपू करत असतो.

कंपुगिरीला तोंडावर पाडायचे असेल तर," सोशल मीडिया वर लिहिलेले फक्त आनंदासाठी लिहिले असे मानायचं आणि लाईक आणि कॉमेंट्स ची अपेक्षा करायची नाही."

शाब्दिक चकमकी वर्षभर झाल्यावर कधी भेटल्यावर आनंदाश्रु येत असावेत. हा तो आपला गट आणि तो पलिकडचा विरुद्ध. पण ववि बंद झाल्याने आनंदही गेला अन अश्रुही गेले असं झालं नाही ना?
(माझी ही एक कल्पना आहे/होती. ववि पाहिलेला नाही.) !!!%%%!!!

रच्याकने ववि काय आहे?
कंपुमध्ये ओढण्याची एक स्ट्रॅटेजी असते. कंपूतल्या लोकांनी भावनिक, छान छान प्रतिसाद नवीन बकऱ्याला/बकरीला लिहायचे. छान छान प्रतिसादांच्या उपकाराखाली बकरा/री दबली की मग आपसूकच पंखाखाली येतं. मग पटत नसलं तरी कंपू सोडून जात नाही.

रच्याकने ववि काय आहे?

ववि म्हणजे 'र्षा विहार'
बहुदा पावसाळी सहल असावी, मी माबोवर फारसा सक्रीय नसल्याने गेलो नाही.

मी जो धागा आवडेल त्या वर प्रतिसाद देते....कंपुगीरी मलाही आवडत नाही.
- ईथे कोण मोठे ५० एक ग्रंथ लिहिलेले महान लेखक आहेत. सगळे आपले सखे सोबती.
- एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण हे केव्हाही चांगले. पण आपणच आपले भारंभार ID काढून स्वतःच्याच धाग्यावर प्रतिसाद करत बसने चुकीचे आहे.

हा धागा खरंच चांगला आहे...भरकटू देऊ नका रे Wink Wink ..... बाकी चालू द्या... वाचतेय.

एखाद्याची योग्य कारणासाठी केलेली पाठराखण हे केव्हाही चांगले. पण आपणच आपले भारंभार ID काढून स्वतःच्याच धाग्यावर प्रतिसाद करत बसने चुकीचे आहे.+11111 siddhi

अज्ञानी, बदल केला.

मयु, मला काहींनी मेसेज करून सांगितले की आम्ही वाचतो आहे, पोस्ट करत रहा.

नवीन Submitted by मधुरा कुलकर्णी on 21 August, 2019 - 15:45

प्रतिसादा बद्दल आभार!

एका संस्थळा/व्यक्ती बद्दल जे आक्षेप असतील ते त्याच संस्थळा वर/व्यक्ती सोबत बोलावेत, अन्य ठिकाणी चर्चा करु नये. हे आपलं माझं मत.

इत्यलम!

" गोकुळातील कृष्ण आणि त्याच्या गोपी" यांचा कंपू बराच काळ धाक निर्माण करुन होता. राजकारण धाग्यांवर भाजपविरोधी कंपू माठ प्रतिसाद देण्यासाठी मशहूर आहे. गिरे तो भी टांग उपर असा या कंपुकरांचा अॅटिट्यूड आहे.

अनेक कंपू माबोवर उदय पावले व अस्तंगत झाले. एक कंपू गेला की दुसरा येतो. आता ताई आणि ताईचे गुंड भाऊ ( पिलावळ) हा कंपू नुकताच उदयास आला आहे व फॉर्मात आहे. सांभाळून रहा.

Pages