सिंबा परत आलायः द लायन किंग पुनःप्रत्ययाचा आनंद

Submitted by अश्विनीमामी on 21 July, 2019 - 08:27

द लायन किंग अर्थात सिंहाचा छावा आपल्या सर्वांचा लाडका सिंबा परत आला आहे. डिस्ने कंपनीने ह्या जुन्या प्रसिद्ध अ‍ॅनिमेशन, आम्ही कार्टूण सिनेमा म्हणायचो, लाइव्ह अ‍ॅक्षन सादरीकरण केले आहे. आज आय मॅक्स थ्रीडी मध्ये बाल गोपाळ तसेच नव तरुणांबरोबर बघून पुनःप्रत्ययाचा निखळ आनंद घेतला.

अ‍ॅनिमेशन पट जेव्हा आला होता तेव्हा बघितलाच होता व संगीताची कॅसेटघेतली होती, गाणी पाठ केली होती. घरी पपी आले तेव्हा त्याला सिम्बा सारखे वर धरून अनाउन्स केले होते. ही ही. हकूना मटाटा , लव्ह इज इन द एअर, अय जस्ट कांट वेट टु बी किंग ही गाणी छान आहेतच पण
चित्रपटाची सुरुवात होते तो सीक्वेन्स अगदी आजकालच्या भाषेत एपिक व आयकॉनिक आहे. आफ्रिकन चांट सुरू झाले कि एकदम रोमांचित वाटते.

नार्निया मधला सिंहाचा मृत्यू लायन किंग मधला मुफासा चा कपटाने घडवून आण लेला मृत्यु हे बघायला त्रासदायक क्षण आहेत. पण मी तेव्हा रडाय च्या तयारीने गेले होते. तथापि जसेच ओपनिन्ग सिक्वेन्स सुरू झाले तसेच भरून आले लाइव अ‍ॅक्षन मध्ये सर्व प्राणी पक्षी झाडे निसर्ग
व धबध बे नद्या अतिशय सुरेख दिसतात. एकदम तिथे उभे असल्या सारखेच वाटते . कोणता भाग खरा व कोणता संगणक निर्मित आहे हे समजणे अवघड आहे पण एकत्रित परि णाम जबरदस्त होतो. आता बारक्या असलेल्या मुलांसाठी तरी चित्रपट नक्कीच महत्वाचा आहे कारण इतके सर्व निसर्ग वैभव झपाट्याने नाहिसे होत चालले आहे की त्यांना व पुढच्या पिढ्यांना कदाचित अश्या सिनेमातच पुढे दिसेल. अश्या निराश तम भावनेने भरून आले पण मग लगेच बाळाचे नामकरण व त्याला शेंदूर लावणे हा गोड कार्यक्रम होता .

चित्रपट फार भर भर पुढे सरकतो. :सिंबाचे बालप ण व बारका सिंबा अतिशय गोजिरवाणा दिसतो. नाला बेबी पण त्याला साजेशी आहे. भ विष्यातली राणी साहेबा!! तो रुबाब तिच्यात लहान पणा पासून आहे. अ‍ॅनिमेशन पटात शँडोज च्या पलिकडे असलेली हत्तींची स्मशान भूमि व
मुफासाच्या मृत्युचा सिक्वेन्स जास्त भयावह वाटतो. इथे ही. झाडा वर जीव वाचवायला बसलेला सिंबा अगदी जिवाचा थरकाप उडवतो.
दुष्ट स्कार काका सिंबाला पळवून लावतो व तरसांच्या मदतीने राजा होतो. सिंबाच्या आईला व त्यांच्या माद्यांच्या कळपाला बंदिवान बनवून ठेवतो.

इकडे सिंबा हकूना मटाटा करत मोठा होतो. तो भाग अपेक्षे नुसार विनोदी आहे. अगदी फ्रेम टु फ्रेम जुन्या चित्रपटाची कॉपी घेतली आहे.
नाला त्याला शोधत येते सिंबा ला स्वतःबद्दलच्या शंकांचे निरस न होउन स्वत्वाची जाणीव होतो व तो परत जाउन आपले राजे पद काबीज करतो
वणव्या नंतर धाराधार पाउस येतो व नवे बाळ जन्माला येते नाला व सिंबा प्राइड आयलँड वर सुखाने राज्य करतात. निस र्गातला नाजूक समतोल पुनर्प्रस्थापित करतात ही कथा.

क्लायमॅक्स साजेसाच आहे. मेरे करण अर्जून आएंगे क्षण पण साराबीच्या डोळ्यात दिसतो. स्कार व सिंबाची मारामारी, तरसांचा सूड व
दूर वर पसरलेला वणवा हे लाइवह अ‍ॅक्षन मध्ये परिणाम कार क दिसते.

अश्या सिनेमा असते तसे आवाजी कलाकार फार महत्वाचे आहेत. झाजू म्हणून जॉन ऑलि व्हर व नाला बियोन्से मध्येच पैसे वसूल होतात.
हिंदी आवृत्तीत शाहरुख खान वत्याच्या मुलाने डबिंग केले आहे ते ही छान झाले असेल.

ट्रीट मेंट व संगीत मस्तच जर तुम्ही आधीचा सिनेमा बघितला असेल तर प्रत्येक क्षणी हॉ हु हाय होते. आंतरजाल नसताना सुद्धा हा चित्रपट एकदम जग भर हिट झाला होता. आता तर प्रश्नच नाही. सिंबाच्या केसांचा झुपका एप कडे कसा येतो तो क्षण एकदम ग्रेट घेतला आहे.
पर्यावरण मनुष्य जातीच्या हस्तक्षेपाशिवाय किती नीट चालते त्याचा प्रत्यय येतो.

लहान मुलांना अवश्य दाखवा हा चित्रपट. करमणूक व प्रबोधन हे एकातच घेतले आहे. व दोन तास मजा. आफ्रिकेत टूर करून आल्यासारखे वाट्ते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कार्टून्स चा जो गोडवा आहे तो हरवला आहे असं वाटलं
त्यांची एक्सप्रेशन, जीभ दाखवणे, गाणी सगळी मस्त वाटत होती
इथे ते नाहीये
लहानपणी चा सिमबा उर्फ पिल्लू मांजरीसारखा खट्याळ आहे पण नंतर बोर झाला
सगळे सिंह पण रुबाबदार कमी आणि हडकुळे वाटले त्यामुळे निराशा झाली

हडकुळे सिम्हच जास्त चपळ असतात, बोजड मोठे सिम्ह आळशी असतात, किंबहुना सिमहा पेक्षा सिम्हिणीच जास्त चपळ असतात , म्हणून तर सौंदर्याचा सिंहकटी हा एक क्रायटेरिया आहे

सगळे सिंह पण रुबाबदार कमी आणि हडकुळे वाटले त्यामुळे निराशा झाली,>>>>>> हे मात्र खरे आहे.खूप काळपट रंगाचे वाटले. अनिमल प्लॅनेट , डिस्कवरी मध्ये पाहिलेले सिंह असे दिसत नाहीत.अगदी छोटा सिंबाचा रंग ही वेगळा आहे.

तांत्रिक बाजू उच्च आहे. पहिला अर्धा भाग सुंदर आहे. मध्यंतरानंतर ओके ओके वाटाला. हकुना मटाटाचा भाग झाडे, झरे, यांनी बहरलेला आहे. मुसाफाचे राज्य त्यामानाने गवताचे मोकळे माळरान (मुसाफा गादीवर असतानाही आणि नंतरही). मी आधीचा चित्रपट पाहिलेला नाही आणि जंगलबुकची सदाबहार जंगले भरपूर बघितली असल्याने असेल, पण हे ओकेबोके वाटले.

हिंदी डबींग चांगलेच झाले आहे. तरुण सिंबाच्या डबींगबाबत मला उत्सुकता होती, पण ठिकठाक वाटले.

खूप काळपट रंगाचे वाटले. अनिमल प्लॅनेट , डिस्कवरी मध्ये पाहिलेले सिंह असे दिसत नाहीत.>>>>>

हो ना, मलाही तसेच वाटले

छान लिहिले आहे अमा.

सिनेमा आवडला. सिम्बाच्या पिताजींचा आवाज जबरदस्त आहे. छोट्याला वाचवायला पहिल्यांदा मोम्फासा येतो तेव्हा त्याचा प्रवेश फार राजेशाही आहे. एकदम आवडले ते दृष्य. आणि ३डी अधिक आयमॅक्समधे अजुनच मस्त वाटते पहायला.

गजानन,
सिंह मोकळ्या गवताळ प्रदेशात आढळतात, तीच भौगोलिक फॅक्ट यांनी कायम ठेवली आहे
दाट जंगलांमध्ये वाघ/ बिबटे आढळतात
म्हणून मोगली (जो MP च्या दाट जंगलात घडतो) मध्ये सिंह नाहीत, वाघ/काळ वाघ आहे.

इकडे पण सिम्बा आश्रय घेतो त्या वनात आधी पासून चे सिंह नाहीत कारण ते दाट अरण्य आहे.

मी काल ना मिबिया वर एक डॉ क्युमेंटरी पाहिली त्यात तर अगदीच खुरटी झुडुपे होती. वैराण वाळ वंटात साधारण कॉलीफ्लावरची लागवड असते त्या प्रकारची झुडुपे. त्यात सिंह व सिंहिणीचे गुफ्तगु चालू होते. बाकी सुद्धा नामि बियात आपण इत रत्र बघतो तसे लश ट्रोपिकल जंगल नाही.
बारका सिंबा पळून जाताना वाळवंटात थकून पडतो तस्या टाइपचे वाळवंटच आहे खरेतर. कदाचित कथा इथे घडलेली असावी.

सिंह म्हणजे सर्वात वर चढून नजर जाईपरेन्त दिसेल त्या जमिनीवर लक्ष ठेव णे. प्रे मिळवायला हालचाल कुठे दिसते, प्राण्यांचे कळप कुठून येत आहेत ते बघणे असे असावे.

मला कार्टून्स चा जो गोडवा आहे तो हरवला आहे असं वाटलं >> हो मलाही तसचं वाटलं.
आणि लांबून शॉट्स घेताना , आकारमानातही गडबड वाटते.
जाजू कधीतरी एकदम किन्गफिशर सारखा दिसतो आणि सिम्बा एकाद्या मांजरीच्या पिलासारखा.

सिंह मोकळ्या गवताळ प्रदेशात आढळतात, तीच भौगोलिक फॅक्ट यांनी कायम ठेवली आहे
दाट जंगलांमध्ये वाघ/ बिबटे आढळतात
म्हणून मोगली (जो MP च्या दाट जंगलात घडतो) मध्ये सिंह नाहीत, वाघ/काळ वाघ आहे.
<<< सिम्बा, हे इंटरेस्टींग आहे. डिस्कव्हरीवरही सिंह कधी दाट जंगलात बघितलेले आठवत नाहीत, हे यानिमित्ताने लक्षात आले. धन्यवाद.

सिम्बा परत येतो ते वनवासातोन राम परत येतो तसे वाटले. किंवा कथा हॅम्लेट सारखी वाटली. असे ही काही जाणीवेचे क्षण आलेच. >> लायन किंग मला नेहमीच छोट्यांसाठी रुपांतरित केलेले हॅम्लेटच वाटत आले आहे. ह्या दोन्ही नाट्यात एक स्ट्राँग प्यारलल आहे असे बर्‍यापैकी मानले जाते. लाकि. चा प्लॉट हॅम्लेट एवढा कॉम्प्लेक्स नाही आणि त्यात हॅम्लेटच्या मानाने पात्रांची संख्याही कमी आहेत पण हा सगळा मला बालकथा सुटसुटीत बनवण्यासाठी लागणारा बदल वाटतो.

हॅम्लेट आणि सिम्बा दोघेही राजपुत्र असणे, दोघांच्या वडिलांचा अकाली आअणि संशयास्पद मृत्यू, दोघांचे काका दुष्ट असणे, त्यांनी दोघांच्याही वडिलांचा खून करणे (हॅम्लेट मध्ये वडील भुताच्या रुपात येतात आणि भावाने त्यांचा खून केला हे लाकिमध्ये आहे तेवढे स्पष्ट नाही), काकांनी राज्य बळकावणे, राजपुत्राला वनवासात रहावे लागणे, आधी मैत्री होणे मग प्रेम होणे, दोघांना सेल्फ डाऊट ने पछाडणे, नंतर दोघांनी आपल्या अस्तित्वासाठी/न्यायासाठी/हक्कासाठी काकाशी लढा देणे आणि झालेल्या अन्यायाचा बदला घेणे अशी हॅम्लेटमधली प्रत्येक वळण घेणारी सिम्बाची कथा आहे.
लहान मुलांसाठी असल्याने सिम्बाचा शेवट सुखांत आहे तर हॅम्लेट ऑन लार्जर स्केल दु:खकथा वाटते.

अर्थात काही बारीक सारीक फरक आहे दोन्ही कथेत पण ते कथावस्तूच वेगळी आहे म्हणण्याईतके नाही. हॅम्लेटमधले सगळ्या पात्रांची नावे आता आठवत नाहीत दोन्ही नाट्यातील मुख्य पात्रांची पात्रांची जुळणी नक्कीच करता येईल.
सिम्बा (हॅम्लेट), स्कार (क्लॉडियस), नाला (ऑफेलिया), मुफासा(हॅम्लेटच्या वडिलांचे भूत - किंग हॅम्लेट) असे..

नवा मोशन पिक्चर सिनेमा अजून बघायचा राहिला आहे.

Pages