सिंबा परत आलायः द लायन किंग पुनःप्रत्ययाचा आनंद

Submitted by अमा on 21 July, 2019 - 08:27

द लायन किंग अर्थात सिंहाचा छावा आपल्या सर्वांचा लाडका सिंबा परत आला आहे. डिस्ने कंपनीने ह्या जुन्या प्रसिद्ध अ‍ॅनिमेशन, आम्ही कार्टूण सिनेमा म्हणायचो, लाइव्ह अ‍ॅक्षन सादरीकरण केले आहे. आज आय मॅक्स थ्रीडी मध्ये बाल गोपाळ तसेच नव तरुणांबरोबर बघून पुनःप्रत्ययाचा निखळ आनंद घेतला.

अ‍ॅनिमेशन पट जेव्हा आला होता तेव्हा बघितलाच होता व संगीताची कॅसेटघेतली होती, गाणी पाठ केली होती. घरी पपी आले तेव्हा त्याला सिम्बा सारखे वर धरून अनाउन्स केले होते. ही ही. हकूना मटाटा , लव्ह इज इन द एअर, अय जस्ट कांट वेट टु बी किंग ही गाणी छान आहेतच पण
चित्रपटाची सुरुवात होते तो सीक्वेन्स अगदी आजकालच्या भाषेत एपिक व आयकॉनिक आहे. आफ्रिकन चांट सुरू झाले कि एकदम रोमांचित वाटते.

नार्निया मधला सिंहाचा मृत्यू लायन किंग मधला मुफासा चा कपटाने घडवून आण लेला मृत्यु हे बघायला त्रासदायक क्षण आहेत. पण मी तेव्हा रडाय च्या तयारीने गेले होते. तथापि जसेच ओपनिन्ग सिक्वेन्स सुरू झाले तसेच भरून आले लाइव अ‍ॅक्षन मध्ये सर्व प्राणी पक्षी झाडे निसर्ग
व धबध बे नद्या अतिशय सुरेख दिसतात. एकदम तिथे उभे असल्या सारखेच वाटते . कोणता भाग खरा व कोणता संगणक निर्मित आहे हे समजणे अवघड आहे पण एकत्रित परि णाम जबरदस्त होतो. आता बारक्या असलेल्या मुलांसाठी तरी चित्रपट नक्कीच महत्वाचा आहे कारण इतके सर्व निसर्ग वैभव झपाट्याने नाहिसे होत चालले आहे की त्यांना व पुढच्या पिढ्यांना कदाचित अश्या सिनेमातच पुढे दिसेल. अश्या निराश तम भावनेने भरून आले पण मग लगेच बाळाचे नामकरण व त्याला शेंदूर लावणे हा गोड कार्यक्रम होता .

चित्रपट फार भर भर पुढे सरकतो. :सिंबाचे बालप ण व बारका सिंबा अतिशय गोजिरवाणा दिसतो. नाला बेबी पण त्याला साजेशी आहे. भ विष्यातली राणी साहेबा!! तो रुबाब तिच्यात लहान पणा पासून आहे. अ‍ॅनिमेशन पटात शँडोज च्या पलिकडे असलेली हत्तींची स्मशान भूमि व
मुफासाच्या मृत्युचा सिक्वेन्स जास्त भयावह वाटतो. इथे ही. झाडा वर जीव वाचवायला बसलेला सिंबा अगदी जिवाचा थरकाप उडवतो.
दुष्ट स्कार काका सिंबाला पळवून लावतो व तरसांच्या मदतीने राजा होतो. सिंबाच्या आईला व त्यांच्या माद्यांच्या कळपाला बंदिवान बनवून ठेवतो.

इकडे सिंबा हकूना मटाटा करत मोठा होतो. तो भाग अपेक्षे नुसार विनोदी आहे. अगदी फ्रेम टु फ्रेम जुन्या चित्रपटाची कॉपी घेतली आहे.
नाला त्याला शोधत येते सिंबा ला स्वतःबद्दलच्या शंकांचे निरस न होउन स्वत्वाची जाणीव होतो व तो परत जाउन आपले राजे पद काबीज करतो
वणव्या नंतर धाराधार पाउस येतो व नवे बाळ जन्माला येते नाला व सिंबा प्राइड आयलँड वर सुखाने राज्य करतात. निस र्गातला नाजूक समतोल पुनर्प्रस्थापित करतात ही कथा.

क्लायमॅक्स साजेसाच आहे. मेरे करण अर्जून आएंगे क्षण पण साराबीच्या डोळ्यात दिसतो. स्कार व सिंबाची मारामारी, तरसांचा सूड व
दूर वर पसरलेला वणवा हे लाइवह अ‍ॅक्षन मध्ये परिणाम कार क दिसते.

अश्या सिनेमा असते तसे आवाजी कलाकार फार महत्वाचे आहेत. झाजू म्हणून जॉन ऑलि व्हर व नाला बियोन्से मध्येच पैसे वसूल होतात.
हिंदी आवृत्तीत शाहरुख खान वत्याच्या मुलाने डबिंग केले आहे ते ही छान झाले असेल.

ट्रीट मेंट व संगीत मस्तच जर तुम्ही आधीचा सिनेमा बघितला असेल तर प्रत्येक क्षणी हॉ हु हाय होते. आंतरजाल नसताना सुद्धा हा चित्रपट एकदम जग भर हिट झाला होता. आता तर प्रश्नच नाही. सिंबाच्या केसांचा झुपका एप कडे कसा येतो तो क्षण एकदम ग्रेट घेतला आहे.
पर्यावरण मनुष्य जातीच्या हस्तक्षेपाशिवाय किती नीट चालते त्याचा प्रत्यय येतो.

लहान मुलांना अवश्य दाखवा हा चित्रपट. करमणूक व प्रबोधन हे एकातच घेतले आहे. व दोन तास मजा. आफ्रिकेत टूर करून आल्यासारखे वाट्ते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान परिचय. अॅक्षन शब्द फार आवडला. खरंच जोडाक्षरे टैप करायला औघड वाटतात.
पर्यावरण मनुष्य जातीच्या हस्तक्षेपाशिवाय किती नीट चालते त्याचा प्रत्यय येतो. +११११११

हकुना मताटा ची चाल भिगे होठ तेरे च्या ओ हो ओहो शी जुळते का?>> होय तर म्हणून बघितले. पण जिमीन अस्मानाचा फरक आहे. हे फार निरागस गाणे आहे तर ते.....

छान परिचय.
थ्रीडीमध्ये national geography / animal planet documentary बघितल्याचा फील येतो जो पैसा वसूल आहे. मला सतत 'कसं काय केलं असेल हे' हाच प्रश्न पडत होता. एनिमेशनपेक्षा हे live action अफाट दिसतं व डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं.
मध्येमध्ये फाईट सीन्स जरा बोअर झाले होते. सारखं काय काळोख अंधार. पोरं पण सेकंड हाफला कंटाळली. तोपर्यंत पॉपकॉर्नही संपले होते.
माझा जनरली या मुव्हीजबद्दल दृष्टीकोन असतो की आपण पालक म्हणून जात आहोत, आपल्याला आवडायला पाहिजे असं नाही. पण बरेचदा हे मुव्हीज आवडूनच जातात.

लायन किंग बद्दल काही गोष्टी खटकल्याही ज्याबद्दल लेख आले आहेत (म्हणजे इतरानाही खटकल्या.) राजाचा मुलगाच राजाच होणार हे खऱ्या लायन्समध्ये नसतं. आणि माणसांमध्येही आयडियली नसावं. पूर्णपणे मेल डॉमीनेटेड सोसायटी ही खऱ्या लायन्समध्ये नसते. आणि माणसामध्येही आयडियली नसावं. प्राईड रॉक गावाच्या सीमे पलीकडे राहणारे डार्क स्किन hyena कोणाचं प्रतिनिधित्व करत होते ? डोन्ट लेट देम इन?? ऑर लेट देम इन अँड हेल्प देम रिफॉर्म?

https://medium.com/writing-the-ship/racism-in-the-lion-king-2c7a044ec6de

https://www.apnews.com/3be360417e85c14b5129ae82b362f8a7

https://screenrant.com/lion-king-movie-real-life-animals-inaccurate-wrong/

प्राईड रॉक गावाच्या सीमे पलीकडे राहणारे डार्क स्किन hyena कोणाचं प्रतिनिधित्व करत होते ? डोन्ट लेट देम इन?? ऑर लेट देम इन अँड हेल्प देम रिफॉर्म?>> हे मला पण जा ण वले. ते ही रिवोल्टिंग स्कॅवेंजर्स असा उल्लेख आहे स्कारच्या तोंडी. मग निसर्गात स्कॅवेंजर्स ची पण एक जागा आहे. त्यांचे काम महत्वाचे आहे. सिम्बा परत येतो ते वनवासातोन राम परत येतो तसे वाटले. किंवा कथा हॅम्लेट सारखी वाटली. असे ही काही जाणीवेचे क्षण आलेच. पण सध्या च्या विचारसरणी नुसार मी ती फक्त एक कथा म्हणून बघितली व आनंद घेतला. डीप एनालिसिस करायचा नाही. घरी येउन वरण भात खाल्ला व झोप काढली. डिस्ने पिक्चर असल्याने रक्त दाखवलेले नाही कोणत्याच फाइट मध्ये. शिवाय प्राणी लाइव्ह अ‍ॅक्षन मध्ये चेहर्‍यावर फार भावना दाखवू शकत नाहीत त्या मानाने अ‍ॅनि मेशन मध्ये हे जास्त परि णाम कारक वा टतात. टिमॉन व पुंबा पन अ‍ॅनिमेशन वाले जास्त क्युट आहेत. पण बाल सिंबा व सर्व बेबी अ‍ॅनिमल्स( असे इन्स्टाग्राम वर एक अकाउंट आहे जे मी फॉलो करते) एकदम क्युट व मस्त.

डिझ्नीने जंगल बूकच्या पाठोपाठ, आता दि लायन किंग आणि भविष्यात जुने क्लासीक अ‍ॅनिमेटेड मुविज लाइव अ‍ॅक्शन+सिजिआय मध्ये आणले तर चांगलंच आहे. चित्रपटाचा रिमेकहि चांगला जमलाय, फक्त साउंडट्रॅक मध्ये थोडा मार खाल्लाय असं माझं मत. "कॅन यु फिल द लव टुनाइट" हे बियांसेच्या आवाजातलं, ओरिजिनल एल्टन जॉनच्या तुलनेत फिकं वाटतं. बाकि स्टारकास्ट मस्त. सेथ रोगन, बिलि इश्नर (पुंबा, टिमान) यांनी तर धमाल उडवेलेली आहे. ओरिजिनल पाहिलेल्या आणि न पाहिलेल्या सगळ्यांनी आवर्जुन पहावा असा चित्रपट आहे...

राजाचा मुलगाच राजाच होणार हे खऱ्या लायन्समध्ये नसतं. >>>>
खरे सिंह कधी म्हणाले आम्ही राजा आहोत म्हणून?

असो. आता सिंहात पण राजा असतो आणि राजाचा मुलगाच राजाच होणार हे खऱ्या लायन्ममधे नसल्यामुळे सिंहांच्या कळपात तरस राजा बनून बसल्याचे बघायला मला आवडेल.

लेख वाचायला घेतला पण मराठीत लिहिलाय की देवनागरी इंग्रजीत हे कळेनासे झाले त्यामुळे सोडून दिला, थोडे प्रतिसाद वाचले.

अमा, मस्त लिहिलंय
आजच पहिला,
सगळं तुम्हीच लिहून टाकलंयत Happy त्यामुळे नो ऍडिशन.

BTW याची 3D क्वालिटी खूप आवडली.
या आधी पद्मावत चे 3D इफेक्ट खूप काळोखे वाटत होते.

लाल किले पर पहला तिरंगा जनरल शाहनवाज खान ने ही फहराया था.जनरल खान के परिवार में उनके तीन पुत्र महमूद नवाज, अकबर नवाज, अजमल नवाज और तीन पुत्रियां मुमताज, फहमिदा और लतीफ फातिमा हैं. लतीफ फातिमा को उन्होंने गोद लिया था. लतीफ फातिमा बालीवुड के मशहूर अभिनेता शाहरूख खान की मां हैं. जनरल खान के पोते आदिल शाहनवाज अपने दादा के नाम से जनरल शाहनवाज खान फांउडेशन का संचालन करते हैं.

https://www.ichowk.in/society/general-shahnawaz-khan-of-azad-hind-fauz-h...

मुफासा किंग खान की घराणेशाही .

मस्त लिहीले आहे. जुना लायन किंग ऑटाफे आहे. प्रचंड नॉस्टॅल्जिया आहे. मी तो बराच नंतर पाहिला पण मग नंतर असंख्य वेळा परत पाहिला. हा ही पाहायचा आहे.

वाचलेल्या माहितीवरून तो जुना लायन किंग कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशन च्या आधीचा शेवटचा चित्रपट होता डिस्नेचा - हाताने काढलेल्या कार्टून्स वर. तेव्हाचे तंत्रज्ञान पाहता तो सिम्बा सापडतो त्या स्टॅम्पीड चा सीन खतरनाक होता.

जुन्यामधे नंतर अ‍ॅड केलेले 'द मॉर्निंग रिपोर्ट' गाणे यात आहे का माहीत नाही.

आफ्रिकन चांट सुरू झाले कि एकदम रोमांचित वाटते. >>> टोटली! लालभडक सूर्योदय, ही चांट, आणि चित्रपटाची सुरूवात एकदम डोक्यात कोरली गेलेली आहे.

होय स्टार्टिंगचाच सिन, काय जबरा घेतालाय, मान उंचावून बघणारा गेंडा, चित्ता, हत्ती आणि पक्षी जबरदस्त

मुलाचा खुप हट्ट चाललाय हा चित्रपट पाहण्यासाठी, त्याच्यासाठी जावेच लागेल. मी जुना पाहीलाय आणि आवडला पण होता.

खरे सिंह कधी म्हणाले आम्ही राजा आहोत म्हणून?
>>>>> Rofl

अमा, छान लिहिलंय.
शनिवारी ऐनवेळी टिकीट काढायला गेलो तर हाउसफुल्लचा बोर्ड.
रविवारचे पण टिकीट्स नव्हते. मग शनिवारीच सोमवारचे बूकिंग केले.
आज जाणार आहोत. जुना सिनेमा खुप आवड्ता आहे. हा ही आवडेलच.
धाकट्याला जुना माहित नाही. तो पहिल्याने हाच बघणार.

मस्त लिहीले आहे. जुना लायन किंग ऑटाफे आहे. प्रचंड नॉस्टॅल्जिया आहे. मी तो बराच नंतर पाहिला पण मग नंतर असंख्य वेळा परत पाहिला. हा ही पाहायचा आहे. >>>> + १०००००००००० .

भयानक आवडता चित्रपट आहे हा माझा .
आणि सध्या घरात मी सोडून कोणालाच excitement नाहीये. हा विकांत आजारपणात गेला आता पुढच्या शनिवाराची वाट पहाणे आले.

हॉन्ग्कॉन्ग डिस्ने लॅण्ड मध्ये एक लाईव शो पाहिलेला , लायन किन्गचा.
जबराट .
पूर्ण वेळ त्या गाण्यांवर मी वेड्यासारखी ओरडत , डोलत , बसून नाचत , टाळ्या वाजवत होते .

ह्या सिनेमात आय कांट वेट टु बी किंग चे चित्रण खूपच मस्त आहे. सर्व प्राण्यांची बाळे इथे तिथे नाचत आहेत असे आहे.

हकूना मटाटा छोटेसेच पण मस्त गाणे आहे.

एल्टन जॉन्चे गाणे जास्त छान आहे.

व सर्कल ऑफ लाइफ फेवरिट.

अताच पाहून आले.मला आवडला.बाल सिंबा तर एकदम क्यूट!

नवजात सिंबा,बाल सिंबा सापडतो तो स्टॅम्पीडचा सीन,मुसाफाबरोबरच्या त्याच्या गुजगोष्टी,यात सिंबा आवडला.शेवटी सिंबाचे बाळ दाखवतात तेही नवजात सिंबापेक्षा वेगळं दाखवलंय हे आवडलं.

मस्त लिहीले आहे. जुना लायन किंग ऑटाफे आहे >> +१ माझा पण खू sss प आवडता चित्रपट .. जेव्हापासून हा मूवी पाहिलाय तेव्हापासून हकुना मटाटा हीच माझ्या मोबाइल ची रिंगटोन आहे Happy Proud
आफ्रिकन चांट सुरू झाले कि एकदम रोमांचित वाटते.>> हो भारी !!
आता हा नवीन आलेला पण केव्हा एकदा बघेन असं झालंय .. चांसेस कमीच आहेत ..बघू कसं जमतंय .
पण काहींना तो लहान मुलांचा आणि बालिश मूवी आहे असं का वाटतं ते कळत नाही ! द लायन किंग म्हंटलं कि एकतर झटकून टाकतात किंवा तो एकदा बघायला छान आहे असं म्हणतात.

ओरिजिनल साउम्ड ट्रॅक गुगल प्ले म्युझिक् वर उपलब्ध आहे. त्यातील तीन रचनांचे संगीतिकरण हान्स झिमर ह्या मातब्बर कंपोझर ने केले आहे. अपेक्षे नुसार ते डार्क व काँप्लेक्स आहे. पक्षी व्यामिश्र.

नव्या चित्रपटात, काही गोष्टींचे जास्त स्पष्टीकरण दिले आहे,

सिम्बा चा केसांचा झुपका रफिकी कडे कसा जातो.
स्कार चे सराबीला वश करायचे प्रयत्न.

खरं तर पूर्ण चित्रपट प्राणी खरे जसे वागतात त्या पेक्षा त्यांच्या वर मानवी भावनांचे प्रत्यारोपण केले आहे. सत्यात सिंहाच्या कळपात सिंहिणी राज्य करतात व नर फक्त कामा पुरता असतो. लायन क्वीन म्हणून मी तोच सिनेमा सराबी व नाला च्या नजरेतून बघितला. चालसे एकदम फिट्ट बसे शे. नाला एकद म ट्रू टू टाइप आहे. आपले कर्तव्य काय आपन नक्की कोण आहोत ते तिला माहीत आहे व धीट पण आहे. जिवाचा धोका पत्करून सिंबास शोधून आणते. स्कार शी लढायला जी ब्रूट मेल पावर( आय बिलीव ) जरूरी आहे ती शोधून आणून युद्ध घडवून आणते व नवा राजा प्रस्थापित करते. सर्व सुरक्षित झाल्यावर बाळ होउ देते. प्रजाति पुढे गेली पाहिजे हाच निसर्ग नियम आहे. बाकी आपण त्याला चिकट वलेले भावनिक पापुद्रे गळून पडतात कालांतराने.

खरं तर पूर्ण चित्रपट प्राणी खरे जसे वागतात त्या पेक्षा त्यांच्या वर मानवी भावनांचे प्रत्यारोपण केले आहे. + १
हो अगदी.
बाल सिंबा तर एकदम क्यूट + १
- अमा मस्त लिहीले आहे.

पाहिला. मस्त वाटलं.
बाळ सिंबा कित्ती क्युट.
बाळ किऑन पण क्युट.
हकुना मटाटा.

मी आज चालले आहे , घरी हाकुनमटाटा ची ऑलरेडी प्रक्टीस करुन झाली आहे.
माझ्या बालपणातल्या कार्टुन्स, आनि सिनेमावरचे परत रीमेक निघण खुप सुखावह आहे.माझ्या पोरासोबत परत ते क्षण जगायला मिळणार आहे.

डंबोला आल्यानंतर बाकी कुठलच खेळन नको फक्त हत्तीच पिलु आण मला, हा हट्ट संपल्यानंतर आता छोटा लायन पाहिजे हा हट्ट सुरु झाला आहे.

आबूम्बा वे अबुम्बावे अबुम्बावेप अबुम्बावेप....... यस्स इट्स अ प्राब्लेम फ्री फिलासफी. हकुना मटाटा.... नो वरीज फॉर द रेस्टॉ फ युअर डेज

आलो आत्ताच बघून.
पूर्ण रस्ताभर , हकूना मटाटा चालू होतं

केवळ अ प्र ति म . आजच हिंदी वर्जन पाहिले. मला स्वत:ला असरानी यांनी केलेले डबिंग खूपच मस्त वाटले.

>> कोणता भाग खरा व कोणता संगणक निर्मित आहे हे समजणे अवघड आहे

अखंड चित्रपटात फक्त एक फोटो तेवढा खरा आहे बाकी सगळे संगणक निर्मित आहे म्हणे. निर्मितीची कथा भन्नाट आहे. त्यांनी सगळे आभासी जग (virtual space) निर्माण करून मग विएफएक्स गॉगल घालून त्या आभासी जगात जाऊन खऱ्या जगात करावे तसे शूट केले आहे असे वाचले.

Pages