©वारसदार! - भाग ९ - तस्करी!

Submitted by महाश्वेता on 31 July, 2019 - 09:00

सिद्धीने आवर्जून कथा आवडल्याचे कळवले, आणि कॉपीराइटचा मुद्दा मांडला, त्याबद्दल खूप धन्यवाद. हो सर्व हक्क लेखिकेस्वाधीन आहेत, मात्र या भागापासून काळजी घेईन.
सिम्बा यांच्या म्हणण्यानुसार दोन तीन भाग एकत्र केले तर लिंक राहील. हा विचार खरंच खूप चांगला आहे, आणि भाग छोटे होतायेत याची जाणीवही आहे, पण प्रत्येक भाग एका वळणावर थांबतोय, आणि यापुढेही तसाच थांबत राहीन, त्यामुळे उत्कंठा ठेवण्यासाठी भाग एकत्र आणण्याची कल्पना अंमलात आणता येणार नाही, नाहीतर ही वळणे मिस होतील.

भाग ८
https://www.maayboli.com/node/70876

"त्यादिवशी मी माझ्यामधला माणूस मारून टाकला, आणि एका सैतानाला जन्म दिला. असा सैतान, ज्याला भावना नव्हत्या...
...पण विधात्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, मी माझं पूर्वायुष्य सोडून आलो होतो, मात्र त्या पूर्वायुष्याने मला सोडलं नव्हतं...
माझी मुलगी, 'चांदणी... जसजशी ती वाढायला लागली ना, मला अजून माणूसपणाची जाणीव करून द्यायला लागली.
तिला शिकायला मी पुण्याला पाठवलं, आणि मी स्वतः इथल्या धंद्यांमध्ये गढून गेलो. कामाची नशाच काही वेगळी असते, सगळ्या जगाचा विसर पाडते.
माझ्या मुलीने मला माणसात आणलं. मला माणूस बनवलं. आहे ना मी माणूस विनायक?"
"हो..." विनायकाचा कंठ दाटून आला.
"वेडा, रडतोस काय... सहा फूट झालाय, जरा शरीर कमव, मलाही उचलून आदळशील."
विनायक त्याही परिस्थितीत हसला.
"चल जेवण करून घे, आणि झोप शांत."
विनायक बाहेर आला. त्याने बिर्याणी ताटात वाढली आणि जेवायला सुरुवात केली.
"अजून आहे का?" बिर्याणी संपल्यावर त्याने विचारले.
"अर्धा किलो खाल्लीये, झोप आता." इस्माईल हसत म्हणाला.
**********************************************************
"आजपासून माझं नाव, अनिरुद्ध!" विनायकने घोषणा केली.
इस्माईल त्याच्याकडे स्मितहास्य करत बघत होता.
"आप तो समंदर के शहंशाह, अल्ला के फरिश्ते, आपला हुक्म कौन नजरअंदाज कर सकता है? क्यो भाइयों?" इस्माईल पुढे येत म्हणाला.
"जी," सगळ्यांनी माना डोलावल्या.
"रामन, याकूब, विनायक...माफ करना, अनिरुद्ध, जरा काम कि बात करनी थी."
सगळे आतल्या खोलीत गेले.
"याकूब, मुस्तफा अली वापीस आया है." इस्माईल म्हणाला.
"भाई, पाच साल बाद? कहा था वो?" याकूब चक्रावून म्हणाला.
"अंडरवर्ल्ड कि जन्नत, दुबई! असिफ का राज खतम याकूब, अली का राज शुरु!"
"काम काय आहे भाई?" विनायकने विचारले.
"नकली नोट, सौ सौ कि, मुंबई लानी है."
"कितनेकी है?" याकूबने विचारले.
"सौ करोड!" इस्माईल सगळ्यांकडे रोखून बघत म्हणाला. "याकूब, अनिरुद्ध, तुम लोग कल बंबई का हर किनारा छान मारोगे. हमे महफूज जगह तलाशनी है."
"जी भाई." याकूबने मान डोलावली.
*******************************
दुसऱ्या दिवशी याकूब संध्यकाळी धापा टाकत परत आला.
"भाई, कोई भी किनारा अभी महफूज नहीं है. पुलिस कि नजर से बचकर मछली भी किनारे नहीं लग सकती, कश्ती तो दूर कि बात है."
"फिर क्या मना कर दु अलीको? याकूब आज अगर हमने ये काम नहीं किया, तो अली पुरा धंदा चौपट कर देगा!"
"भाई, तुमचा प्लॅन काय होता?" विनायकने विचारले.
"मुंबईपासून ५२ किलोमीटर दूर समुद्रात अलीची बोट उभी असेल. आपली बोट तिथे जाईल, सगळा पैसा आपल्या बोटीवर घेईन, आणि परत येईल."
"तीच बोट मुंबईला का आणू शकत नाही अली?" विनायकने विचारले.
"पाकिस्तानी बोट लगेच ओळखू येते पोलिसांना!!!"
विनायक चक्रावलाच.
"...आणि कुठेही पोलिसांना संशय आला, तर कायमची कोठडीत रवानगी, आणि माल पकडला गेलाच, तर अलीकडून ढगात रवानगी."
विनायक विचार करू लागला...
"बोट घेऊन जाण्यात धोका नाही, बरोबर? परत आणण्यात आहे."
"कोई शक?" इस्माईल म्हणाला.
"आपण हे काम करू भाई, नक्की करू."
"कैसे अनिरुद्ध?" याकूब म्हणाला.
"करेंगे..." विनायक हसत म्हणाला.
******************************
"विनायक, गोष्ट ऐकणार?"
"हो बाबा."
"पट्ठ्या गोष्ट ऐकण्यासाठी कायम उतावीळ." महेश साळगावकर हसत म्हणाला.
'खूप वर्षांपूर्वी, भारतात एक मोठा तस्कर होऊन गेला. तो कशाचीही तस्करी करू शकायचा. पोलिसांनी जंग जंग पछाडले, पण त्याला कधीही रंगेहाथ पकडू शकले नाहीत.
एके दिवशी तो अनेक गाढवावर गवत लादून दुसऱ्या देशात चालला. गवताचे भारे प्रचंड मोठे! पोलिसांनी कसून गवतात तपासणी केली, पण त्यांना काहीही सापडलं नाही.
असा क्रम अनेक दिवस चालला, मात्र गवताव्यतिरिक्त त्यांना काहीही हाती लागलं नाही.
बऱ्याच वर्षांनंतर पोलिसांच्या मुख्याधिकाऱ्याची आणि त्या तस्कराची भेट झाली.
खरं सांग, तू कशाची तस्करी करत होतास? त्याने तस्कराला विचारले.
गाढवांची!!! तस्कराने हसत उत्तर दिले.'
"विनायक, माणूस फक्त वरवर विचार करतो, त्याला जी दिशा दिसेल तिथेच शोधतो, मात्र खोलवर विचार केला असता, तिथे अनेक दिशा असतात."
********************
इस्माईल, अनिरुद्ध आणि याकूब, तिन्ही बोटीवर चढले.
मोटरबोट पाणी कापू लागली.
खूप वेळ प्रवास केल्यावर त्यांना हिरवा झेंडा असलेली एक बोट दिसली.
इस्माईलने बोट जवळ नेली.
त्या बोटीवरचं एक मोठं खोकं या बोटीत सरकवण्यात आलं...
"खुदा हाफिज!" म्हणत ती बोट दूरवर दिसेनासी झाली....
इस्माईलची बोट परतीच्या प्रवासला लागली. खूप वेळेनंतर त्याला मुंबईचा किनारा दिसला.
"भाई, बंबई," याकूब ओरडला.
"स्टॉप..." दूरवरून आवाज आला...
"पुलिस," याकूब भीतीने गार झाला.
तीन चार बोटींनी इस्माईलच्या बोटीला घेरले, आणि त्या बोटी जवळ आणून दोन-तीन पोलीस इस्माईलच्या बोटीवर चढले.
"काय रे, इतकी दूर काय करताय?"
"साहेब, मासे मिळत नाहीयेत... बघा इतक्या दूर येऊनही एवढेच..." इस्माईलने बोट दाखवलं.
समोर माशांचा ढीग पडला होता... खोकं नाहीस झालं होतं...

©सर्व हक्क लेखिकेस्वाधीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान continue केलीये कथा.
खोक्यात काय असणार?आणि ती कुठे गायब झाली? याची आता उत्सुकता आहे.

व्वा!!!
खोकं गेलं कुठे??
उत्सुकता, उत्सुकता!!

class

सूचनेची आवर्जून दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.

मी मागचे भाग (1 ते 8) एकत्र करून 2 भागात ठेवण्याबद्दल बोललो होतो, कादंबरी पुनःप्रत्ययासाठी वाचताना उत्कंठा ताणून ठेवायची गरज नाही Wink
पुढचे भाग येतायत तसे येऊ द्या, परत 4 भाग झाले ९ ते 12 की एकत्र करा
>>>>
हा भाग सुद्धा चांगला झाला आहे