गळ रे नळा

Submitted by कौतुक शिरोडकर on 9 April, 2009 - 02:18

(ये रे घना.... या गाण्याच्या विडंबनाबद्दल मी श्री. आरती प्रभू, श्री. ह्रदयनाथ मंगेशकर व श्रीमती. आशा भोसले यांची जाहीर माफी मागतो. ते माफ करतीलच या खात्रीने.....)

गळ रे नळा, गळ रे नळा
न्हाऊ घाल माझ्या मळा

पीके माझी अळुमाळु, सुर्या पाहे चुरगळू
नको नको म्हणताना, लोडशेडींगच्या कळा

व्याजामुखी घरदार, सावकार सावकार
नको नको म्हणताना, फास लागेल ना गळा

नको नको किती म्हणू, ऐकणार कोण वेणू
दैव झोडी, राजा मारी, सोसतोय आम्ही छळा

गुलमोहर: 

कौतुका मस्तच रे Happy
पण मिल्याला मोदक.. माझा मळा जास्त चांगलं. Happy
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

कौतुक...! मस्तच! एकदम सही जमुन आलय!

नको नको म्हणताना, लोडशेडींगच्या कळा
आवडले.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

मस्त कौतुक Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

जबरी आहे... मस्त एकदम Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

एकदम सह्हीच!!!!!!!!! Happy

मस्त ! कौतुकजी !!

कॉलेजला असताना एका पोरावर फिशपाँड टाकला होता...तो आठवला !

ये रे घना ये रे घना
खाउ घाल आमच्या उम्या

तुझी तंबाखू याचा चुना
होउन जाउ दे पुन्हा पुन्हा !