फुलपाखरांचे ब्युटी पार्लर

Submitted by Dr Raju Kasambe on 18 July, 2019 - 10:49

फुलपाखरांचे ब्युटी पार्लर

एक होता सुरवंट
होता तो गलेलठ्ठ

दोनच कामे त्याला आवडत
झोपावे किंवा असावे मस्त हादडत

खाऊन खाऊन वजन वाढले
चालणे गेले वळवळणे राहिले

आई त्याला रागवत असे
चांगल्या गोष्टी सांगत असे

झालास लठ्ठ खाऊन खाऊन
चारदा झाली त्वचा बदलवून

खा खा खातोस पाने फुले
बघून तुला घाबरतात मुले

जाणे जरुरी लठ्ठोबा आता तुम्हाला
निसर्ग देवीच्या ब्युटी पार्लरला

असे आयुष्य कुठवर कंठणार
बनून नुसतेच खुशालचेंडू

वळवळ करीत सुरवंट गेला
कोशातील ब्युटी पार्लरला

बंद होते दार ब्युटी पार्लरचे
गुपित कळेना आतील जादूचे

अनेक दिवसांच्या मेहेनतीने
कमाल केली निसर्ग देवतेने

कुरूप गलेलठ्ठ सुरवंटाचे
बाहेर पडले सुंदर फुलपाखरू

वळवळ आता करायला नको
पाने फुले खायला नको

मुक्तपणे भिरभिरते विहरते
रंगीत फुलातुन मधुरस चाखते

ब्युटी पार्लरची ही किमया आम्हा कळेना
फुलपाखरू भिरभिरे, मग सुरवंट का उडे ना?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान कविता.
सुरवंट बाळ चिडले. कुटीचे दार लावले, आणि तपाला बसले.
परी राणीला आली दया. जादूच्या कांडीने केली किमया.
सुरवंटाचे रूप पालटले . फुलपाखरू बनून बाहेर आले.
मला सुचलेली अजून एक कल्पना. कृपया हलके घ्या.

छान.