एक रात्र मंतरलेली भाग 3

Submitted by छोटी on 16 July, 2019 - 03:09

#कथा

#एकरात्रमंतरलेली
©अर्चना चौधरी

एक रात्र मंतरलेली भाग 2 https://www.maayboli.com/node/70628

एक रात्र मंतरलेली भाग 3

जीजू बोलत असतानाच जोराचा आवाज झाला...कोणालाही काही कळायच्या आत....म्हणजे जे जागे होते त्यांनाच काही कळलं नाही तर झोपलेच होते त्यांची काय गोष्ट... गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आणि ती ताकद काय असते.. पाणी किती ताकदवान असत सगळ्यांचा प्रत्येय एकत्रपणे त्या बसला जाणवणार होता... भयानक आवाज करत बस पाण्यात पडली... पण तो तेवढा आवाज त्या पाण्याच्या आणि पावसाच्या मुसळधार आवाजात कुठेसा विरून गेला.... पण तो आवाज बसमधल्या जाग्या असणाऱ्या माणसाला सांगून गेला की ही नुसती रात्र नाही तर काळरात्र आहे.... पाण्याचा जोर खुपच खतरनाक होता... वरून पाऊस मुसळधार... सगळ्या काचा फुटल्या.. कुठलाही बार नसल्यामुळे केशव आणि जीजू बसच्या बाहेर फेकले गेले... बाकी बस कुठे वाहुन गेली हे ही समजेना... पाण्याच्या जोराचा हा प्रत्येय अनाकलनीय होता... त्यां दोघाचं त्याच्यावर काहीच ताबा नव्हता... कधी गोल गोल, कधी आडवं तिरके, हात पाय आपल्याला आहे किंवा आपल्या वाचायचं असल्यास आपल्या काही करावं लागेल हेही न कळण्याच्या पलीकडे ते गेले होते... पाण्याचा जोर त्यांना हेलकावात वाहून घेऊन जात होता.... दोघंही कुठल्या कुठे वाहून चालले होते..नाकातोंडात पाणी... डोळ्यांना काही दिसत नव्हतं... झुडुपांमध्ये मधून जाताना शर्ट फाटून जखमा होत होत्या... पाण्यामुळे शरीरच बधिर होत चाललं होतं......पण इतक्या ठिकाणी आपटला होता वाहता वाहता...की त्या वेदनामुळे भानावर आला केशव... तेवढ्यात हेलकावत असताना समोर एक झाड आलं...झाड म्हणजे झाडाचा शेंडा... म्हणजे पाणी किती होता त्याचा अंदाज आला त्याला... त्याने तो शेंडा धरून ठेवायचा प्रयत्न केला...पण पाण्याला खुपचं जोर होता... शेंडा सुद्धा सुटला... आणि तो एका लाकडावर आपटला... ते लाकूड मात्र त्याने पकडून ठेवलं... आणि आधार शोधायला सुरवात केली...दूरवर एका ठिकाणी काही झुडूप दिसत होती... त्याने लाकूड धरून त्या ठिकाणी जायचं ठरवलं.....पण जलदेवतेने मात्र परीक्षा घ्यायची ठरवली होती... केशव जेवढी मेहनत करत होता तेवढा तो लांब फेकला जात होता... आणि हे काही कमी होत म्हणून जोरात पाण्याचा लोंढा आला.... केशव फार जोरात फेकला गेला... आणि झाडात तो पूर्णपणे अडकला... जागोजागी खूप जखमा झाल्या... पाणी वाहत होत त्याने तर जखमा झोंबत होत्या... तो खुप कळवळला आणि जोरात किंचाळला.. आई $$$$आई$$$$$ ग....कोणीतरी मदत करा... जीजू जीजू... कुठे आहात... जीजू$$$$... काळ्यामिट्ट अंधारात काहीच दिसत नव्हत... राघव$$$ ...जानू$$$ मदत करा ... राघव राघव... please मदतीला ये... जानू जानू... बाप्पा ... सांग ना त्यांना... मला मदत हवी आहे... पण आवाज पाण्यात हरवला... दूर दूर पर्यंत कोणी दिसतही नव्हतं आणि दिसणार ही नव्हतं..... त्याच्यासाठी जणूकाही तोच शेवट होता...

---–--------–-------–---------------------------–--------–-------–-----------------------------------–-------–-------------
आत्ता नदीच्या अलीकडे

एकंदरीत परिस्तिथी बघता NDRF(national disaster response force), नौदल, costgaurd ना पण पाचारण केले... बचाव कार्य कसं करायचं ह्यावर बोलणी चालू झाली .... पावसाची संततधार आणि होणारा अंधार त्यामुळे कसं कार्य करायचं ह्यावर विचारविनिमय चालला होता . डॉक्टरांनी मेडिकल camp setup करायला सुरुवात केली.... राघव आणि जान्हवी त्यांना join झाले....त्यांना जमेल तशी मदत करणं चालू होते.. एव्हाना बातमी सगळीकडे पसरली होती.. बऱ्याच पत्रकारांनी राजाजी bridge कडे गर्दी तर केलीच पण काही हौशी नागरिक सुद्धा आले .. पोलिसांना अनेक प्रश्न विचारून विचारून हैराण करत होते... पोलिसांची अर्धी कुमक तर ह्यांना आवरायला जात होती... त्यात काही पत्रकारांना राघवची गाडी दिसली... "ही गाडी कोणाची? इथे का उभी आहे? कोण आहेत? काय आहेत?" एका bite साठी प्रश्नाची सरबत्ती चालू केली.... पण ह्यामुळे अस झालं की त्या पोलीस इन्स्पेक्टरला म्हणजे सर्जेरावना जाणीव झाली की त्यांना काही माहीतच नाही आमच्याबद्दल.... त्यांनी त्या लोकांना तिथेच सोडलं आणि राघवच्या मागे येऊन राघवला आवाज दिला
"ओ मिस्टर, नमस्कार...."
"नमस्कार सर" राघवने वळुन खूपच नम्रतेने उत्तर दिलं.. तिथेच त्यांचा पोलिसी खाक्या संपला... खुप सौम्य भाषेत त्यांनी विचारलं
" मला कळेल का? तुम्ही इथे कसे व तुम्हाला कसं कळलं ब्रिज वाहून गेला ते? तुम्ही कसे बचवलात? ह्या घटनेशी तुमचा संबंध कसा?"
राघवने आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या... कसे आम्ही केशवला शोधायला निघालो, बस डेपोशी बोलायला थांबलो ... त्याची गाडी late झाली... गाडीचाही काही पत्ता लागत नाही आहे... त्याने सगळं खरं खरं सांगितलं... खोटं सांगण्यासारखा काही नव्हतंच मुळीतर...
" सर, मी आणि माझी बायको... फक्त ह्या एकाच कारणासाठी इथे आहोत... आम्हाला आमच्या मित्राला मदत करायची आहे...कुठे आहे?...कसा आहे?..काहीच माहिती नाही... पण त्याला आम्हाला घरी न्यायचा आहे... त्यासाठी जे काही प्रयत्न लागतील ते करतो आहे." राघवने आपली बाजू त्यांच्यासमोर मांडली...पोलिस माणसं ओळखण्यात इतके पारंगत असतात... आणि आमची धडपड आल्यापासून ते बघतही होतेच ...
" सर, please आम्हाला मदत करा... आमचा मित्र संकटात आहे... त्याला मदतीची गरज आहे... बचावकार्य चालू करा ... कितीवेळ पाण्यात असेल काय माहिती... त्याला मदत करा" मी मध्येच त्यांना आणि राघवलाही अचानक पणे सांगितलं...
" अग, हे काय नवीन" राघव जवळजवळ किंचाळला..."तो असेल पलीकडे... आपल्याला फक्त त्याला contact करायचा आहे" त्याच्या आवाजातला अविश्वास स्पष्ट समजत होता..
"राघव,तो पलीकडे असता तर एव्हाना कोणालातरी पकडून मोबाईलवरून त्याने त्याच्या घरी कळवलं असतं... पण तसं झालेलं नाही... आणि मला तुझं नाही माहिती पण मला सतत जाणवतय, तो मदत मागतो आहे...आपल्याला आवाज देतोय... खुप वाईट परिस्थितीमध्ये आहे तो... आपल्याला त्याला मदत करायला पाहिजे...सर, त्याला मदत पाहिजे ... कोणीतरी मदत करा यार " माझा इतक्या वेळचा धैर्याचा असलेला बांध फुटला आणि मी रडायला लागली..
"सर , आमच्यावर विश्वास ठेवा.. आम्हाला मदत करा.. आमचा मित्र खूप प्रॉब्लेम मध्ये आहे... सर आम्ही पाया पडतो सर..." एवढं बोलून ती सर्जारावांच्या पायावर पडली... "He is in trouble... Need help... सर पाण्यात कुठेतरी झाड आहेत... तिथे अडकले आहेत ते" मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होती"
"हे बघ दीदी, तु रडू नको आणि उठ आधी... strong माणसांनी रडायचं नसतं... आपण सगळेच जण प्रयत्न करतो आहे बरोबर... हेलिपॅड पण बनवलं..मेडिकल कॅम्प तिथेच जवळ सेटअप केला ना ...तुम्ही दोघंही होतात की नाही.. पाण्याची जी काही परिस्थिती आहे... त्यात आपण होडी नाही, coastguard कोणालाच पाण्यात उतरवू नाही शकत... आपल्याला वाट बघावी लागेल... हेलिकॉप्टरने एक राऊंड मारला पण कोणीच नाही दिसत आहे...पहाट होइपर्यंत वाट बघणं हाच एक पर्याय आहे..."
" नाही सर " मी जवळ जवळ किंचाळली
"सर,नाही ... एव्हढ्यावेळ कसा तग धरेल तो... किंवा कोणीही... त्याला जिवंत वाचवायचं असेल तर आता मदत करावी लागेल... सर please please विश्वास ठेवा ना..." मी केलेले आर्जव सर्जा सरांच्या मनाला साद घालणारे होते..
" सर, आम्हाला माहिती आहे आम्ही जे काही सांगतो आहे त्याचा पुरावा काही नाही... पण आतापर्यंत तीच म्हणणं खरं ठरलं आहे... काहीतरी करूया ना???" राघवने माझा हात घट्ट ठरत... त्यांना माझी बाजू अजून चांगल्या पद्धतीने सांगितली
"मी बघतो काय करता येत ते" म्हणत ते बचाव टीम कडे गेले...
"जानू, तु एकदम बरोबर करते आहे... मला केशवचे सिग्नल मिळता आहे पण मी कुठेतरी मनाला सांगतो आहे... की तो आहे सुरक्षित ... पण बहुदा हा खोटा दिलासा थांबवायला पाहिजे मी... तू म्हणते ते एकदम बरोबर आहे... तो सुखरूप असता तर घरी कॉन्टॅक्ट केलाच असता... पण त्याला मदत पाहिजे... मी आहे तुझ्याबरोबर आहे... will give 100%... आज खरंच save our soul... SOS request येते आहे.. lets respond with full strength...एकच सांगायचं त्याला 'जाने नही, देंगे तुझे... जाने तुझे, देंगे नही'.... belive on urself जानू... सिग्नल miss नको करू त्याचे... concentrate कर.. कुठे आहे ते कळतं का बघ... if u want to do mediation ... Will do that... " राघवाचा विश्वास बघुन मी रिलॅक्स झाली...आम्ही दोघांनी इतक्या वेळ मनातल्या मनात चालू असणारा मृत्यूनंजय मंत्राचा जाप मोठा मोठयाने एकत्र करायला सुरुवात केला
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥

क्रमशः

भाग 4 (अंतिम) finale

Coming soon

Group content visibility: 
Use group defaults

वाचतेय.

प्रत्येक वाक्यानंतर तीन टिंब ऐवजी एकच दिला तर चालेल असे वाटते.

त्यांच्याकडे जास्तीचे टिंब असतील.
पण टिंब्यांची बचत करायलाच पाहीजे.

पुढच्या गोष्टीच्या वेळेस लक्षात ठेवेन... आता टाकते 4था भाग