राजकारणात असे का घडते..

Submitted by ashokkabade67@g... on 19 July, 2019 - 11:12

भारतात निवडणुका म्हणजे आरोपांची बरसात आणि आश्वासनांची खैरात असते.मागील निवडणूक जींकण्यासाठी भजपने विरोधी पक्षांवर इतके आरोप केले आणि आश्वासन ही दिले की हे सारे नेते जेलमधे टाकून त्यांची चौकशी करु. जनतेलाही वाटले की बरे झाले या देशात कुणीतरी या नेत्यांना धडा शिकवणार. म्हणुन जनतेन भाजपला बहुमत देऊन सत्तेवंर आणल .मलातर वाटल की आता काँग्रेसचे सारेच नेते शिक्षा भोगायला जेलमधे जातील पण झाले उलटेच काँग्रेसचे अनेक नेते भाजपत गेले आणि मंत्री झाले. अस का घडल हा प्रश्न मी माझ्या बिजेपीतील एका मीत्राला विचारला तो म्हणाला आरे बाबा तुला नाही कळणार यालाच राजकारण म्हणतात. पण प्रश्न माझ्या मनात कायम आहे?

Group content visibility: 
Use group defaults

सगळ्या जनतेला मोहराचा सुनील शेट्टी बनवून झोलावाला फकीर नासहृददिन शहा बनलेला आहे.

ह्याला कमळ पक्षाचा catwalk म्हणतात.

https://www.maayboli.com/node/70689.

कर्नाटकाच्या मांडीवर कमळ पक्ष्याची अंडी आली का?

अशोक भाऊ नेहमी प्रमाणे राजकारण आखाड्यात पिल्लू सोडून देतात व ते कसे वाढते याची मजा पाहतात.

लोक लबाडी का करतात?
पोलीस सगळ्या चोरांना पकडून का नेत नाहीत?
एखाद्या बदमशाला पकडले तर न्यायालयात पुरावा का मागतात?

आजवर कुठल्याच पक्षाच्या बाबतीत अध्यक्ष तडीपार आणि उपाध्यक्ष पदी भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचा आरोप असलेली व्यक्ती एकाच वेळी पदं भूषवीत आहेत असे झाले नव्हते. ते ही पहायला मिळाले.

शशिकांतजी मी स्वतालाच पडलेले प्रश्न मांडत असतो व आपल्या साऱ्या मींत्रांकडुन आलेल्या प्रतीसादातुन मला त्या प्रश्नानवर निरनिराळे मतप्रवाह लक्षात येतात त्यामुळे कुठल्याही प्रश्नावरील लेख हा परीपूर्ण होत असतो ,मला काय वाटते यापेक्षा जनमानस काय आहे हे लक्षात येते.आता यापुढे आपणही आपले खरे मत प्रामाणिकपणे मांडा म्हणजे एखादा लेख लिहतांना मला आपली मदतच होईल.

प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे

ल्या

शशिकांतजी मी स्वतालाच पडलेले प्रश्न मांडत असतो व आपल्या साऱ्या मींत्रांकडुन आलेल्या प्रतीसादातुन मला त्या प्रश्नानवर निरनिराळे मतप्रवाह लक्षात येतात त्यामुळे कुठल्याही प्रश्नावरील लेख हा परीपूर्ण होत असतो ,मला काय वाटते यापेक्षा जनमानस काय आहे हे लक्षात येते.आता यापुढे आपणही आपले खरे मत प्रामाणिकपणे मांडा म्हणजे एखादा लेख लिहतांना मला आपली मदतच होईल.

प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे

ल्या

धागा कर्त्याने वेळोवेळी विषयावर गाडी वळवावी. राजकीय धाग्यावर प्रतिसाद वैयक्तिक होऊन योग्य चर्चा होत नाही. हेच म्हणतो.

<<<मला वाटतं की राजकारणी लोकांना पक्ष महत्वाचा नसुन सत्ता महत्वाची असते. मग ती काँग्रेस कडुन मिळो वा बीजेपी कडुन.>>>
शिवाय खरे बोलणे, वचनपूर्ति इ. गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. सत्तेसाठी, पैशासाठी वाट्टेल ते अपकृत्य करणे चालते आजकाल. राजकारणी आपल्या माहितीचे होतात, पण इतर लोक कोण आहेत हे आपल्याला कळत नाही.

सरळ आहे राजकारण हा पोट पाण्याचा व्यवसाय आहे जसे बाकीचे व्यवसाय आहेत .
गिऱ्हाईक कसे पटवायचे आणि आपला फायदा करून घ्यायचा ह्या साठी पेच डाव पेच करावे लागतात .
राजकारणी बाकी समाज घटकांपेक्षा काही वेगळं करत नाहीत .
शेवटी ते सुद्धा ह्याच समाजाचा हिस्सा आहेत