आज नको ना लिहायला?

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 July, 2019 - 00:35

माझ्याकडे नाही आज ,
एखादी गोष्ट ऐकवायला,
ना एखादा किस्सा आहे सांगायसारखा
बस काही चुरगळलेली पाने आहेत, डस्टबिन शेजारी पडलेली
त्यांना आता त्यांच्या अंगावर पेनाची खरखर नकोय
ना हवाय शाईने तयार झालेला ओलावा
ओल्या काँक्रीटच्या एकटेपणात, डायरीच्या पानातला गुलाब तेवढा दरवळतोय
पण पाने कोरीच आहेत, टाईप रायटरही धूळ खात पडलाय
त्याच्या किबोर्ड वरची अक्षरे अजूनही वाट पाहतायत
कुणीतरी त्यांना त्यांच्या क्रमाने लावायची
समोर पडलेल्या 'दा विन्सी कोड' ला पाहून
भिंतीवरची 'लिओ' ची मोनालीसा
मध्येच हसत आहेे, तर कधी मध्येच रुसते आहे
तीच गूढ नाही उघडणार मी
बॅकग्राऊंड ला 'बॅकस्ट्रीट बॉयझ' च गाण वाजतय
“आय वॉन्ट इट द्याट वे”
खरच काय हवंय मला लिहायला
आता कॉफीही थंड होतेय
हे सगळे सांगतायत मला
आज नको लिहुस,
आज नको ना लिहायला?
©प्रतिक सोमवंशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Dhanywad.

लिहा

नका लिहू

लिहिलेत तर आम्ही वाचणार

नाही लिहीलेत तर नाही वाचणार

अरे हाय काय

अरे नाय काय

एक माबोकर

Happy

khup chan

याला प्रसंग वर्णन म्हणतात, मुक्तछंद चा प्रकार आहे एक. इथल्या लोकांना कळला नाही असं वाटतंय.