निसर्गचित्रे

Submitted by मिकी on 14 July, 2019 - 04:41

कोणत्याही दोन वा अधिक रांगापासून कित्येक छटा बनू शकतात आणि मानवी डोळा सुमारे १ कोटी विविध छटा पाहू शकतो. अशा प्रत्येक दोन समान भासणार्‍या छटांमध्ये निसर्गाने फार सूक्ष्म फरक ठेवला आहे. हा फरक जाणून त्या छटांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न मी करीत आहे.

मी अलीकडेच काढलेली जलरंग माध्यमातील ही दोन चित्रे आहेत.: लाल चाफ्याचे फूल (Plumeria rubra) आणि शोभेचे पान. खालील चित्रे आपणांस कशी वाटली हे जरूर कळवा.

1st.jpg2nd.jpg
अशा प्रकारची चित्रे आपल्याला आवडत असल्यास माझ्या इन्स्टाग्राम आर्ट पेजला भेट द्या व फॉलो करा. (https://www.instagram.com/sensing.nature/)
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच !
( पण 'निसर्गचित्र ' landscapeला व याला 'still paintings' म्हणणं अधिक योग्य नाहीं होणार ? )

@ भाऊ नमसकर,
हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद! आपली शंका नक्कीच योग्य आहे. Botanical illustrations नावाचा हा प्रकार सध्या मी शिकत आहे. तो चित्रकलेप्रमाणेच विज्ञानाकडे झुकतो कारण त्याद्वारे कठीण वनस्पतीशास्त्रीय संकल्पना चित्राच्या माध्यमातून सोप्या करून दाखवल्या जातात व ते चित्र वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीकोनातून योग्य असणं आवश्यक असतं. 'निसर्गचित्रे' हे नाव मी सहजच दिलं! याला still painting म्हणता येणार नाही कारण सावली व प्रकाश यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही.

मिकी, फारच सुंदर
Botanical illustrations बद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल

स्वाती पोतनीस, ऋतूराज ,
धन्यवाद! हा अभ्यासक्रम भारतात कुठे शिकावला जात असेल असं मला वाटत नाही. uk,ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणची colleges हा कोर्स ऑनलाइन घेतात. मी सध्यातरी skillshare website वरून शिकत आहे आणि इथेही खूप चांगल्या प्रकारे शिकवतात.