Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शाहीर तुम्ही त्याना ओळखता का
शाहीर तुम्ही त्याना ओळखता का ? कारण मी पण यु ट्यूब वर तेजश्री विरुद्ध खूप कॉमेंट्स वाचल्या. खूप भयानक रीतीने अपमान करायची वगैरे वगैरे. शशांक आणि त्याच्या आई- वडिलांना खूप त्रास झाला. शशांक सुटला बिचारा एकदाचा अशा कॉमेंट्स . अर्थात तिच्या मुलाखतींवरून खूप छान आणि डिसेंट वाटते बोलायला . पण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे तर आहेच . पण तरीही शशांकचा जस लग्न झालं तस तिचही होऊ दे. मानसिक स्थैर्य तिला पण मिळेल
म्हणूनच मी म्हणाले की खर काय
म्हणूनच मी म्हणाले की खर काय ते माहित नाही,मी असही ऐकल होत की शशांकने तिला नाटकात वगैरे काम करु नको अस सांगितल होत,
एखाद्या सेलिब्रिटीला किव्वा
एखाद्या सेलिब्रिटीला किव्वा कुणालाही पर्सनली न ओळखता त्याच्याबद्दल/ तिच्याबद्दल वैयक्तिक कमेण्ट करणे आणि तेही इण्टरनेटसारख्या सार्वजनिक जागेवर, ते चूक आहे. एखाद्याच्या आयुष्यात नाक खुपसणे हे बरोबर आहे का? आपल्या सर्वान्ना आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतातच. आपल्याबद्दल किव्वा आपल्या जवळच्या माणसान्बद्दल/ नातेवाईकाबद्दल कुणी असे बोलले तर आपण खपवून घेतो का? नाही ना.
हा, जर एखादा/ एखादी सोशल मिडियावर किव्वा रिएलिटी शोमध्ये आपल पर्सनल लाईफ स्वखुशीने किव्वा निर्लज्जपणे उघड करत असेल तर गोष्ट वेगळी.
मला वाटत, ह्या धाग्यावरची चर्चा एखाद्याबद्दल पर्सनल न बोलता केली तर उत्तमच.
माझ्या पोस्टबद्दल कुणाला वाईट वाटल तर सॉरी! बट नो सॉरी!
कुठल्याही सेलिब्रिटीबद्दल
कुठल्याही सेलिब्रिटीबद्दल वैयक्तिक कमें करणे मलाही पटत नाही.पण शिव आणि वीणा स्वत:च त्यांच्या बद्दल बोलत असतात,लग्नाबद्दल बोलत असतात,शिव आईबद्दल बोलत असतो,म्हणून वाटल की यांचही चांगल व्हाव,त्यांच्यासारख नको.कारण संसार कोणाचाही असो सेलिब्रिटीचा अथवा सामान्य माणसाचा,तो मोडण,वाईटच आहे,मग जबाबदार कोणीही असो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=G5qjYY8rdRc
शिव वीणा.
कुठेकुठे फिरत आहेत दोघ.पण छान
कुठेकुठे फिरत आहेत दोघ.पण छान एंजॉय करत आहेत.व्हडिओ छान आहे.
कुठेही नाटकीपणा वाटत नाही.
पण आता करियरवर लक्ष द्याव.वेगवगळी प्रोजेक्ट मिळो शक्यतो.काम सुरु झाल की खरी कसोटी आहे.
https://youtu.be/I-pLd0xgBI0
https://youtu.be/I-pLd0xgBI0
अंजू,हा आणखी एक मिळाला.मस्त एंजॉय करत आहेत स्पीड बोटमध्ये.
वीणा खूप सांभाळून घेते अस एकंदरीत दिसत आहे.
पण शिवमध्ये खूपच इनव्हॉल्वह झाली आहे,स्वत्व गमावू नये तिने.शेवटी तिचही करियर इहेच की.
पण शिवला आधी ब्रेक मिळायला हवा अस वीणाची इच्छा आहे.पण हिला आऑफर्स आल्या होत्या पण केवळ शिवला आधी काम मिळाव किंवा शिवबरोबरच काम मिळाव म्हणून हिने नकार नाही ना दिला.
बाप रे किती विचार करत आहे मी.
पण मला वीणा खूप आवडते अगदी राधापासून,झी युवागिरीमध्येही ती आवडायची.तितका शिव नाही आवडत.
मुळात शिवकडून अजूनही मला एवढ दिसत नाही जितक तो बिबॉसमध्ये दाखवत होता,त्यात त्याच्या आऊचा पूर्णपणे होकार नाही.
म्हणून वीणाची खूप काळजी वाटते.वीणाने स्वतंत्रपणे एखाद प्रोजेक्ट कराव.
छान वाटलं शिव विणीचा व्हिडिओ
छान वाटलं शिव विणीचा व्हिडिओ बघून, थँक्यू अन्जू युपी
नवीन वर्षाच्या सगळ्यांना
नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.
UP शिवपेक्षा वीणा जास्त
UP शिवपेक्षा वीणा जास्त matured विचारी आणि ठाम वाटते. खरंतर मला शिव जास्त आवडतो पण तरीही वीणा जास्त गुणी वाटते, ती हल्ली जास्त आवडायला लागली आहे त्याच्यापेक्षा, ती फार लकी आहे त्याच्यासाठी हे बिग बॉसमधेही दिसलं. तो निरागस आहे पण त्याच्या बोलण्यात तोचतोचपणा जास्त वाटतो.
खरं सांगूका शिव आणि वीणा यदाकदाचित वेगळे झाले तर वीणापेक्षा शिवचं जास्त नुकसान होईल असं मनापासून वाटतं मला. त्याला तिच्यासारख्या स्वभावाच्या जोडीदाराची जास्त गरज आहे. वेगळे होऊ नयेत हीच इच्छा, god bless them.
Happy New Year 2020.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Q9p8ag4amT0
खास शिवानी सुर्वे fans साठी. तिला हिंदी मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, व्हियेतनाममध्ये.
2017 मध्ये संपलेल्या
2017 मध्ये संपलेल्या सिरियलसाठी 2019 मध्ये पुरस्कार.???
ते ही व्हिएतनाममध्ये.मग बाकीच्या हिंदी सिरियलच काय?
सिरियल मी पाहिली नाही,पण गुगलवर पाहिल तर जून 2017 मध्ये जाना ना दिल से दूर ही मालिका संपली होती,ज्यासाठी तिला हे अँवॉर्ड मिळाल.
असो,आपल्या भारतीयाला बाहेर अँवॉर्ड मिळाल की आनंदच होतो.
अभिनंदन शिवानी.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/B640gFTpeiT/?igshid=za6vli5t2mov
शिवचा इंटर्व्ह्यू.
एकदम आनंदाने जगणारा पठ्ठा आहे.
सिरियल मी पाहिली नाही >>> मी
सिरियल मी पाहिली नाही >>> मी ही नाही. अनामिका काही भाग बघितलेले, पण ते शिवानीच्या एन्ट्री आधी, नंतर एखाद दुसरा एपिसोड बघितला असेल.
2017 मध्ये संपलेल्या सिरियलसाठी 2019 मध्ये पुरस्कार.??? >>> वरातीमागून घोडं किंवा पंचवार्षिक awards असतील.
मराठी रेडिओ मिरचा अँवॉर्डची
मराठी रेडिओ मिरचा अँवॉर्डची नॉमिनेशन्स पाहिली, शिवानीला बेस्ट अँक्ट्रेससाठी नॉमिनेशन आहे.ते स्वाभाविक आहे.(पण मिळण्याची शक्यता कमी आहे,कारण प्रत्यक्ष सिनेमा आणि तिचा अभिनय यथातथाच आहे आणि बाकीचे खछप स्ट्रॉंग आहेत, असो)
पण तिला आणखी एका कँटँगरीत नॉमिनेशन आहे ,ते बघून धक्का बसला,बेस्ट डेब्यूडंट अँक्ट्रेस,कस शक्य आहे,ती तर घंटा सिनेमाची नायिका होती आणि आणखी एक सिनेमाही तिने केला आहे,बर ट्रिपल सिटच्या नामावली यादीत इंट्रड्युसिंग शिवानी सुर्वे असही येत नाही,मग ही डेब्युडंट कशी
बहिणीलि विचारल तर ती म्हणाली की तिची पी आर टीम जबरदस्त असेल,बेस्ट अँकट्रेस मिळणार नाही हे माहित असल्याने यि कँटँगरीत नॉमिनेशन मिळवून दिल असेल
मग मात्र सगळ लक्षात आल,2017 मध्ये संपलेल्यि हिंदी मालिकेसाठी हिलाच कस काय व्हिएतनामला बोलावल? महाराष्ट्राचा फेवरेट कोण मध्ये फक्त हिलाच कशी काय दोन कँटँगरीत नॉमिनेशन आणि एकासाठी अँवॉर्ड? इतके वर्षीत नाही मिळाले ते सुभि आणि स्वप्नील सोबत सिनेमे.
या पी आर टीमची सँलरीही खूप असते,ती बिगबॉसमुळे सहज मँनेज करता येत असेल. कारण एक शिव सोडला तर बाकीच्या सगळ्यांच्याच पी आर टीम्स होत्या ,पण हिची आणि नेहाची वरचढ होती.
पण जर अस असेल,तर शिवच कराव तेवढ कौतुक कमी आहे,कारण बिगबॉसच्या त्याची अशी काही टीम नव्हती,हे वीणा आणि त्यानेही सांंगितल आहे,अर्थथात बिबॉसमध्ये तो असताना त्याच फँनफॉलोईंग मात्र वाढल.
आणि आता कदाचित विनर झाल्यामुळे आणि वीणाच्या आओळखीमुळे त्याचीपण पी आर टीम असेलच.
पण म्हणून शिवच यश नाकारता येत नाही.
कुणाला ट्रिपल सिट बघायचा असेल
कुणाला ट्रिपल सिट बघायचा असेल तर यू ट्यूबवर पूर्ण पिक्चर आहे,तसख तो अँमेझॉनवरही आहे.पण त्यासाठी पैसे मोजावे लागतील.मी कालच पाहिला,काही शेंडाबुडखाच नाही.
शिवानी मात्र खूप सुंदर दिसली आ हे,पण जेवढी अँक्टिंग बिबॉसमध्ये केली तेवढी इथे काही जमली नाही .....हसणारी बाहुली.
ती दिसायला सुंदर आहे. अभिनय
ती दिसायला सुंदर आहे. अभिनय so so च का, अरेरे.
सुलू करेक्ट, शिवानीचा पहिला पिक्चर ट्रिपल सीट नाहीच आहे मग डेब्यू वगैरे धादांत खोटेपणा झाला की.
तिला विनर करणार होते बहुतेक ये जा केली नसती तर. पण तरीही voting शिवलाच असते, करू शकले नसते तिला विनर, पब्लिक voting मुळे, दुसरी आली असती कदाचित.
सुलू करेक्ट, शिवानीचा पहिला
सुलू करेक्ट, शिवानीचा पहिला पिक्चर ट्रिपल सीट नाहीच आहे मग डेब्यू वगैरे धादांत खोटेपणा झाला की. >>>>>>> अन्जू हे वरती लिहिलेल मी नाही, UP म्हणाले तस.
ती दिसायला सुंदर आहे. अभिनय so so च का, अरेरे. >>>>>>> चित्रपटाच माहित नाही पण ' देवयानी' सिरियलमध्ये छान काम केल होत तिने. त्यात ती रडूबाई नव्हती. नन्तर तिच्या जागी दुसरी हिरोईन आली ( हि ' आई, कुठे काय करते? सिरियलमध्ये मिलिन्द गवळीची बिझनेस पार्टनर कम मैत्रीण झालीये. ) ती मात्र मिळमिळीत होती. नन्तर ती सिरियल लाम्बवल्यामुळे आणि मेन हिरोईनच्या रिप्लेसमेण्टमुळे मी ती बघायची सोडून दिली.
सध्याच्या हिन्दी बिबॉमधला सिद्धार्थ शुक्ला ' मेल व्हर्जन ऑफ शिवानी सुर्वे' आहे. लोक त्याला कितीही शिव्या घालोत, सलमान आणि शो त्याच्या बायस्ड आहे.
ओहह sorry, आता एडीट नाही
ओहह sorry, आता एडीट नाही करता येणार, सुलू करेक्टच्याऐवजी UP करेक्ट वाचा..
देवयानी मध्ये मला संग्राम आणि शिवानी जोडी आवडलेली पण मी जास्त बघितली नाही, ती असतानाच सोडली कारण मूळ प्रतिज्ञा हिंदी बघितलेली बरीच, शेवटी काही महिने नाही बघितली, आणि त्या दोघांनी केलेला अभिनय अतिउत्तम होता. शिवानी आवडलेली, संग्राम जास्त आवडला होता पण मूळ हिंदी अरहान जबरदस्त आवडलेला आणि ती नायिका पण.
दोन्हीकडे सासरे झालेले त्यांची कामे उत्तम होती.
देवयानी मी पण पाहिलेली नव्हती
देवयानी मी पण पाहिलेली नव्हती,पण मला आठवत आहे,शिवानीने सोडल्यावर त्यावर बरच लिहून आल होत,कोणी म्हणत टँन्ट्रम्स दाखवायची, कुणी म्हणत होत की मी सकाळी सात ते संध्याकाळी सात अशीच शिफ्ट करणार तर कुणी म्हणत की पैसै विढवून दिले नाहीत म्हणून हसोडली.
पण तिने सोडल्यावर सिरियल कोलमडली हे नक्की.
घंटा पिक्चरची ती हिरॉईन होती अपोझिट आरोह,पण फार काम नव्हत आणि तिथेही फार काही प्रभाव नव्हताच,तो ही पिक्चर निही चालला,पण अमेय वाघ आवडला होता
जाना ना दिल से दूर नाही पाहिली,हॉटस्टारवर आहे,बघायचा विचार करत आहे.
पण एवढी वर्ष काम करून ट्रिपल सिट मध्ये मला फार काही भावली नाही,म्हणजे जेवढा गर्व ती बिबॉसच्या घरात दाखवत होती ,त्यामानाने तशी कसलेली अभिनेत्री वगैरे अजिबात नाही आहे.
<सध्याच्या हिन्दी बिबॉमधला
<सध्याच्या हिन्दी बिबॉमधला सिद्धार्थ शुक्ला ' मेल व्हर्जन ऑफ शिवानी सुर्वे' आहे. लोक त्याला कितीही शिव्या घालोत, सलमान आणि शो त्याच्या बायस्ड आहे.>
ट्विटरवर याला सपोर्ट नेहमी टॉप ट्रेंडिंग असतो.
देवयानी बहुतेक अनामिका
देवयानी बहुतेक अनामिका सिरीयलसाठी सोडली होती शिवानीने, मी सुरुवातीला बघितली होती ती, पण आठवडाभर बघून सोडली. नंतर कितीतरी महिन्यांनी परत बघताना ही दिसली. तरीही नाहीच बघितली.
अन्जू....अनामिका ही कोणती
अन्जू....अनामिका ही कोणती सिरियल,कधी ऐकल नाही हे नाव.कुठल्या चँनेलवर होती?
हिंदी होती, रात्री उशीरा
हिंदी होती, रात्री उशीरा असायची दहाला बहुतेक, चॅनेल नक्की आठवत नाहीये, सोनी बहुतेक.
त्यात भुत, ब्लॅक मॅजिक वगैरे प्रकार होता, तो जरा अतिरेकी होता म्हणून कंटाळा यायचा. भूत वगैरे आवडतं मला पण बाकी जरा अति होतं. हिरोची प्रेयसी मरते आणि ती त्याला त्या दुनियेत ओढायला वगैरे बघते असं काहीतरी होतं, दुसरी नायिका शिवानी होती. जास्त चालली नसावी बहुतेक.
त्यानंतर तिची सुंदर माझं घर सिरीयल आली इ टीव्ही मराठीवर पण तेव्हा माझे मन तुझे झाले समोर ही चितपट झाली, ती सहा महीन्यांत गेली. कित्ती प्रमोट करायचा प्रयत्न केला चॅनेलने पण काहीही झालं नाही, गुंडाळावी लागली. एक न्युज रीपोर्टर स्टार माझाचा हिरो होता, मराठे आडनांव होतं. स्वाती चिटणीस होती. मग घंटा पिक्चर केला आणि जाना ना दिलसे दूर.
ती फार गर्विष्ठ गटात मोडणारी वाटते मला. मी एवढं काम केलं, अशी गाडी घेतली वगैरे सांगायची याबद्दल कौतुक वाटलेलं पण स्वत: लिगल धमकी देऊन मग बिग बॉस तसं म्हणाले तर म्हणे माझ्याकडे पैसेच नाहीत. एवढं काम करुन पैशाचं नियोजन करता येत नसेल तर दुर्दैव आहे खरंच. असो हे त्यावेळी वाटलं ते लिहीलं, पर्सनल टीका वगैरे नाही करायची, पण मला आवडत नाही ती, त्या शोत मनातून उतरली पार.
ती सिरियल सोनीवर असायची.
ती सिरियल सोनीवर असायची. शिवानी त्यात रिप्लेसमेण्ट म्हणून आली होती.
मला ही देवयानीत आवडलेली, पण बिबॉमध्ये मात्र तिच खर रुप बघून शॉक्डच झाले. राजेश शृन्गारपुरे, रेशम टिपणिस आणि सुशान्त शेलारच्या बाबतीतही माझ अस झालेल. बिबॉमध्ये आले तेव्हा ते डिसेण्ट वाटत होते.
बघितले काही भाग अनामिकाचे यू
बघितले काही भाग अनामिकाचे यू ट्यूबवर. म्हणजे आताच्या तिच्या वयानुसार शिवानी फक्त 19 वर्षांची होती.
माझ्यामते बरीच वर्ष काम केल्याचा,हिंदीत लीड केल्याचा गर्व असावा तिला.पण बिबॉसमध्ये मात्र केवळ एकच सिरियल राधा करून वीणाला जी पॉप्युलँरिटी मिळाली,त्यात शिवसोबतच तिच बॉंन्डिंग,तिच्याशी वीणाने घेतलेला पंगा,वीणाचा गेम,घरातला वावर,तिला बाहेर मिळत असलेला भाव हे सगळ ती बाहेर गेल्यावर बघून आल्यामुळे वीणावर जेलस असावी.
मलाही हाच प्रश्न सतावत आहे की एवढ्या लीड मालिका हिंदी,मराठीत करूनही ती एवढी फेमस नक्कीच नव्हती,शेवटी तिला बिबॉसनेच घराघरात पोहोचवल,ज्याची गोड फळ तिला आता पुरस्काराच्या रुपात मिळत आहेत.
शिवानीच्या वयाविषयी माझ
शिवानीच्या वयाविषयी माझ कनफ्यूजन आहे. ती म्हणते की ती २२ वर्षाची आहे. ती २२ वर्षाची न वाटता ३० ची वाटते. ' देवयानी' येऊन किती वर्ष गेली. उलट, विणा २९ न वाटता २२ ची वाटते.
ती 24 सांगत होती bb त, 16 ची
ती शिवानी 24 सांगत होती bb त, 16 ची असल्यापासून काम करते म्हणत होती, वीणापण तिच्या आईला सांगत होतीना की ती लहान आहे माझ्यापेक्षा. वीणा वयाच्या मानाने लहान वाटते मात्र. वीणा अभिनयक्षेत्रात येण्याआधी, TCS मध्ये जॉब करत होती.
https://www.tellychakkar.com
https://www.tellychakkar.com/tv/tv-news/bigg-boss-marathi-2-winner-shiv-...
अरे व्वा! फारच छान!
अरे व्वा! फारच छान! अभिनन्दन शिव!!!!
Pages