उलूक महात्म्य

Submitted by Dr Raju Kasambe on 4 August, 2019 - 12:08

उलूक महात्म्य

तीक्ष्ण डोळे, तीक्ष्ण कान, करू किती हेवा
मूषक-शत्रू जागतो, घेतो उंदरांचा मागोवा !

अनुकुचीदार नख्या, कापसासारखे पंख
उड्डाण भारी विनआवाज, उंदरांचा रंक !

घेई विश्रांती दिवसभर, ढोलीत, कडे कपारीत
खरेतर शिलेदार निशाचर, नसे दिवाभीत !

उंदरांची फौज करे पिकांचे नुकसान
धान्य जाई बिळात, शेतकऱ्यांचे अवसान!

म्हटले घुबड की वळते आमची बोबडी
विज्ञान युगातही जनता आमची भाबडी !

इंग्रजी कथांमध्ये असते ‘वाईज आउल’
आम्हास मात्र नको असते घुबडाची चाहूल !

‘वाईज आउल’ वाटसरूला सल्ला देतं
इथे मात्र आमचं घोडं पेंड खातं !

करतो सदा आम्ही पाश्च्यात्यांचे अनुकरण
इथे मात्र आमचे उफराटे धोरण !

इंग्रजांनी खर्ची घातले लाखो पौंड
स्वागत करायला गव्हाणी घुबडाचे !

वाडी-वावरा शेतात बसविली हजारो घरटी
स्वागताने इंग्रजांच्या परतले घुबड, परतली समृद्धी!

उलूक महात्म्य वर्णावे किती
चार उंदीर बघावे मारून, कळे तेव्हा महती !

पुराणांत उल्लेख, ‘उलूक’ वाहन लक्ष्मीचे
लावता हजेरी शेतात, लक्षण समृद्धीचे !

त्यागू या अंधश्रद्धा, देऊ घुबडाशी अभय
लक्ष्मी येई घरा, उलूक पावली, पक्षीमित्र म्हणे !

(प्रकाशित: विहंग, स्मरणिका २७ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन स्मरणिका, नागपूर. दि. ४ व ५ जानेवारी २०१४).
Posting an old poem on importance of owls on the occasion of Owl Awareness Day.
Photo: Barn Owl rescued and released in Nagpur in 2008.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users