दिल्ली व आग्रा ट्रिप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 13 July, 2019 - 05:15

आम्ही या दिवाळीत दिल्ली व आग्रा येथे जाणार आहोत(५ दिवस). दिल्ली व आग्रा येथील बघण्याची ठिकांणांची माहिती कृपया द्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी, मिसेस आणि मुलगा (११ वर्षे) तिघेच जाणार आहोत. पुण्याहून किंवा मुंबई वरून सुटणाऱ्या सगळ्या रेल्वेला बरेच वेटिंग आहे. पुण्यातून दिल्लीसाठी विमानाचे भाडे खूप आहे म्हणून पुण्या पेक्षा मुंबई वरून विमानाने जाण्याचे ठरवत आहे, त्यामुळे विमानाचे भाडे कदाचित कमी लागेल, विमानचे नक्की झाले कि पहाडगंजमध्ये महाराष्ट्र मंडळाजवळ गिजरे ट्रावल्स ला फोन करून त्यांचा टूर प्लॅन विचारणार आहे.

नाही, घाबरावत नाही. पण एक दोन प्रश्नांवरून समजलं की फारच तयारी करावी लागेल. ( उदाहरणार्थ दिल्लीसाठी गाड्या मुंबई च्या कोणत्या स्टेशनवरून सुटतात वगैरे)

मीसुद्धा त्रिवेंद्रमला गरीबरथ पकडताना फसलो आहे. तिकडे गाडी कोशुवेली स्टेशनवरून सुटते. मी विचार केला मुंबईचं कुर्ला किंवा बान्द्रा टर्मिनस तसं कोशुवेली असेल. गेलो एका प्यासेंजरने दोन रुपयांत. रिक्षाचे सत्तर रु वाचवल्याचा आनंद कोशुवेलीला उतरल्यावर स्टेशनमास्तरने उतरवला. नशीब आंगठे धरून उभे नाही केले. "कौन बोला इदर आने को?"
कारण - गरीबरथ गाडी पंधराव्या रुळावर पलीकडे उभी होती आणि मध्ये चार मालगाड्या साईडिंगला पार्क केलेल्या होत्या. मी आणि एक अण्णा असे दोघेच जण होतो. तिकडे ओवरब्रिजही नव्हता. तर आम्ही दोघे मालगाडी डब्यांखालून पलिकडे जाईपर्यंत मास्तर बघत उभा राहिला. तोपर्यंत सिग्नल देणार नव्हता.
एकूण स्वत: जाण्यात गमतीदार प्रसंगही घडतात आणि देशबांधवांशी संपर्क वाढतो.

गिजरे ट्रावल्सचा प्लान इथेच देऊ शकतो आणि त्यांचे बुकिंग पुण्यात घेणाऱ्या लिमये बाईंचा फोन नंबरही. पण खूप जुना आहे, खात्री करावी लागेल. (नंतर संध्याकाळी देतो)
साप्ताहिक सकाळमध्ये गिजरे ट्रावल्सची जाहिरात असते अधुनमधून

गिजरे ट्रावल्स यांचं अधिकृत नाव - साइट महाराष्ट्र ट्रावल्स

साइट नवीन केली आहे. फोन करून पुण्यातले एजंट आणि प्लान विचारा. आम्ही फार पुर्वी गेलो आहे यांचेतर्फे. त्यांनी शेजारच्या इमारतीतल्या हॉटेल मौर्यमध्ये रुम बुकिंग करून दिलेली. दिल्ली फुल डे ट्रिप केली. (09:00 ते 04:30)
जयपुर वनडे ट्रिप केलेली. (06:00 ते 22:00) ताण पडतो, सिटी पलेस गाळतात. आग्रा येथे जाऊन राहिलो आणि ताज पाहिला. तिथूनच रेल्वेने परत.

दिल्लीमधे मेट्रो खूपच सोयीची पडेल. मी व माझी मुलगी दोघीच जणी गेल्या वर्षी गेलो होतो. सर्व ठिकाणी मेट्रोनं गेलो. अगदी जिवाची दिल्ली केली. करोल बाग, चांदणी चौकात मनसोक्त शाॅपिंगही केलं. पैसे व पर्सची वगैरे डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. गर्दीत मुलीचा हात गच्च पकडला होता कायम. Happy

आग्र्याला मात्र जरा काळजी वाटली. तिथे ओला/उबर नाही. दिल्लीहून ट्रेनने आग्र्याला गेलो. तिथं दोन दिवस हाॅटेलचं बुकींग केलं होतं. ताजमहालापासून अडीच तीन कि. वर आमचं हाॅटेल होतं. प्रिपेड रिक्षानं आग्रा स्टेशनपासून हाॅटेलला आलो. आग्र्याचा किल्ला आणि ताजमहाल असं टॅक्सीचं पॅकेज हाॅटेलवाल्यानं दोन हजार रु सांगितलं होतं पण आम्ही स्टेशनवरून येताना जो प्रिपेड रिक्षावाला ठरवला होता तो चांगला वाटला म्हणून त्याला विचारलं तर 200 मधे तयार झाला. मग त्यालाच घेऊन सगळीकडे हिंडलो.

ताजमहालसाठी आम्ही जो गाईड ठरवला त्यानं चारशे पासून सुरुवात केली मग तीनशेमधे तयार झाला. नंतर कसलंसं त्याचं तिकीटही आम्हालाच काढायला लावलं. एकंदरीत फारच फसवाफसवी आहे तिथं गाईड प्रकारात. आपण दिसलो रे दिसलो की झुंबड उडते त्यांची. खूप वात आणतात. पण चांगला गाईड मिळाला तर चांगली माहिती मिळते. ते फोटो काढायला चांगल्या जागा, पोझेस वगैरे सुचवतात. फोटो पण चांगले काढून देतात. Happy
त्याच रिक्षावाल्याच्या भिस्तीवर आम्ही साउंड आणि म्युझीक शो पण पाहीला. रात्री नऊ नंतर रिक्षानं परत आलो. GPS ऑन करून ठेवायचं म्हणजे आपण बरोबर रस्त्यानं जातोय हे आपल्याला समजतं.

फत्तेपूर सिक्रीला पण आम्ही त्याच रिक्षानं गेलो. टॅक्सीवाल्यानं साडेतीन हजार सांगितले होते पण ह्या माणसानं सातशेचं पॅकेज सांगितलं. आम्ही फ. सि च्या जवळ आलो तैव्हा मात्र दोन तरुण मुलांनी आमच्या रिक्षाचा पाठलाग केला आणि रिक्षा थांबवली. त्यातला एक जण आमच्या रिक्षाच्या आत बसला. आम्ही घाबरलो होतो. मग त्यानं सांगितलं की त्यांच्याकडे गाईड म्हणून अधिकृत लायसन्स नसल्यामुळे त्यांना त्या परिसरात थांबता येत नाही म्हणून ते रस्त्यात गाठून गाईड म्हणून त्यांना घ्यावं म्हणून भाव करतात. काहीच्या काही हजार दोन हजाराची बोली करतात. मी सांगीतलं की आम्ही अनेकदा आलो आहोत त्यामुळे गाईडची आवश्यकता नाही. ते बहुदा त्यांना पटलं आणि त्यांनी आमचा नाद सोडला. फ. सि ला आल्यावर पुढे एका बसने वर किल्याकडे जावं लागतं. त्या बसमधे बसायच्या आधीपासूनच आपल्याला कोणी ना कोणी गाईड म्हणून टॅग करायला लावतोच नाहीतर बसमधे बसूही देत नाहीत. तिथं ह्या गाईड लोकांनी टेरीटरी वाटून घेतली आहे. बसमधे बसण्यापासून ते वर फतेहपूरचा तो किल्ला, परिसर, मशीद, पाठशाला वगैरे दाखवलं आणि तो गाईड गुल झाला. तिथं बाजूला असलेला राजवाडा, जोधाबाईचा महाल, स्वैपाकघर वगैरे गोष्टी दाखवल्याच नाहीत. तिथं परत नव्या गाईडनं नवे पैसे घेतले. फुटाफुटाला फसवतात. काहीही खोटंनाटं कमिट करतात.
अकबर जायचा ती मशीद दाखवण्यापूर्वी, तिथं चादर चढवायची असते ती खरेदी करा असं सांगून तिथल्याच एका माणसापाशी आम्हाला उभं केलं. तिथं तो हजार रु. पासून चादरीची किंमत सांगायला लागला ....आम्ही आम्हाला नको आहे असं निक्षून सांगितलं आणि काहीही न घेता आत गेलो. खरं तर आम्हाला आत जायची इच्छाही नव्हती पण ते नेतातच. घाबरवण्याचा उद्देश नाही पण फ. . सि. ला नक्कीच सावध रहा.

दिल्ली आणि आग्रा इथे फिरताना अनेक ठिकाणी गाईडची आता गरज नसते.
कुतुक मिनार, लाल किल्ला, हुमायूंचा मकबरा, ताज महाल, पुराना किला इथे पुरातत्त्व खात्यातर्फे ऑडिओ गाईड भाड्याने मिळतात. इयरफोन कानाला लावून ते सांगतील तसं फिरायचं. उत्तम माहिती असते. आपण हवं तेव्हा हवं तिथे थांबू शकतो. ऑडिओसेट परत केला की डिपॉझिट परत मिळतं. फार मस्त सोय आहे ही.

चिनुक्स हे कधी सुरु झालं? आम्ही गेल्याच वर्षी गेलो तेव्हा ताजमहाल आणि फ.सि ला असं काही नव्हतं. ही सोय सुरु झाली असेल तर चिंताच मिटली.

२००७ साली दिल्लीला गेलो होतो. हुक्की आली. डायरेक्ट मुंबई विमानतळ गाठलं. स्पाईसजेटचं दोन तासांनी विमान होते. रात्री अकरा वाजता पोहोचलो. दिल्लीची काहीच माहिती नव्हती. रात्री विमानतळावर झोपलो कुणीच काही बोललं नाही. सकाळी चौकशी करून हॉटेल बघायला सुरुवात केली. खूप महाग. एकाने सांगितले पहाडगंज भागात स्वस्त लॉज आहेत. बसने दहा रुपयांत जवळजवळ पंचवीस किलोमीटर अंतरावरील पहाडगंज स्टेशनवर सोडलं. सायकल रिक्षा वाल्यानं दहा रुपयांत लॉजवर सोडलं. पाचशे रुपये भाडे. जेवण पंचवीस रूपयात भाजी व पाच रूपयात पराठा, दहा रुपयांत कुठेही छान छोले भटुरे मिळत होते.
मला फक्त औरंग्याचा दिवान इ खास नि दिवान इ आम बघायचं होता. जिथे शिवबानं औरंग्याची इज्जत काढली होती. फार छोटे दरबार वाटले. मग चार पाच दिवस इकडं तिकडं फिरलो. चांदणी चौकात खरेदी केली. मग आलो परत झेलम पकडून. एकटा गेलो पण काहीच त्रास झाला नाही. तेव्हा फार स्वस्त वाटली होती दिल्ली.

मेधावि,
ही सोय किमान २०१४पासून उपलब्ध आहे.

चिनुक्स,
तसं असेल तर कठीणच आहे कारण आम्हाला फतैहपूर सिक्रीला आलेले अनुभव मग यायला नको होते.

ही वेबसाईट बघा -

http://asimustsee.nic.in/

इथे राज्याप्रमाणे स्थळं आहेत. तिथे ऑडिओ गाईड आहे की नाही, हेही दिलं आहे.
फतेहपूर सिक्री लिस्टीत दिसत नाहीये, पण ताजमहाल आणि आग्र्याचा किल्ला आहेत.

साधारण १०-१२ वर्षापुर्वी दोघी मैत्रिणी गेलेलो. फतेहपूर सिक्री खरतर छान जागा आहे पण गाइड लोकांची फार अरेरावी चालते. अगदी गुंडांसारखे आजुबाजूला वावरतात. तिथे गेल्याचा पश्चाताप झालेला. भिक नको कुत्रा आवर अशी परिस्थिती होती.
>> इथे पुरातत्त्व खात्यातर्फे ऑडिओ गाईड भाड्याने मिळतात. इयरफोन कानाला लावून ते सांगतील तसं फिरायचं. >> हे मस्त! परत जावेसे वाटतय! Happy

आग्र्याच्या किल्याबाहेर शिवाजी महाराजांचा दिमाखात उभा असलेला अश्वारूढ पुतळा पाहून ऊर अभिमानानं भरून आला होता.

अजून जाण्याबद्दलच चर्चा चालली आहे म्हणून गाईडबद्दल लिहिलं नाही. मी अगोदर हिस्ट्री चानेलवरचे विडिओ पाहतो. माहितीपत्रके आणि नकाशे रग्गड आहेत. इंडिया टुअरिजमच्या माहिती पुस्तिका.
शिवाय लोनली प्लानिटची जुनी पुस्तकं (२०००च्या अगोदरची) सर्वोत्तम. मग गाईड लागतच नाही. सिटी बसनेच फिरतो. कोणीही ढुंकुनही पाहात नाही आपल्याकडे. कोणताही त्रास होत नाही.
ओटो/ट्याक्सी हायर केलीत की फसलात हे नक्की. सगळी कमिशनची साखळी असते. हॉटेल, दुकानदार,गाईड,ड्रायवर,भिकारी, पंडे,.
मथुरा वृंदावन येथे कुठले सात जन्मातले पितर रुसलेत त्यांचे सांत्वन फक्त इथे होते (२५०/५००/१००० भरून.) कारवाला प्रथम इकडेच नेतो. तिथे वेळ जातो. ते झाले की पंड्याच्या जावयाच्या मंदिरात भावि पिढीसाठी आशिर्वाद घ्यायचे. मजा असते. घाबरला की संपला.
((आजच्या मटामध्ये जयपुरमधल्या ठिकाणांचे प्रवेश शुल्क आलेत ते पाहा.

बरोबर शरद जी. मी अतिशय कमी खर्चात बरेच प्रवास केले आहेत. जूनी माणसं म्हणायची देवानं तोंड कशाला दिलंय. विचारले तर लोक सांगतातच. हैदराबाद ला अनोळखी लोकांनी घरी नेऊन आदर सत्कार केला होता. एकदा रेल्वेप्रवास करताना शिक्षकानं त्याचा डबा दिला होता व आम्ही एकत्र खाल्ला.

<दिल्ली आणि आग्रा इथे फिरताना अनेक ठिकाणी गाईडची आता गरज नसते.
कुतुक मिनार, लाल किल्ला, हुमायूंचा मकबरा, ताज महाल, पुराना किला इथे पुरातत्त्व खात्यातर्फे ऑडिओ गाईड भाड्याने मिळतात. इयरफोन कानाला लावून ते सांगतील तसं फिरायचं. उत्तम माहिती असते. आपण हवं तेव्हा हवं तिथे थांबू शकतो. ऑडिओसेट परत केला की डिपॉझिट परत मिळतं. फार मस्त सोय आहे ही.>>

+१ आम्ही असेच केले.
चांदनी चौक ला जात असाल तर एकदा पराठे वाली गल्ली चाखून या! Happy

अगोदर माहिती मिळवून जाण्याने खूप सोपं जातं. ऐतिहासिक सनावळ्या, कोणी कधी बांधले, लढाया याचे बम्बारडिंग ऐकत पाहण्यापेक्षा वाचून जाणे चांगलं.
(( साऊंड लाईटशोमध्ये कितीही बोअरिंग आवाजात ऐकलं तरी एकूण वेळेत बसवणे अवघडच जातं. आणि ते शो अंधार पडल्यावरच सुरू होतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट नसतो. वाहन भाड्याने घ्यावे लागते. त्या ठिकाणी संध्याकाळी जावं लागतं किंवा दोनदा जावं लागतं. उदाहरणार्थ ग्वाल्हेर किल्ला शक्य नाही. ))

आमचं अत्तर उद्योगाचे एक वर्शा आड कन्वे न्शन भरतं ते २००८ का ९ साली आग्र्याम धे होतं . लेक त्यामानाने लहान होती. कन्वेन्शन मध्ये अर्लि बुकिंग केल्याने आग्रा ट्रायडंट जिथेच इव्हेंट होता तिथे रूम मिळाली. व ट्रेन तिकिटा त पण कन्सेशन मिळाले. मस्त एसी कुपे करून घर असल्यासारखे हैद्राबाद ते आग्रा गेलो. कोणती ट्रेन आता आठवत नाही. मजा आली होती.

मग आग्र्याला सर्व लोकांच्या बायका मुलांचा एक गृप मिळून आम्ही ताज महाल बघितला. चाल चाल चाल लो. ताजमहाल जवळ एक शॉपिन्ग ची जागा आहे. तिथे केळीच्या सोपटापासून व ज्युट पासून बन वलेल्या साड्या आहेत. व मार्बल इनले कसे केले जाते ते प्रात्यक्षिक दाखवतात.
व वस्तू उपलब्ध आहेत. महाग पण बघायला छान. मी फार शो पीसेस वगिअरे घेत नाही त्यामुळे नुसतेच बघितले.

जानेवारीत कन्वेन्शन असल्याने खाण्याची जाम लयलूट होती. आटीव दूध जलेबी, इतर नमकी न पराठे अन काय काय, रात्री करमणूक म्हणून चक्क मुजरा ठेवला होता. पण मुलगी लवकर झोपेला आल्याने मला बघता आला नाही. पन ती गायिका नर्तकी खरेच फार सुरेख दिसत होती.

कन्वेन्शन संपल्यावर हॉटेलातूनच टॅक्सी करून दिल्लीस गेलो तिथे नातेवाइकांकडे राहून दिल्ली दर्शन केले व खादाडी, आपला माबोकर भगिनिंचा एक गट ट्रेक वरून आला होता त्यांना भेटले. मेट्रो करून जाउन आले. एकदम सोपे आहे फिरणे.

एकदा दिल्ली जय पूर दिल्ली पण केले आहे. पण तेव्हाही मुलगी लहान अस्ल्याने लगेच कं टाळायची किंवा वैतागायची दमायची मग तिला झेपेल तेव्ढे करून परतलो. जयपूर पण सुरेख आहे. चार पाच दिवस हातात हवेत.

आग्र्यामध्ये रशिद अहमद हे डी ई डेस्टिनेशन एक्स पर्ट आहे. त्यांचा नम्बर व एमेल देतो . त्यांच्याशी बोला आणि पॅकेज नक्की करा. आम्ही दिल्ली विमान तळापासून त्यांची इनोव्हा घेतली होती ती पुन्हा दिल्लीत येइपर्यन्त . व्हाया मथुरा वृन्दावन. अतिशय डिसेन्ट सुशिक्षीत व्यक्ती आहे. सर्व सेवाबाबत व्यवस्थित माहिती देतात. ठरल्यापेक्षा एक पैसाही जास्त घेत नाहीत . तुमचा प्रोग्राम ठरवायला मदत करतात. आवश्यक त्या टिप्स देतात उदा: मथुरा/ वृन्दावनला ठाकुरजी म्हणजे किसन देव दुपारी १२ ते ५ पर्यन्त अंमळ लवन्डलेले असतात त्यामुळे देवळे बन्द असतात. या काळात तुम्ही तिथे पोचले की काहीही उपयोग होत नाही. वर कुणीतरी फरेह पूर सीकरी टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुळात तुम्हाला कशात रस आहे यावर ते अवलम्बून आहे. प्रशिक्शीत गाइड्स इतिहास आणिवास्तुरचनेतील बारकावे समजावून सांगतात मग त्या दगडांनाही अर्थ प्राप्त होतो. ताज्महाल पाहून भ्रमनिरास झालेलेही लोक आहेत. पण माझ्या मते तिथे एखादा आर्कितेक्चर चा जाणकार गेला तर महिनाभर देखील त्याचा अभ्यास आणि रस पूर्ण होनार नाही इतके बारकावे आहेत. आग्रा किल्ल्याला प्रत्येक दालनाला इतिहास आहे तो कळला नाही तर केवळ दगडाधोंड्यातून फिरून आल्यासारखे वाटते.
रशिद अहमद
Phone–+919837221623

Email–rashidnaz@rediffmail.com

naziyababy46@yahoo.com
http://www.myshatours.in/about-us.php ही साइट आहे.
फोनवरही बोलून ठरवता येते . याच नम्बरवर व्हाट्स अप आहे.

वाहने हॉटेल गाइड इ सर्व सोय करून देतात. तिथे जगातल्या सर्व मुख्य भाषातील पुरातत्व खात्याने अधिकृत इतिहाअसाचे प्रशिक्षण दिलेले गाइड्स आहेत. आयटेम वाइज अथवा त्यांच्या पॅकेज प्रमाने ठरवून मिळते. आम्ही अनुभव घेतला आहे. ताज पहायला सहाच्या आतच जावे . नाहीतर तिकेटाच्या आणि प्रवेशाच्या लाइनीत खूप वेळ जातो....

चांदनी चौक ला जात असाल तर एकदा पराठे वाली गल्ली चाखून या! Happy

आम्ही गेलो होतो फारच ओव्हर हाइप्ड आनि गचाळ भाग आहे.

आग्र्याच्या किल्याबाहेर शिवाजी महाराजांचा दिमाखात उभा असलेला अश्वारूढ पुतळा पाहून ऊर अभिमानानं भरून आला होता.

>>
आम्हाला शिवाजी महारजाना कैदेत ठेवलेली रूम पहायची होती. पण गाइड सकट कोनालाही त्यारूमचीच काय पण शिवाजी महाराजांचीही माहिती नव्हती. मुळात आग्रा किल्याचा ७५ टक्के भाग आर्मीच्या ताब्यात आहे आणि त्याणी भिंती बांधून त्यांच्या कडच्या भागातील प्रवेश बण्द केलेला आहे. त्यामुळे एका गार्ड्ने म्हटले कदाचित आर्मीच्या भागात ती रूम असू शकते. मात्र किल्ल्याच्या दरवाजातच हा मोठ्ठा पुतळा आहे....

ताज, आग्रा किला किंवा दुसऱ्या प्रसिद्ध ठिकाणांचे डॉक्यु विडिओ युट्युबवर आहेत ते पाहून जाणे हे उत्तम.
ज्या हॉटेलात राहिलो त्याच्या काउंटरवरच सर्व सोय होते हा गैरसमज काढून टाकावा. तिथूनच सर्व फिक्सिंग चालू होते. ओटोवाल्यांचे सर्व ठिकाणी कनेक्शन असते. "सबसे अच्छा पेठा यहीं मिलता है।" कमिशन चालू.
यातलेच मिक्स पेठ्यांचे खोके आग्रा स्टेशनातही स्टॉलवरही असतात.
ताजला साडेपाचला संध्याकाळी प्रवेश बंद होतो, तीन -चारला गेलात तर गर्दी नसते. सहासाडेसहापर्यंत आत पाहता येते. सगळ्या टुअरवाल्यांची सकाळीच पर्यटक आणण्याची धडपड असते.

आम्ही गेल्या महिन्यातच Delhi Agra अशी टूर करून आलो. Delhi Agra मधे फसवतात असे खूप ऐकले होते आणि थोडा अनुभव सुद्धा आला. आम्ही 5 दिवस कार बुक केली होती - इनोवा. Airport वरुन पिकप केले आणि पाचव्या दिवशी एरपोर्ट ला परत सोडले - 14,000 भाडे होते. कदाचित महाग पडले असेल पण सोय खूप झाली.

वृंदावन ला काळ्या नागाच्या मंदिरात नेले आणि सांगितले 51,000 चा नवेद्य दाखवा आणि 41 दिवसात सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही फक्त 200 रुपये दिल्यावर पंडित ने आदळ आपट केली. सगळे कनेक्टेड असते, आम्ही मराठी आहोत कळल्यावर बरोबर मराठी बोलणारा पंडित आणून बसवला.

51,000 चा नवेद्य दाखवा >>>> बापरे! एवढा मोठा नैवेद्य? त्यापेक्षा त्यात ५०० अनाथ वृद्ध्/बालकांना एक वेळचं जेवायला घालू म्हणावं. ते डायरेक्ट पोहोचेल देवाला.

Pages