वारसदार! - भाग ६ - पहिला वार!

Submitted by महाश्वेता on 20 July, 2019 - 12:10

भाग - ५
https://www.maayboli.com/node/70687

स्वातंत्र्ययुद्ध जोरात चालू होतं. जहालांच्या कृतीला मवाळ पक्षाच्या भाषणबाजीची साथ होतीच.
क्रांतिकारकांच्या गोळ्यांना सरकारी अधिकारी बळी पडत होते, आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या गोळ्यांना जनता...
अशीच एके दिवशी फितुरीमुळे मराठवाड्यातील क्रांतिसूर्य समरसिंह यांची धरपकड झाली!
समसिंहाला त्याकाळचा पोलीस अधिकारी अँड्र्यूसमोर उभं करण्यात आलं. अँड्र्यू हा खेळ आणि पैजांचा मोठा शौकीन होता.
योगायोगाने त्याच वेळी अँड्र्यूसमोर एक फितूर अधिकारी सरकारी खजिन्यात अफरातफर केल्याच्या आरोपाखाली उभा होता.
अँड्र्यूने एक खेळ खेळवला...
दोघांसमोर एक एक रिव्हॉल्वर ठेवण्यात आली, आणि रिव्हॉल्वरमध्ये एक एक गोळी भरण्यात आली.
ज्याची गोळी आधी चालेल तो जिंकणार, असा साधा हिशेब होता.
"गो," अँड्र्यूने आवाज दिला...
समरसिंहाने विद्युतवेगाने बंदूक घेतली अन...
...अँड्र्यूवर गोळी चालवली.
सर्व पोलीस अवाक होऊन बघतच राहिले...
आणि समरसिंह खिडकीबाहेर उडी टाकून पसार झाला...
◆◆◆◆◆
"प्रियरंजन बाबू?"
"क्या काम था?"
"रुई कि बोरिया आई है, मुंबई से."
"रुको!"
तो माणूस आत गेला.
"जाने दो अंदर!"
विनायकने ट्रक आत नेला. 
प्रियरंजन बंडोपाध्याय! नावाप्रमाणेच आडवातिडवा पसरलेला माणूस. एका सोफ्यावर एकटाच मावेन इतका! 
ट्रक बघताच त्याचे अजस्त्र गाल हलले, आणि विनायकला तो हसण्याचा भास झाला.
"भालो!!!" त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
◆◆◆◆◆
बाटल्या उतरवण्याचं काम सुरु झालं. विनायक तिथल्याच एका ठोकळ्यावर टेकला.
प्रियरंजन त्याच्या जवळ आला.
"तुमि शुंदोर काम करता है, एक बॉटल अंदर नाही आता, तुम ट्र्क लाये. शुंदोर! खाली बॉटल भी लेके जाना है. फिर उसको भरके तुमि लाना. चोलो खाना खाते है!"
जेवणानंतर प्रियरंजनने त्याच्या हातात साठ हजार रुपये टेकवले!
"कलकत्ता आना वापीस!"
विनायकने त्याला नमस्कार केला, आणि तो निघाला.
"सुनो." प्रियरंजनने त्याला आवाज दिला.
विनायक मागे वळला...
"ये तुमारे लिये," त्याने खिशातून हजार रुपये काढले, आणि विनायकच्या हातावर टेकवले.
विनायकने पुन्हा नमस्कार केला आणि तो निघाला.
"प्रियरंजनबाबू, हजार रुपिये!" मुन्शी डोळे विस्फारून बघत होता.
"आजतक बंगालमें पुलिस को घूस खिलाये बगैर ट्र्क नही आया मुन्शीजी. और लडके ने एक रुपया बक्षिशी नही मांगी! पैसा काम का नही, दिमाग और हिम्मत का है. लडका बहोत आगे जायेगा..."
◆◆◆◆◆
मजल दरमजल करत विनायक मुंबईला पोहोचला. 
"आ गया शेर," इस्माईल त्याच्याकडे बघत म्हणाला. 
विनायकने एकसष्ट हजार रुपये त्याच्यासमोर ठेवले. 
नोटा मोजतंच तो म्हणाला, "याकूब, इसको अभी बडे माल के लिये लेके जाना पडेगा."
विनायक तिथून निघाला.
"सुन, इसमे हजार रुपया ज्यादा है?"
"बक्षीस दिलं मला."
"फिर तू रख लेने का ना!"
विनायकने थोडावेळ विचार केला, आणि म्हणाला...
"हजार रुपये आप रख लिजिए, और सबसे बडा दाव मुझपे लगायीये."
इस्माईल जोरजोरात हसला आणि म्हणाला.
"आज शाम को ही खेलेंगे!"
◆◆◆◆◆◆◆
'समुंदर हॉटेल,'
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा अड्डा...
"सलाम इस्माईलभाई," इस्माईलची पावले आत पडताच कॅशियर अण्णा उठून उभा राहिला.
"अण्णा, नवीन छोकरा आलाय धंद्यात." इस्माईलने विनायककडे बोट दाखवलं.
"नाव काय रे तुझं?"
"अनिरुद्ध साळगावकर!"
इस्माईलने चमकून विनायककडे बघितले, आणि तो गालातल्या गालात हसला.
"इस्माईलभाई, काम करेगा ना?"
"आजही प्रियरंजनसे मिलके आया है, जिंदा!!!"
आता चमकण्याची पाळी विनायकाची होती.
"त्या बंगाल्याबरोबर डील करूनही जिवंत असेल, तर पोरगा कामाचा आहे." अण्णा म्हणाला.
"इस्माईलभाई, काय होतं हे?" विनायक रागाने पुटपुटला.
"जा टेबलपे जाके बैठ." इस्माईल हसत म्हणाला.
टेबलासमोर दोन खुर्च्या होत्या. आजूबाजूला बरीच गर्दी होती. 
"तो आज मेरा छोकरा, अनिरुद्ध!" इस्माईलने पुकारा केला, आणि विनायक एका खुर्चीवर जाऊन बसला.
"मेरा लडका, अली." एका माणसाने आवाज दिला.
कृश शरीरयष्टी, डोळे खोल गेलेले. रंगवलेले केस, तोंडात माव्याचा तोबरा, रंगवलेले केस, भडक कपडे या वेशात विनायकसमोर तो येऊन बसला...
त्याच क्षणी दोघांसमोर दोन रिव्हॉल्वर आल्या...
"दोनोको एक एक बार ट्रिगर दबाना होगा, जिसकी गोली पहले दुसरे को मारेगी, वह जित जायेगा. रिव्हॉल्वर मै बस एक गोली है!"
इस्माईल विनायकच्या मागे होता.
"अकिला और शकिला, दोनो सामने आवो."
दोन भडक कपड्यातल्या मुली समोर आल्या.
"दोनो तुमको रास्ता दिखायेगी. रास्ता सही या गलत ये तुमको चुनना होगा."
"मै अकिला को चुनता हूँ!" अली म्हणाला.
विनायकच्या बाजूला शकीला आली.
अकिलाने अलीला काजळ देऊन दोन बोटे दाखवली.
शकीलाने विनायकला लालभडक गुलाब देऊन दोनचा इशारा केला.
विनायकच विचारचक्र अतिशय वेगाने चालू झालं....
काजळ आणि दोन बोटे. काळे काजळ, काळ!'
दोनचा अर्थ म्हणजे, दुसऱ्या शॉटला काळ येईल?
मात्र त्याचा की आपला?
लालभडक गुलाब, लाल...
रक्त!
पण रक्त त्याचं निघेल की आपलं?
काहीही होऊ दे, दुसऱ्या शॉटला काहीतरी होणार होतं...
कुणाच्यातरी रिव्हॉल्वर मध्ये दुसऱ्याच शॉटला गोळी होती.
विनायक पूर्णपणे भांबावून गेला होता.
पण जर समजा आपला दुसरा शॉट आधी गेला तर?
विनायकच्या डोक्यात वीज चमकली.
...त्याचक्षणी अली उठला, आणि त्याने ट्रिगर दाबला.
खट!!!!!!!
वार खाली गेला होता...
अली हताशेने जागीच कोसळला...
आता दुसरा शॉट आधी अलीचा येईल.. म्हणजे...
माझं मरण अटळ???
त्या क्षणी विनायकच्या डोळ्यासमोर सगळा जीवनपट चमकून गेला...
"अनिरुद्ध, तेरी बारी, दबा ट्रिगर!!!" इस्माईलने आवाज दिला...
आणि विनायकने बंदूक रोखून ट्रिगर दाबला.
धाड!!!!!!!!!
अली जागीच खाली कोसळला...
"हुरर्रे, शाबास!!!!" आरोळ्या फुटल्या...
विनायक सुन्नपणे बसून राहिला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान
मला पहिल्या गोष्टीवरून वाटले तो इस्माईल ला मारेल,

हींट दुसऱ्या शॉट ची का दिली पण,जर गोळी विनायकच्या बंदुकीत होती तर जर त्याने आधी मारली असती तर पहिल्याच शॉट ला अलीचा काळ आला असता
बहुतेक मागच्या भागाचा संदर्भ असावा की काही संकेत फसवे असतात

मस्तच चालले कथा.
पण माझ्या छोट्याशा मेंदू मध्ये ते शॉट च काही घुसलं नाही.... पुढील भागात समजेल बहुतेक.

मला वाटतं, कुणाच्या एकाच्या किंवा दोघांच्याही रिव्हॉल्वर मध्ये दुसऱ्याच शॉटला गोळी असावी आणि अलीने जेव्हा ट्रिगर दाबला तेव्हाच विनायकने ट्रिगर दाबून आपला पहिला शाॅट मुद्दाम वाया घालवला असावा तो अलीच्या ट्रिगरच्या खट आवाजामुळे कोणाच्या लक्षात आला नसावा.
खरे काय ते पुढच्या भागात कळेलच.
कथा चांगली आहे, कृपया अर्धवट सोडू नये ही विनंती.
पुढच्या सर्व लेखनाला शुभेच्छा.