ग्राहक संरक्षण कायदा व वैद्यकीय क्षेत्र

Submitted by BLACKCAT on 7 August, 2019 - 12:30

आताच असे वाचले की मोदी सरकारने ग्राहक संरक्षण कायद्यातून वैद्यकीय क्षेत्र वगळले.

https://www.thehindu.com/news/national/parliament-passes-consumer-protec...

Consumer Protection Bill 2019 has finally been passed by the Rajya Sabha and it has *dropped Healthcare* from its list of services, believe it or not. The Bill *included Healthcare when it was initially tabled in the Lok Sabha.* The fact that healthcare was subsequently dropped was a conscious decision on the part of the legislature and demonstrates unambiguously a clear legislative intent that healthcare will not be brought under Consumer Protection Act.

Finally, *Healthcare* has been dropped from the list of services in *Consumer Protection Bill 2019* which has been duly passed by the Indian Parliament.

Now *patients will be patients and not customers* and *doctors will be doctors and not merchants.*

हे खरे आहे का, नेमके काय स्वरूप आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादी सेवा अथवा वस्तू देण्यात चूक झाली किंवा त्रुटी/कमतरता राहिली तर सेवदाता/विक्रेता याकडे रुग्ण हा ग्राहक न्यायालयात दाद मागून भरपाई मिळवू शकतो हे 'Consumer Protection ' आवाक्यात वैद्यकीय सेवा अंतर्भूत असेल तर होऊ शकते. पण ती सेवा अंतर्भूत नसल्याने नाही.
-----
आपण केलेली औषधयोजना बरोबरच होती हे सिद्ध करायची वेळ डॉक्टरावर आलीच तर या विचाराने तो अधिकाधिक तपासण्या करवेल. तो खर्च वाढतो. बऱ्याचदा सामान्य निरिक्षणांतूनही डॉक्टर अनुमान काढतात आणि योग्य औषधेही देतात. खर्च कमी राहतो..
रुग्णास जेवढी रोग बरा होण्याची इच्छा असते त्याहूनही अधिक काळजी डॉक्टरांना रुग्ण बरा होऊन परत जाण्याची असते. तो प्रामाणिकपणे समाजाला मदत करत असतो.
अनाठायी भितीने रुग्णांना ग्राहक संरक्षण कायद्याचे संरक्षण हे डॉक्टर वैद्यकांवर अविश्वास व्यक्त करण्यासारखे होते. ते दूर झाले तर उत्तमच.