तुला पाहते रे- भयंकराचे आकर्षण, एक सामाजिक प्रश्नचिन्ह

Submitted by अतुल ठाकुर on 20 July, 2019 - 20:43

काही गोष्टी पाहण्यात तुम्हाला रस नसला तरी पाहाव्या लागतात. घर लहान आहे त्यामुळे संध्याकाळी टिव्हीवर जे काही लागते ते कानावर मुद्दाम हेडफोन लावला तरी त्यातून झिरपत जाते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागत असल्याने ते अधून मधून दिसतही राहते. या मालिकेबद्दल माझे वैयक्तिक मत काय आहे हे महत्त्वाचे नाही. पण २९८ भागांच्या या मालिकेला मिळालेली अमाप प्रसिद्धी मला सामाजिक दृष्ट्या विचार करायला लावणारी वाटली. "वय विसरायला लावते ते प्रेम" अशा आगळ्यावेगळ्या विषयाने सुरुवात झालेली ही मालिका पुनर्जन्म आणि सूडावर येऊन काल संपली. पहिली बायको राजनंदिनी हिला गच्चीवरून ढकलून देऊन तिचा खून करणार्‍या विक्रान्त सरंजामेने स्वतःचा शेवट गच्चीवरुन उडी मारून केला. नियतीने केलेला न्याय असे बहुधा दाखवायचे असणार. पण सर्व प्रश्न इथूनच सुरु होतात.

२९८ भागांच्या मालिकेत नायक आणि लग्नानंतर खलनायक झालेला माणुस हा पराभूत होताना फारसा दाखवलेलाच नाही. शेवटच्या फक्त दोन भागांमध्ये त्याने संपत्ती मिळविण्यासाठी जे काही खून पाडले त्याचे तो समर्थन करताना दिसतो. म्हणजे उरलेले २९६ भाग त्याची कमान चढतीच दाखवली आहे. शेवटच्या भागातदेखिल एकंदरीत त्याचीच पकड दिसते. कारण मी कबुली दिली तरी तुम्ही माझं काहीही वाकडं करु शकत नाही. माझ्यासारखी बुद्धीमत्ता कुणाकडेही नाही अशा वल्गना तो करताना दाखवला आहे. आणि अक्षरशः कुणीही त्याचं काहीही वाकडं करु शकत नाही हेच मालिकाभर दाखवण्यात आलं आहे. शेवटी तर नायिका आपण केलेले कारस्थान त्याला कळले तर? या प्रश्नाने प्रचंड घाबरलेली दाखवली आहे.

न्याय, क्षमा की दया हा प्रश्नही या संदर्भात महत्त्वाचा वाटतो. नायक बाप होणार, पोटातील बाळाला वडील हवे, त्याने कितीही भयंकर गुन्हे केले, माणसं ठार मारली तरी आपले त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे आपल्यावर प्रेम आहे. झाले गेले विसरून जावे, पुन्हा पुढे चालावे, जिवनगाणे गातच राहावे या ट्रॅकवर काही भाग गेले. प्रेमाच्या, आपल्या माणसांशी निष्ठूर होता येणे कठिण असते हे मान्य केले तरी या टोकाचे गुन्हे केल्यावरही माणसे गुन्हेगाराबद्दल हळवी होतात हे पाहून नवल वाटले.

प्रेम, होणारे मुल याबद्दल हळवा झालेला नायक निर्घृणपणे छोट्या मुलासकट एका कुटूम्बाला संपवतो. मित्राला ठार मारतो, ज्याने नोकरी दिली त्याच्यावर खूनाचा आरोप ठेवून त्याला देशोधडीला लावतो. सासर्‍याच्या औषधात फेरफार करून त्याला ठार मारतो आणि शेवटी त्याच्या निरातिशय प्रेम करणार्‍या बायकोचाही गच्चीवरून फेकून खून करतो. नायकाच्या व्यक्तीमत्वाची ही सारी काळीकुट्ट बाजु पुरेशी ठळकपणे अधोरेखित व्हाही तशी होत नाही. उलट त्याच्या शेवटच्या समर्थन करण्याने त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते की काय असे वाटत राहते. इथे कलावंताच्या कला स्वातंत्र्याचा प्रश्न येतो.

बलात्कार वाईट म्हणजे तो दाखवायचाच नाही की काय? असा जर कुणी प्रश्न कलेच्या स्वातंत्र्याबाबत विचारला तर त्याचे उत्तर दाखवायचा हेच असणार. पण तो पाहताना घृणा वाटली पाहिजे. माणसे त्याचा आनंद घेऊ लागली तर काहीतरी चुकते आहे असेच म्हणायला हवे. समाजात हर्षद मेहताच्या बुद्धीमत्तेबद्दल आकर्षण असणारी माणसे असतात. मलाही तसे आकर्षण वाटायचे. पण एका भल्या गृहस्थाने माझे कान पिळले होते. तो संतापून म्हणाला होता ही बुद्धीमान माणसे पुढे त्यांच्या वाटेत जे कुणी येतात त्यांचा समूळ काटा काढतात.

आपल्या समाजात कायदा आहे, न्यायव्यवस्था आहे, पोलिस आहेत या बाबी या मालिकेत जवळपास नव्हत्याच. जगातली सर्व गरीब माणसे संपत्ती मिळविण्यासाठी विश्वासघाताचा मार्ग अवलंबतात काय? खून पाडतात काय? आणि तसा मार्ग त्यांनी अवलंबिल्यास ते समर्थनीय आहे काय हा देखिल प्रश्न येथे विचारता येईल. प्रामाणिकपणे, मेहनतीने पुढे आलेल्या माणसांची असंख्य उदाहरणं आहेत. इतके गुन्हे करूनही कुठलाही पश्चात्ताप न झालेला नायक आत्मसमर्थन करीत राहतो. त्याच्यापुढे सुष्टांचे म्हणणे दुबळे वाटत राहते. मालिकाकारांना न्याय होतो आहे की नाही, झाला तर कसा होतो ही बाब महत्वाची वाटते की नाही, त्यांना नक्की काय दाखवायचे आहे हेच कळत नाही.

थोडक्यात काय तर भयंकराचे उदातीकरण आणि त्यामुळे भयंकराबद्दल वाटणारे सुप्त आकर्षण ही बाब मला चिंतेची वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता असल्या भिकार चॅनेलना चाप लावणं खूप सोपं आहे. चॅनेल अनस्ब्स्क्राइब करायचं. एखाद दुसरेच कार्यक्रम पाहत असाल, तर त्यासाठी नेट्/अ‍ॅप आहे.
पण मुळात प्रेक्षकांना या मालिकांचं व्यसन लागलं आहे. पिसं काढायला, किती वाईट आहे ते बघायला , नाहीतर मग ज्ये.ना.च्या नावाखाली पण अगं अगं म्हशी करत आपण मालिका बघतो. त्यावर इथे भरभरून चर्चा करतो. नव्या मालिकेचा प्रोमो दिसला रे दिसला की इथे त्यावर धागा निघतो.
चॅनेलला काय संदेश जातो? कशी का असेना, लोक मालिका बघतातच.

सुमार, रादर भिक्कार मालिका पाहण्याची आपल्याला सवय लागली आहे. आपलीच रुची तशी झाली आहे. त्यामुळे चॅनेल तेच वाढणार. कथालेखक जरा बरं नाव असलेले घेतात. पण कथा त्याच्या हातात असते कुठे? तेच ते पटकथाकार आणि संवादलेखक सगळीकडे दिसतात. पाट्या टाकतात म्हणायचं की त्यांची कुवतच तेवढी म्हणायचं?
असल्या गोष्टींसाठी आणि न्यायालयांचा वेळ कशाला वाया घालवायचा? त्यांच्याकडे काम कमी आहे की काय?

भरत, सहमत.
पण ह्या लेखाच्याच सुरुवातीला लेखकाने लिहिल्याप्रमाणे <<<<<काही गोष्टी पाहण्यात तुम्हाला रस नसला तरी पाहाव्या लागतात. घर लहान आहे त्यामुळे संध्याकाळी टिव्हीवर जे काही लागते ते कानावर मुद्दाम हेडफोन लावला तरी त्यातून झिरपत जाते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागत असल्याने ते अधून मधून दिसतही राहते>>>> अशी माझी स्थिती आहे. रुची तर जराही नाही. उलट ज्येनांचा रोष पत्करुन लाइव्ह शिव्या देणं ही करत असते. Happy

लेख आवडला.
ज्ये. ना. असलेल्या घराघरांतले टी. व्ही. सतत चालू असतात आणि बहुसंख्य मालिका त्यांच्याच ‘आश्रयाने’ चालतात. हे प्रत्येक भारतवारीत जाणवते. भरत यांनी जो व्यसनाचा उल्लेख केला आहे त्या मताशी सहमत!
आपण आवर्जून भेटायला जावे तरी टी. व्ही चालूच Happy त्या आवाजाशी जुळवून घेत कसाबसा संवाद होतो. कधीकधी आम्हालाच ‘स्टोरी’ ऐकवली जाते.
सेवानिवृत्तीमुळे हाताशी असलेला मुबलक वेळ किंवा वयोमानाप्रमाणे आजारपणामुळे घराबाहेर हिंडण्या-फिरण्यावर आलेल्या मर्यादा आणि मालिकांची अहोरात्र उपलब्धता अशी ही परस्परांना पूरक व्यवस्था बनून गेली आहे. मालिकांच्या दर्जाविषयी कोणालाच आस्था नाही. यांत आणखी गृहिणींची भर. असो.
यापूर्वी मालिकांसदर्भात एका धाग्यावर मालिकांच्या प्रेक्षकवर्गाविषयी चर्चा झाल्याचे आठवते. बहुधा ‘बेफिकीर’ यांनी धागा सुरू केला होता. चुभू द्या घ्या.

पण आवर्जून भेटायला जावे तरी टी. व्ही चालूच ---- येणारे आपापल्या सवडीने येणार म्हणून ज्येना नी स्वतःचे रुटीन बदलावे की काय!

येणारे आपापल्या सवडीने येणार म्हणून ज्येना नी स्वतःचे रुटीन बदलावे की काय!>>>
राजसी, हा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला?! कै च्या कैच!!!
आधी फोन करून , वेळ ठरवून नेहमी संबंधितांच्या आणि इतर कुटुंबियांच्या सोयीनेच भेटायला जातो. असोच. तुमच्या शंकांना उत्तरं द्यायला मी बांधील नाही.
अतुल, अवांतराबद्दल क्षमस्व.

लेख विचारात पाडणारा आहे. त्याच्या बाजूने आणि विरोधात बरेच मुद्दे डोक्यात आल्याने ठाम मत काही तयार होत नाहीये. तरी न्यायालयीन बंदी इ. कोणी उपाय म्हणून सांगत असेल तर ते तितकंच अघोरी आणि चुकीचा पायंडा पडणारं असेल. मोराल पुलिसिंग करण्याचा हक्क आपल्याला कुणी दिला असं सध्यातरी वाटतंय. बाकी ज्येना नी त्या वेळात काय करावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. इथे दोषारोप करण्यापेक्षा तुम्ही त्यांना नेफ्लि चं व्यसन कसं लावता येईल ते बघा. Wink
ब्रेकिंग बॅड राहून राहून आठवते आहे. चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण न करता इंटेन्स मालिका कशी असावी याचा वस्तुपाठ होती ती. नायकाच्या स्थिती बद्दल वाईट वाटलं तरी सहानुभूती वाटत नाही, रादर घृणा वाटते.
तुपारे मी एकही भाग बघितलेला नाही. इथे वाचून आत्ता कथानक समजले.

इथे मालिकांचे एवढे धागे, त्यात सहभागी होणारे ज्येना किती?
ज्येनांचा विषय अस्थानी आहे.

भयंकर तुपारे साठी आकर्षक धागे, त्यावरील आकर्षक प्रतिक्रिया, आणि हे सगळं वाचत बसण्याच अती आकर्षण काही केल्या कमी होत नाही हो....;) Wink Wink

चंद्रा ++
ज्येष्ठ नागरिक झालेले काका, मामा, आत्या, मावशी वगैरे लोक आई बाबांकडे तक्रार करतात, तुमचा मुलगा विदेशात जाऊन आम्हाला विसरला साधा दोन-चार महिन्यातून साधा फोनही करत नाही. फोन करावा तर हे लोक त्या टीवीवरच्या मालिकेचा आवाज सुद्धा कमी करत नाहीत की टीवीपासून लांब जात नाहीत आणि आपण तीन-तीनदा तेच पुन्हा रिपिट बोलत बसा.
मागे गंमतीत असेच एका काकांना म्हणालो तुम्ही आयुष्यभर नास्तिक होता पण त्या जय-मल्हार की काय मालिकेसाठी केवढा जीव तुटतो तुमचा. Proud
आता फोन केला तरी येत नाहीत काका फोनवर Lol

तीन-तीनदा तेच पुन्हा रिपिट बोलत बसा. >> Biggrin
अरे तुला नाईटकिंग मरताना किंवा रेड वेडिंग मध्ये कोणाचा फोन आला तर तू आवाज कमी करशील का? मी तर फोनच उचलणार नाही.
नास्तिकतेचं म्हणत असलास तर काय काय अचाट आणि अतर्क्य शिरेली नेफ्लिवर बघतो मी. लॉस्ट सुद्धा बघितली आहे!

अरे, आपली पिढी अतिशहाणी, तत्वांचा र्‍हास झालेली आणि निर्लज्ज्यच आहे त्यामुळे आपण कसेही वागलेले चालते. Proud
पण समंजस, चार जास्तीचे पावसाळे बघितलेल्या पिढीतल्या लोकांनी तत्व सोडून कसे चालेल.. म्हणुन आपण आठवण करून द्यायची. Wink

आइकडे तर ब्रेक मधे चॅनेल बदलुन दुसर्‍या सिरियलचा ट्रॅक पण ठेवला जातो,रेसिपी पण आवर्जुन बघितल्या जातात आणी विशेश म्हणजे आवडली तर ट्राय करण्याचाही उत्साह आहे.
आपल्याला बिनडोक वाटणार्या सिरियल ते विरगुळा म्हणुन बघु शकतात यात मला तरी बरच वाटत कारण अस काही न आवडणारे, कमी बोलणारे जेश्ठ नागरिक मग उगाच आतल्या आत कुढत बसतात, माझी चौकशी केली नाही, मला फोन केला नाही, भेटायला आले नाही अस विचार करुन खतावतात.
(भारतात टिव्हीचे आवाज मोठे असतात आपण फोन करतो तेव्हा आधी अ‍ॅनॉयिन्ग वाटायच मग काय चक्क मोकळेपणाने सान्गाय्च , आवाज कमी करा नाहितर दुसर्‍या खोलित जा .)

माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही सुट्टीला रिकामटेकडे म्हणून भारतात आलात, तुम्हाला आता इथे वेळ घालवायला काका/मामा प्रेमाचे भरतं आलंय म्हणून त्यांनी त्यांची रोजची व्यवस्था बाजूला ठेवायची का? जेव्हा ते एकटे असतात, काही कारणांनी त्यांना लोकांची, मनुष्यबळाची गरज असते तेव्हा तुम्ही तुमची कामं सोडून येता का?

बाकी, असे संवाद आमच्याकडे होतं नाहीत असा गैरसमज नको, पण त्यात दोषारोप करण्यासारखं काय आहे.

धागा भलत्याच वळणावर जातोय. ज्येष्ठ नागरिकांचं एकटेपण, अमेरिका भारत वगैरे ज्वलंत मुद्द्यांसाठी वेगळा धागा काढा.
माझा मुद्दा होता, ज्येष्ठ नागरिकांमुळे आम्हांला भंगार मालिका बघायला लागतात ही एक सबब सांगितली जाते.
त्याच पोस्टमध्ये आम्ही मालिकेची पिसं काढायला ती बघतो, असंही सांगणार्‍यांबद्दल लिहिलंय.
टीव्हीवर नाही पाहिलं तर कालचा भाग किती जास्त भंगार होता हे नेटवर जाऊन पाहिलं जातं.
ही भंमार मालिका कधी संपतेय ? तिला नावं ठेवून कंटाळा आला ? नवी भंगा र मालिका आली की तिला नावं ठेवायला मजा येईल...इ.इ.
येणारी मालिका कशी आहे हे न पाहता, प्रोमो दिसला रे दिसला की धावत येऊन मायबोलीवर त्या मालिकेसाठी पायघड्या अंथरल्या जातात..
( तीन बोटं वाल्या लोकांसाठी - मी अपवाद नाही. पण बदल केला आहे. गेलं वर्षभर आमच्याकडे एकही हिंदी चॅनेल नाही. सध्या एकच मराठी चॅनेल आहे. ज्ये ना ची काहीही तक्रार नाही.
आई फक्त मालिकांतल्या बायकांचे कपडे बघून त्यांची लाज शरम काढत असे. बाबांना ते बघत असलेली मालिका चकवा लागल्यासारखी फिरून फिरून त्याच जागी येतेय हे लक्षात आणून दिल्यावर त्यांचीही हरकत नव्हती. या वयात ते पुस्तकं वाचून संपवू लागलेत. शिवाय स्पोर्ट्स चॅनेल्स आहेत_)_

ज्येष्ठ नागरिकांमुळे आम्हांला भंगार मालिका बघायला लागतात ही एक सबब सांगितली जाते.>>> अहो खरी सबब आहे ओ ही. Sad

राजसी, एखादवेळेस कुणी पाहुणे भेटायला आले तर टीव्ही बंद न करता तुम्ही रीकामटेकडे म्हणुन आलात म्हणुन मी टीव्ही बंद का करु हा अ‍ॅटीटुड महान आहे.

व्हिडीओ ऑन डिमांड नसेल आणि स्टोर करण्याची काही सोय नसेल आणि रिपीट टेलिकास्ट प्रकार नसेल आणि आवडीचं उत्कंठा वर्धक काही असेल किंवा लाईव्ह काही असेल तर आपण काय करू हा मनाशी विचार करा. जर उत्तर हो असेल तर दुसऱ्याच्या कंडिशन वेगळ्या आणि तुमच्या वेगळ्या इतका तोळामासा फरक आहे.
नाही असेल तर प्रश्नच मिटला.

गाडी तिकडेच वळतेय तर - त्या मालिकांमध्ये महिनोन्महिने काहीही होत नसतं. एक (किंवा अनेक) भाग नाही पाहिला तरी पुढचं कळणार नाही, असं होत नाही. पण यात हक्काची, भावनिक गुंतवणुकीची अशा भावना येतात. सगळा दिनक्रम टीव्हीभोवतीच बांधलेला असतो.

आता याचं कारण बोलणारं कोणी नसतं किंवा बोलायला तयार नसतं हे असेल. टीव्ही हा सगळ्यात जवळचा नातलग होतो. अनेक कुटुंबाचं जगणं टीव्ही केंद्रित झालं आहे. नवरा बायकोंत, आजी नातवंडांत टीव्हीवरून भांडणं होतात.

वाकडी वाट करून एकट्या राहणार्‍या ज्ये.ना.ला भेटायला जावं आणि फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याची बातमी तासभर बघावी लागावी, त्यात त्यांचे तेच तेच शॉट्स पुन्हा पुन्हा आणि अरे पुढचं काही दाखवत का नाहीत, म्हणून चिडचीड ऐकावी हा अनुभव घेतलाय. त्यात त्यांना टीव्हीचा आवाज मोठा लागतो.

म्हणजे एकीकडे आमच्याशी बोलायला कोणी नाही , तर दुसरीकडे कोणी आलं तर टीव्हीतले माझे आप्तेष्ट दूर कसे करू असं होतं.

बरोबर आहे...
मला एवढंच म्हणायचं होतं की गेम ऑफ थ्रोन्स मध्ये सेक्स आणि हिंसा आहे म्हणून मी बघू नये असं मला कोणी सांगितलं तर जसं आवडणार नाही तसंच ज्येना नी काय बघावं ते त्यांनी ठरवावं. समाजमनावर यामुळे विपरीत परिणाम होतोय का काय याचा विचार करत बसू नये. तारतम्य अर्थात कुवती/ परिस्थिती नुसार पाळावे.

हो सस्मित. आवडला नसेल/ पर्सनल वाटत असेल तर माफ करा.

हो सस्मित. आवडला नसेल/ पर्सनल वाटत असेल तर माफ करा.>>> नाही तसं काही नाही.

तारतम्य अर्थात कुवती/ परिस्थिती नुसार पाळावे.>>> तारतम्य!

ज्ये ना हा मुद्दा असुच शकत नाही.पण टाईमपास व्हावा. म्हणुन का होईना तुपारे सारख्या सिरियली घरोघरी पाहिल्या जातात. आणि सवयीमुळे टिव्हीवर/नेटवर सिरियल्स पाहिल्या जातात.

Pages