Submitted by Asu on 17 August, 2019 - 10:21
मोरऽपिसाऽरे
मोरऽपिसाऽरे मोरऽपिसा
करशी मजला वेडापिसा
फुलवून पिसारा धुंद मनी
थुईथुई नाचतो मोर जसा
गर्द गहिरे रंग उधळले
मोरपिशी कुणी न कळे
निळा पारवा ताम्र हिरवा
रंग संमेलन भरे आगळे
वीर धुरंदर अगाध ज्ञानी
चक्र सुदर्शन जरी हाती
सर्वांहून परि सुंदर शोभे
मोरपिस हसरे त्यां माथी
राजस लोभस मोरपिसारा
पाहून मनात मोद भरे
राष्ट्रपक्षी हा मान तुजला
मोरपिसाचा सन्मान ठरे
प्रा.अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा