©वारसदार! - भाग ११ - जुनी कथा, नवीन वळण!

Submitted by महाश्वेता on 18 August, 2019 - 09:34

भाग १०

https://www.maayboli.com/node/70995

"नाही!" अनिरुद्धने थंडपणे उत्तर दिले.
अलीने थोड्यावेळ अनिरुद्धच्या डोळ्यात रोखून बघितले, आणि अचानक तो हसला.
"मुझे लगा, सालगावकरके परिवारमें कोई तो जिंदा है!"
इस्माईलची नजर अजूनही अनिरुद्धवर होती. आता त्याने अलीकडे मान फिरवली.
"अलिमिया, कौन था ऐ सालगावकर?"
अली हसला.
"इस्माईलभाई असिफ क्यू खतम हुवा?"
"आपने किया मियाँ."
"लेकीन मुमकीन कैसे हुवा?"
इस्माईल विचारात पडला.
"बहोत दिनोसे असिफकी कोई ड्रग्ज की डिलीवरी आई थी आपके पास?"
डोक्यात प्रकाश पडल्यासारखा तो म्हणाला. "नही भाई, क्योकी कोई और कम भावमें ड्रग्ज बेचने लगा, और असिफके धंदे पर ताला लग गया."
"असिफका सबसे बडा धंदा, धंदा खतम, असिफ खतम. वो कबसे कबर मैं था, और उसकी कबर किसने खोदी पता हैं?"
"किसने भाई?"
"सालगावकरने...."
त्याने व्हिस्कीचा एक पेग भरला, आणि तो सांगू लागला.
◆◆◆◆◆
गोवा, विदेशी पर्यटकांसाठी एक स्वर्ग, इथल्या समुद्राची नशा लिकरपेक्षा जास्त चढते...
मात्र गोवा स्वर्ग होता, ड्रग्जसाठी सुद्धा... जिथे पोलिसांनी सगळ्या राज्यांच्या नाड्या आवळल्या होत्या, तिथे गोवा मात्र ड्रग्जची राजधानी झाला होता. कोकेन, हेरॉईन, मेरीयूएना, एमडीएमए, मेथाफेटामाईन इ. गोव्यात राजरोस विकले जात. त्याकाळी गोव्याची ड्रग्जची दररोजची उलाढाल ७० लाखाच्या घरात होती.
तेव्हाच मी असिफच्या भावाला टपकावलं होतं. साला. त्याच्या राणीच्या घरात डोक्यात, इथे कपाळाच्या मध्ये तीन गोळ्या मारल्या होत्या मी. असिफचा भावावर अतोनात जीव. त्याने कबानाशी हातमिळवणी केली, आणि पिसाळलेल्या हत्तीसारखा तो माझ्या गँगच्या मागे लागला.
इस्माईलभाई, सव्वाशे लोकांची माझी गॅंग, आम्ही फक्त बावीस लोक उरलो. बाहेरून कुठेही मदत मिळत नव्हती. सगळी डोंगरी या अलीला शोधत देशभरात फिरत होती, आणि मी घुशीसारखा या बिळातून त्या बिळात लपत फिरत होतो.
...तेव्हा माझ्या बाजूने एकच माणूस उभा राहिला.
साळगावकर!!!
साळगावकर एक कोडं होतं, कि येडं होतं, अजूनही मला माहित नाही. दिवसातून एकवीसदा गणपती स्तोत्र म्हणणारा साळगावकर. चतुर्थीला एकवीस मोदक खाणारा, आणि २१ मिलीचे एका बैठकीत २१ पेग मारणारा. २१ ट्रक्सचा मालक, २१ बोटींचा मालक. एकवीसशी त्याची काय मैत्री होती, अल्लाला माहित. सकाळी न चुकता मंदिरात जाणारा आणि संध्याकाळी न चुकता बारमध्ये बसणारा. सगळी स्तोत्रे, ग्रन्थ तोंडीपाठ... सगळी पुराणे कोळून पिलेला. एखाद्याने काही चूक केली, तर त्याला जहन्नुम मध्ये काय सजा मिळणार हेही त्याला माहित होतं, साला चित्रगुप्तही यालाच सजा विचारत असावा...
त्या रात्री माझ्यामागे असिफची माणसे पिसाळलेल्या कुत्र्यासारखी लागली होती, आणि मी पळत होतो, उंदीर मांजराचा खेळ होता तो, आणि ते मला खेळवत होते.
मी रस्त्यावर ठेचकळून खाली पडलो. रात्रीची चौफुलीवर भयाण शांतता होती. त्या हैवानांनी बंदूक माझ्यावर ताणली...
...मी अल्लाला याद केलं इस्माईलभाई. माझं सगळं जीवन माझ्यासमोर येऊन गेलं. आयुष्यात एकदा हजला जायचं होतं, ती इच्छा अपूर्ण राहिली...
...तेवढ्यात भरधाव वेगाने एक ट्रक आला, आणि त्या हैवानांना चिरडून निघून गेला. माझ्या डोळ्यासमोर मी त्यांच्या शरीराचा लगदा होताना बघितलं. त्यांना अशी दर्दनाक मौत दिली त्या ट्रकने, की माझा आत्मा थरारून उठला.
लांबवर जाऊन तो ट्रक थांबला, आणि त्या ट्रकमधून पांढरा सफारी घातलेला माणूस उतरला...
...इस्माईलभाई, देवदूत असेल, तर तो तसा दिसला असता. भगवान शंकर था वो...
मी थकलो होतो, मी छिन्नविच्छिन्न झालो होतो, त्याने मला उठवलं, मला आधार दिला.
आम्ही ट्रकमध्ये बसलो, आणि तो ट्रक गोव्याच्या दिशेने निघाला.
गोव्याला पोहोचल्यावर त्याने आधी मला एका सुरक्षित बंगल्यात ठेवलं. माझ्यासाठी नविन कपडे आणले. बंगला खूप सुंदर होता, पर मुझे बंबई का याद आता था!
असाच महिनाभरानंतर तो बंगल्यावर आला.
"मला जाऊ दे..." मी उद्वेगाने म्हटलं.
"हे...हेच मला ऐकायचं होतं." महेश मला म्हणाला.
"अरे महिन्यापासून सांगतोय मी तुला."
तो हसला.
"हसतो काय?"
"महिन्याभरापूर्वी जेव्हा तू हे बोललास, तेव्हा तू प्रचंड क्रोधात होतास. त्या क्रोधामुळे तू स्वतःचीच हानी करून घेतली असतीस. जर तुला मी तेव्हाच मुंबईला पाठवलं असतं, तर असिफच्या तीन चार माणसांना मारून तुही स्वतः जन्नतमध्ये गेला असता.
कृष्णालाही जरासंधाचा सामना करताना पळाव लागलं, मग तू कोण रे?"
"मला बदला घ्यायचाय साळगावकर."
"नक्की घे, पण असिफला आता कुणीही मारू शकत नाही. आधी असिफच राज्य संपव, मग असिफला."
"कसं संपवणार, इथे बंगल्यात बसून?
साळगावकर हसला. "तुला काहीतरी दाखवतो."
आम्ही दोन्हीही गाडीत बसलो, साळगावकर कुठल्याशा जंगलात पोहोचला, आणि त्याने गाडी थांबवली.
"चल."
बराच वेळ आम्ही चालत होतो.
अल्ला कसम इस्माईलभाई, थोड्यावेळाने समोर जे दृश्य आलं, त्याने मला पागल बनवलं.
जगातलं प्रत्येक ड्रग बनवण्याची फॅक्टरी त्याने जंगलात उघडली होती.
"माझं ड्रग्ज असिफचा धंदा संपवेल, तोपर्यंत तू गॅंग बनव, आणि मग असिफला संपव."
या फॅक्टरीने असिफच्या नाड्या आवळल्या. असिफला पैसा कमी पडू लागला, शेपटी तुटलेल्या नागसारखी त्याची अवस्था झाली. जहापे असिफकी आवाज नही पहुचती साळगावकरका ड्रग जाता.
त्याने मला पाकिस्तानला पाठवलं, आणि त्यानंतर मी दुबईला गेलो. दुबईला राहून मी नवीन गॅंग बनवली, मुंबईची हुकूमत मिळवली, पण परत तसा दोस्त नाही मिळाला. भारतात आल्यावर सगळ्यात आधी त्याला भेटायचं होतं, पर उससे पहले उसने मौत को गले लगाया!
◆◆◆◆◆
गोष्ट संपवून अलीने पेग खाली ठेवला.
"भाई कैसे मौत हुई उनकी?"
"पागल था वो, एकदिन अपना पुरा गोडावून उसने बम से उडा दिया. सारे गोवामें आवाज गुंजी होगी उसकी... उसकी बिवी, बच्चे सब उसमे मर गये..."
अली हसला, आणि त्याने पेग खाली ठेवला.
"भारत का सबसे बडा ड्रग डीलर था मेरा दोस्त...
महेश भार्गव साळगावकर!!!!!"

©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त!!!!
पुढील भागाची प्रतीक्षा!

जबराट.......
पुढचा भाग कधी......

छान! पुढला भाग लवकर टाका! तुमचे प्रतिसाद कमी होऊ लागले आहे! दोन भागां मधील अंतर खुप आहे! >>> + १ उत्सुकता कमी होते खूप अंतर पडले की. अन विसरायला ही होते..

झकास!

perfect

गणेश गायतोंडे ची आठवण आली मला या भागात . Happy

नवीन Submitted by maitreyee on 18 August, 2019 - 22:54 > मला सेक्रेड गेम्स 2 पाहताना या लेखनशैलीची आठवण झाली होती ! Narration style मध्ये थोडे साम्य आहे.

महाश्वेता या प्रकारातलं मी पहिल्यांदा काहीतरी वाचतेय मायबोलीवर, आणि मला प्रचंड आवडतंय.
तुम्ही एक सिरीज लिहिताय असं वाटतंय, इतकी वेगात.
पुभाप्र!

पुलेशु!!!
लवकर लवकर येउ द्यात. अफाट लेखनशैली आहे. पण लवकर लवकरमध्ये दर्जा तोच राहू देत तेव्हा उगाच लगीनघाई करत नाही. मूडप्रमाणेच टाका.

तुझ्या बायकोने तुला जेवायला दिलं तेव्हा टाकते.
नाहीतर तुझा तुझ्या कुत्राबरोबर रोमान्स संपला असेल तर टाकते नाच्या!
एका नाच्याला माझा मेल दिलाय, अजूनही मेलची वाट बघतेय. त्या नाच्याला मेलवर पुढचा भाग नक्की देईन.
मेल मी नाच्या!!!

अरे बापरे अद्यातवाशी यांच्या लॉगीनला परत प्रॉब्लेम आला वाटते Rofl आणि खरा नाच्या कोण ते नारायण धारप यांनी पहिल्याच पानावर सिद्ध केलंय Rofl Rofl

आणि खरंच पुढचा भाग टाकायला मन होत नव्हतं, वैतागले होते, पण नाच्या तुझ्यासारख्यांसाठी नक्की टाकेन! तुला कसा वाटतो तेच बघू.
आणि नाच्या मेल कर ना, बघ मी कोण आहे ते? गावठी शस्त्रक्रिया केलेला पुरुष तू!!!

Pages