सफरचंद हलवा by Namrata's CookBook :१२

Submitted by Namokar on 25 July, 2019 - 07:36
safarchand halwa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५ सफरचंद
४ चमचे तुप (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
पाऊण वाटी साखर
वेलची पुड
साय
काजू , बदाम
Screenshot_2019-07-23-13-24-29-618_com.google.android.youtube.png

क्रमवार पाककृती: 

१. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या
२. कढई मध्ये तुप घ्या
३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या
४. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून ,सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत छान परतून घ्या(मध्ये मध्ये हलवत राहायच आहे )
५. १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर ,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्या
७. एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच आहे
८. २ मिनीटानी साय घालून एकत्र करुन घ्या
९. मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झालेकी आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे
apple halwa1.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३
अधिक टिपा: 

*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल
*खायचा केशरी रंग घातला तरी चालेल (गाजर हलव्या सारखा रंग येईल)
*सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे आणि पाककृती चालू करावी

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
पण फळे नुसतीच खायला आवडतात.

मस्त रेसिपी.
सफरचंद कापुन ठेवल्यावर काळे पडतात ना. ही रेसिपी करताना अस काही होत का ?

धन्यवाद देवकी , 'सिद्धि'
हो टिप लिहायची रहीली Happy
सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे

ओके ....थॅक्स. बघते करुन.
Happy Happy

५ सफरचंदाच्या किसासाठी वर दिलेल्या १वाटी साखरेतली मी साधारण पाऊण वाटी साखर वापरली
(कारण सफरचंद किसून ते खाऊन बघितले तर थोडे गोड होते त्यामुळे पुर्ण वाटी साखर वापरली नाही )
सहित्याचे माप लिहीले नाही त्याबद्दल क्षमा .बदल करते Happy

धन्यवाद . Happy
मला हवं होतं कि पाच सफरचंदाचा किस किती वाट्या झाला आणि त्याला किती वाटी साखर? पाउण वाटी साखर घातलीत असं म्हणताय नं . ठिक आहे करुन बघिन म्हणजे समजेलच. Happy सफरचंदाचा जॅम केलाय , हलवा करुन बघाय्ला पहिजे.

सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे >>>एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात १/२ tsp मीठ टाकावे त्या पाण्यात सफरचंदाचे मोठे तुकडे टाकून नावाला धुतल्यासारखे करावे आणि स्वछ कॉटन फडक्याने पुसावे. सफरचंद काळे पडत नाही.

सफरचंदाचा जॅम केलाय >>>>> कृती येऊ दे.>>>>> देवकी Happy
मी रुचिरा मध्ये दिल्या प्रमाणे करते. Happy मला पाकृ लिहीता येत नाही अजिबात. बघते हं प्रयत्न करुन.