कुठे जायला काल होतो निघालो

Submitted by बेफ़िकीर on 10 August, 2019 - 11:41

कुठे जायला काल होतो निघालो
=====

कुठे जायला काल होतो निघालो, कळेना कुठे पोचलो आज मी
दिशांनी दिला हात सोडून तेथे कुणा सांग देणार आवाज मी

इथे सागरासारखा खोल, विस्तीर्ण अन्याय चौफेर सोकावला
तुझ्या क्षीण हाळीत सामावुनी धन्यता मानते ती ठरो गाज मी

जिथे पाय टाकेन तेथे समस्या, तरीही पुढे पावले टाकतो
जगा पाहिजे तेवढा दुष्ट हो तू, कधीही न होणार नाराज मी

कुणाच्या मनाला दिले कर्ज केव्हा, किती आणि कोठे स्मरावे कसे?
स्वतःहून नाकारली मुद्दले मी, स्वतःहून नाकारले व्याज मी

मला काय माहीत होईल त्यालाच मानायचे नीट आहे इथे
सदा आपले नीट होईल सारे असा बांधला फक्त अंदाज मी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

कुणाच्या मनाला दिले कर्ज केव्हा, किती आणि कोठे स्मरावे कसे?
स्वतःहून नाकारली मुद्दले मी, स्वतःहून नाकारले व्याज मी>>>>>>

खुप छान बेफीजी ...

कुणाच्या मनाला दिले कर्ज केव्हा, किती आणि कोठे स्मरावे कसे?
स्वतःहून नाकारली मुद्दले मी, स्वतःहून नाकारले व्याज मी

क्या बात !

जिथे पाय टाकेन तेथे समस्या, तरीही पुढे पावले टाकतो
जगा पाहिजे तेवढा दुष्ट हो तू, कधीही न होणार नाराज मी
खुपच छान.....

मस्त!

जिथे पाय टाकेन तेथे समस्या, तरीही पुढे पावले टाकतो
जगा पाहिजे तेवढा दुष्ट हो तू, कधीही न होणार नाराज मी

खरंय..! इतक्या वेळा सांगितलं मी की काही नवीन कल्पना आणा
पण तुम्ही काय ऐकलं नाही. कधीही न होणार नाराज तू.

-दिलीप बिरुटे

छान