©वारसदार! - भाग १० - जुन्या पाऊलखुणा!

Submitted by महाश्वेता on 10 August, 2019 - 15:36

भाग ९

https://www.maayboli.com/node/70890

जल्लोष!
इब्राहिमच्या गोडाऊनवर प्रचंड जल्लोष चालला होता.
अलीची रक्कम सहीसलामत आली होती, अलीचा शब्द खाली पडला नव्हता.
अख्या मुंबईत ही खबर वाऱ्यासारखी पसरली होती.
अली परत आला होता, अलीचा पैसा मुंबईत आला होता!
अली आता अभेद्य झाला होता, आणि इब्राहिम अलीचा विश्वासू साथीदार.
मुंबई त्याकाळी अनेक गटांमध्ये विभागली गेली होती. अली आणि असिफमध्ये जीवघेण गँगवर चालू होतं, नायजेरियन कबनाची गॅंगही कधीकधी डोकं वर काढत होती, उप्पलवाडा हिंदूंचा गँगस्टर म्हणून प्रसिद्ध होता, तर आंग्रे मराठी अस्मितेचा गँगस्टर म्हणून.
हा जल्लोष अनिरुद्ध एका कोपऱ्यात शांतपणे सोफ्यावर बसून बघत होता.
बऱ्याच वेळानंतर इस्माईल अनिरुद्धजवळ येऊन बसला...
"अनिरुद्ध, बेटा, जिंकलीस तू आज मुंबई... जिंकलास तू..."
"अलीला जिंकवून?"
इस्माईल चमकला, "म्हणजे? अलीचा विश्वास कमावलाय आपण."
"भाई, अली म्हणजे मुंबई नाही. अली फक्त आज मुंबईचा चेहरा झालाय, मात्र मुंबई कुणाची बटीक नाही राहू शकणार. भाई, कुणा अलीच्या जोरावर आपण मुंबईत कायम नाही राहू शकणार. शेवटी आपल्या स्वतःला मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचीय."
इब्राहिम विचारात पडला, आणि हसून म्हणाला.
"खूप मोठा होशील अनिरुद्ध, खूप मोठा, पण आधी मोठ्यांच्या जवळ जाणं शिक."
अनिरुद्धही हसला. "शेवटी खोक्याला मुंबई दिसलीच."
"पण ती कल्पना कशी तुझ्या डोक्यात आली?"
"भाई, माणूस फक्त वरवर विचार करतो, त्याला जी दिशा दिसेल तिथेच शोधतो, मात्र खोलवर विचार केला असता, तिथे अनेक दिशा असतात."
★★★★★
"खुदा हाफिज!" म्हणत ती बोट दूरवर दिसेनासी झाली.
इस्माईलची बोट परतीच्या प्रवासला लागली. खूप वेळेनंतर त्याला मुंबईचा किनारा दिसला.
"भाई, आता खेळ सुरू..."
"नीट जा बेटा."
अनिरुद्धने अंगावर एक सूट चढवला, तोंडावर ऑक्सिजनच मास्क लावलं. खोक्याला दोरी बांधून त्याने हुक कंबरेला अडकवल, आणि समुद्रात उडी घेतली.
पोहत तो बोटीपासून दूर गेला...
दूरवर त्याला इस्माईलच्या बोटीवर पोलीस दिसले. तो बराच वेळ पाण्याखालीच थांबला, आणि जोर लावून त्याने बॉक्सही पाण्याखाली नेलं.
बऱ्याच वेळाने इस्माईलची बोट त्याच्याजवळ आली, अनिरुध्द आधी वर चढला, आणि दोघांनी जोर लावून खोकं वर ओढलं.
बोट मुंबईच्या दिशेला लागली.
★★★★★
"पोलिसांनी फक्त वरवर बघितलं भाई, समुद्राला अनेक दिशा असतात, आणि समुद्र प्रचंड खोल आहे. अनिरुद्ध म्हणाला."
इस्माईल थोडावेळ शांत राहिला.
"अनिरुद्ध, माझे वडील मला नेहमी म्हणायचे, समंदर जिसके साथ, बंबई उसकी."
अनिरुद्धने शांतपणे डोकं मागे टेकवलं.
"ऐक, आज आपल्याला अलीकडे जायचय, अलीने खास लोकांसाठी दावत ठेवलीये, तयार रहा. आणि हो, सकाळी लवकर उठून स्टेशनवर जायचंय तुला."
"स्टेशनवर का भाई?"
"अरे चांदणी येतेय, तिला घ्यायला जायचंय. नेहमी मीच जातो, पण आज मला अलीकडे थांबावं लागणार बहुतेक, म्हणून तुला सांगतोय."
"ठीक भाई." अनिरुद्धने मान डोलावली.
★★★★★
संध्याकाळी ठीक सात वाजता समंदर हॉटेलजवळ एक गाडी येऊन थांबली.
काळा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला याकूब त्यातून सगळ्यात आधी उतरला.
त्यापाठोपाठ पठाणी फेटा बांधलेला आणि कोट घातलेला इस्माईल रूबाबात खाली उतरला...
...आणि सगळयात शेवटी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला अनिरुद्ध उतरला.
तिघांनी समंदर हॉटेलमध्ये प्रवेश केला...
हॉटेलचं आज रुपडच बदललं होतं. ठिकठिकाणी उंची सजावट केली होती. नेहमी कळकट असणारं समंदर आज वेगळंच भासत होतं.
हॉटेलमध्ये प्रवेश करताक्षणी एक काळाकभिन्न माणूस त्यांच्या समोर आला.
"नाम बोलो."
"रोदान, अगली बार ऐसा किया, तो पुरा नायजेरिया जला डालुंगा..." इस्माईल रागाने म्हणाला.
तो माणूस हसला. "भाई आप तो परेशान हो गये. जाइये, अली आपका इंतझार कर रहे है."
"याकूब, इधर ही रुक. इस हबशीपे नजर रख. हम दोनो जाते है. चल अनिरुद्ध!"
इस्माईल आणि अनिरुद्ध जिना चढून वर गेले.
समोरच एका अवाढव्य खुर्चीवर अली बसला होता.
"आइये, आइये इस्माईलभाई, आप का ही इंतझार था!"
"ये तो आपका बडप्पन है अलीमिया, नही तो हम ठहरे मामुली ट्रकवाले."
"अदब, नजाकत कोई आपसे सिखे इस्माईलभाई. वैसे आज आपके साथ ये छोकरा कौन है?"
"अनिरुद्ध, नया छोकरा, पर बहुत होशियार. आपकी आजकी डिलीवरी ये ना होता, तो शायद मुमकीन ना हो पाती."
"हा, पुलीस ने बोट पकड ली थी, पता चला मुझे, इसलीये ताज्जूब हुवा, की फिर भी बक्सा किनारेपे कैसे आया?"
"अनिरुद्ध सांग बेटा," इस्माईल म्हणाला.
अनिरुद्धने सगळी हकीकत साग्रसंगीतरित्या सांगितली.
"दाद देनी होगी, दिमाग की. अनिरुद्ध... वाह!"
अनिरुद्ध हसला.
"पर इस्माईलभाई, पुलीस ऐसें कैसे पहोच गई बोटपर?"
"आजकल पेहरा कडा हो गया है, दुबई की वजह से."
"लेकीन आपकी ही बोट क्यो?" अलीने रोखून विचारले
इस्माईल बुचकळ्यात पडला.
"क्योकी ए साजिश थी इस्माईलभाई, सोची समझी साजिश!"
"मतलब?"
तेवढ्यात अलीच्या दोन धिप्पाड माणसांनी एका व्यक्तीला ओढत वर आणले...
"चंद?" इस्माईलच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
"तुम्हारा ड्रायवर इस्माईल..."
"चंद, ये क्या है..." इस्माईल चंदकडे वळला.
"भाई, बक्ष दो भाई, गलती हुई."
"पुलीस के सामने सब बक दिया उसने. शुक्र है कॉन्स्टेबल पवार तब मौजुद था, नही तो ये साप और कई जहरीले डंख मारता. मुंबई वापीस आया हूँ, अभी अभी मुंबईमे पैदा नहीं हुवा." अली रागाने म्हणाला
इस्माईलने मान खाली झुकवली.
"बडी गलती की तुने, बहोत बडी गलती..."
"तो क्या सजा दी जाये इस्माईलभाई गुनाह करने वाले को?" अली म्हणाला
"चंद..." इस्माईल चंदजवळ गेला, आणि हताश होऊन म्हणाला. "आखिर क्यो?"
"भाई..."
"क्या गलती हुई मेरे से चंद?"
चंद रडू लागला.
"सजा सुनाओ इस्माईलभाई," अली रुक्षपणे म्हणाला.
"तुझे जन्नत नसीब हो चंद..."
...आणि चंदवर अक्षरशः वज्रघात झाला.
चंदच्या अश्रूंना पार नव्हता. थोड्यावेळाने सावरुन तो म्हणाला.
"भाई गलती आपकी है, पुरी गलती आपकी है भाई!"
"चंद..." अनिरुद्ध ओरडला.
"चिल्ला मत. तू ही जड है इस सब की. सारा प्यार तुझपर, और हम जिंदगी भर बस ट्रक चलाते फिरे."
"अपनी होशियारी की वजह से उपर चढा है वो..." इस्माईल गुरकवला.
त्याही परिस्थितीत चंद हसला,
"इन हिंदूओ के प्यार के चक्कर मैं आपने पुरा परिवार गवा दिया.."
...धाड...
चंद जागीच कोसळला...
अलीने चमकून इस्माईलच्या दिशेने बघितले...
...मात्र गोळी इस्माईलने चालवली नव्हती.
अनिरुद्धने अलीच्या माणसाच्या हातात बंदूक टेकवली.
"सांभाळून ठेवत जा गन, कुणीही ओढून गोळी चालवू शकत."
अली आधी आश्चर्यचकित झाला, पण त्याला थोड्याच वेळात हसू फुटलं.
"इस्माईलभाई, सही लडका चुना है. नाम क्या है तेरा?"
"अनिरुद्ध."
"पुरा नाम?"
"अनिरुद्ध साळगावकर."
अलीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला.
"कहासे हो?"
"गोवा!"
अली आता उठून उभा राहिला होता. तो अनिरुद्धच्या जवळ आला, त्याने त्याच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघितले.
"महेश साळगावकरको जाणते हो?"

©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम सही....
आतुरता पुढच्या भागाची.....
येऊद्या लवकर पुढचा भाग.....

निव्वळ हिंदी सिनेमा.. संवाद, वातावरण निर्मिती एकदम चित्रदर्शी.. भन्नाट लिहीता तुम्ही. पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे आता. Happy

छान चाललीय कथा! ८०ज मूव्ही स्टाइल एकदम! पण एक सजेशन - दोन भागांमधे फार जास्त वेळ लावू नका Happy लिन्क तुटते कथेची.

ख-ण-ख-णी-त!!!
>>तुझे जन्नत नसीब हो चंद.>> वाह वाह!! बहोत खूब!!! काय थंड पणे सजा सुनावतो.