अतृप्त पाऊस

Submitted by Pradnyas on 18 July, 2019 - 12:35

मिहीरातूनी वर्षासरी
भरभरून बरसताना
थेंब न् थेंब ती पिते त्वचेने
मुखावर अलवार झेलताना

जलधारांचा स्पर्श असा
अतृप्त करून सोडणारा
अनुभवला जरी कितीही
तरी हवाहवासा वाटणारा

भिजण्यात चूर ती असताना
नभ ते निरभ्र होई
निष्पाप त्या नयनात तिच्या
अवघी नीलिमा येई

अन् मग ती त्या नभास पुसते
थांबलास का रे असा अचानक
बरसशील का पुनः एकदा
मन तृप्त नाही झाले अजून

भिजून तुझ्यात विरताना
शंकुतला ही माझी झाली
स्वतःस तृप्त करतांना
त्या दुष्यंताची भुरळ पडली

परी नको तू विसरूस असे
तुझे नी माझे चांदल नाते
कृष्णवर्णी त्या मेघांना
दुष्यंत होऊन बरसू दे

पण दुर्वासांच्या त्या शापापरीस
तुझा नी माझा विरह न व्हावा
जरी तसे घडलेच काही
तर त्या विरहाचा त्रास न् व्हावा

प्रज्ञा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users