दिल्ली व आग्रा ट्रिप बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 13 July, 2019 - 05:15

आम्ही या दिवाळीत दिल्ली व आग्रा येथे जाणार आहोत(५ दिवस). दिल्ली व आग्रा येथील बघण्याची ठिकांणांची माहिती कृपया द्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Delhi - india gate and nearby area, red fort, chandani chowk, Akshardham temple, kutub minar. Lotus temple. If time permits kingdom of dreams Gurgaon
Agra - Tajmahal, red fort. I suggest to go to Mathura which is on the way. Don't waste time in fatehpur sikri (my opinion)

दिल्लीला इंदिरा गाधींचं स्मारक बघा जमलं तर. त्यांचं तेव्हाचं घर जतन केलंय.
आग्र्यात ताजमहाल बघायला जाताना पहाटेच जा. गर्दी कमी असते. गाईड घ्या पण भाव आधी माहीत करून मग जा. काहीही मागतात.

आग्रा एक दिवस, मथुरा एक दिवस.

दिल्लीत रेल्वे संग्रहालय, हुमायूचा मकबरा. कुतुब मिनार, लोटस टेम्पल, त्रिमूर्ती भवन, सुंदर नर्सरी, जामा मशीद, निजामुद्देएन दर्गा.

दिल्लीत खूप काही पाहण्यासारखे आहे , जर इतिहासाची आवड असेल तर. अक्षरधाममध्ये दुपारनंतर जा, तिथे संध्याकाळी लेझर शो असतो, तो चुकवू नका. अक्षरधाममध्येही खूप काही पाहण्यासारखे आहे. म्हटले तर अख्ख्या दिवसाचे काम आहे. तुम्ही तुमच्या प्राथमिकता काय आहेत ते बघून निर्णय घ्या. चांदणी चौकात खादाडीसाठी चिनुक्सच्या लेखाची प्रिंट घेऊन जा गाईड म्हणून. Happy

दिल्ली 3 दिवसात पूर्ण बघून होईल आरामात. जंतर मंतर, कुतब मिनार वगैरे ठिकाणी गाईड घ्याच, नाहीतर जाऊन उपयोग नाही. लोटस टेम्पलला आत घेण्याचे बहुतेक दुपारी 3 लाच बंद करतात, त्यामुळे लवकर जा. आमचे हुकले.

आग्र्याला आदल्या दिवशी जाऊन मुक्काम करा व सक्काळी उठून 6 वाजता ताजच्या रांगेत उभे राहा. 6.30 ते 7.30 ताज निवांत बघा. आम्ही आधी निवांत ताज बघितला व नंतर उसळलेली प्रचंड गर्दी निवांत बघत बसलो. उन्हात अजिबात जाऊ नका, संगमरवरावरचे ऊन डोळ्यांना त्रास देते व आत कबरीच्या खोलीत उकडून जीव जातो. गाईडची अजिबात गरज नाही असे मला वाटले, तुम्ही घेऊ शकता. फतेहपूर सिक्रि करा, इतिहासाची आवड असेल तर.

लोकांचे ऐकून आम्ही मथुऱ्यालाही गेलो होतो, तिथे इतकी देवळे आहेत की नक्की कुठल्या देवळात कोण आहे हे कळत नाही. सगळेच कृष्ण. Happy Happy अतिशय चिंचोळ्या गल्ल्या व त्यात प्रचंड गर्दी यातून रस्ता काढत चालणे सोपे नाही. तिथले हाईजिन आपल्या मुंबई पुण्याच्या नजरेतून चांगले नाहीय, त्यामुळे तिथे खाणे आवडेलच असे नाही. अगदीच धार्मिक असाल तरच मथुरा करा. तिथली माकडे डोळ्यांवरचे चष्मे वगैरे खेचून पळतात, माझा पळवला Sad Sad … हातात केळी तयार ठेवायची, त्यांनी चष्मा पळवला की केळी फेकायची, मग ते चशमा फेकतात. चशमा पळवल्यावर हा सल्ला मिळाल्याने केळी नव्हतीच सोबत, शिवाय तिथे खूपच माकडे असल्याने केळीवालेही नसतात. त्यामुळे चशमा गेला तो गेलाच...

दिल्ली मेट्रो बेस्ट आहे फिरण्यासाठी. खाजगी गाडीची गरज पडणार नाही.

१) पण कोठून?
२) इतर हिमाचल, उत्तरांचल, ट्रिपा करताना दिल्लीचा धक्का असतो तेव्हा पाहावी.
३) दिल्लीला राहून जयपूर/आग्रा वन डे ट्रिप अजिबात करू नये.
४) मुंबईहून गरीबरथ. जयपुर सुपरफास्ट या गाड्या उत्तम.

दिल्लीतल्या (नवी) पहाडगंजमध्ये महाराष्ट्र मंडळाजवळ गिजरे ट्रावल्स ओफिस आहे. त्यांचे बुकिंग पुण्यातून कुणी लिमये बाई करतात.

हो.
बूकिंग करायला जेवढा वेळ लावाल तेवढे दरदिवशी दर वाढलेले दिसतील.

पुण्याकडच्या गाड्या बराच वेळ घेतात.
१) मुंबईकडून चारची गरीब रथ दिल्लीला दहाला पोहोचवते. हॉटेलात सामान टाकून अर्धा दिवसात कुतुबमीनार किंवा हाफ डे दिल्ली दर्शन. प्रत्येक ट्रिपमध्ये एकदोन जागा करता येतील.
खाणे : चाट, जिलबी वगैरे
२) आग्रा जाऊन राहा दोन दिवस. ताजमहाल ( शुक्रवारी बंद) अधिक आग्रा किला.
खाणे : पेठ्यांचे अनेक प्रकार चव एकच.
अधिक
मथुरा-वृंदावन किंवा भरतपुर पक्षी अभयारण्य किंवा फतेपुरसिक्री. ( ओटो रिक्षावाल्यांशी भाडे नक्की करा)

३) जयपूरला जाऊन दोन दिवस राहाणे. सिटी पलेस, जंतरमंतर ,आमेर किला.
खाणे : दालबाटी, रबडी
दुपारी दोनची जयपुर-मुंबई सुपरफास्ट बान्दरा सकाळी सातला. तिथून पुणे जाणे.
या दोन्ही ट्रेनचा प्रवास कंटाळवाणा होत नाही.
गरीब रथ मथुरेला सकाळी सातला जाते तिथून फतेहपुर सिक्री, आग्रा, भरतपुर, वृंदावन करता येईल.
एक प्रवास विमानाने करू शकता. भारतात पुढे बरेच फिरायचे असेल तर रेल्वे लागेलच.

बुकिंग साधारण किती दिवस आधी करावं. या महिन्यात करावं का?>>> करु शकता. दर दिवशी किंमती वाढत जातात. आज चेक केल्यावर जी किंमत असेल ती उद्या वाढलेली असते.

विमानाने किंवा रेल्वे ने जावे ते समजत नाही, रेल्वे ला बरेच वेटिंग दिसत आहे व विमानाचे तिकीट जास्ती आहे. आम्ही दिल्ली आग्रा ट्रिप प्लॅन करायला उशीर केला, मे किंवा जुने मध्ये ठरवायला पाहिजे होते. मुंबई वरून कोणत्या स्टेशन वरून दिल्ली साठी रेल्वे सुटतात.

शाळांच्या सुट्ट्या हाच सर्व पर्यटनाचा कमावण्याचा सीजन असतो.
दक्षिण भारत - जाने १५-फे १५
उत्तर भारत - सप्टेंबर १५-३०

मुंबई वरून कोणत्या स्टेशन वरून दिल्ली साठी रेल्वे सुटतात.>> मुंबई सेंट्रल. संध्याकाळची ५.३० ची मुंबई-राजधानी पकडा... एकदम सुपरफास्ट
(बडोदा-कोटा मार्गे) १५.३० तासात (सकाळी ८.०० ला) नवी दिल्ली स्टेशन..!

हल्ली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन देखील नवीन राजधानी सुरु झाली आही ती हजरत निझामुद्दीनला २०-२२ तासात पोचते (भुसावळ मार्गे)

मुंबई वरून कोणत्या स्टेशन वरून दिल्ली साठी रेल्वे सुटतात.
नवीन Submitted by राजेंद्र on 17 July, 2019 - 17:31
<<

हा काय प्रश्न आहे ?
Uhoh

Railways app - NTES
--------
Private _ railyatri, इतर बरीच.

लोटस टेम्पल नक्की बघा. सोमवारी बंद असते बहुतेक.

आम्ही खूप वर्षांपूर्वी गेलेलो. एका लोकल travel कडून दिल्ली दर्शन केलेलं आणि महाराष्ट्र मंडळ आहे, पहाडगंज पोलीसस्टेशनजवळ त्यांच्याकडून आग्रा, मथुरा, वृंदावन केलेलं. आता म मं चा पत्ता बदलला असेल तर माहिती नाही, तेव्हा तिथे होतं.

आता तुम्ही ठरवलेल्या तारखांना रेल्वे/ विमान तिकिटे नाहीत. पण एकूण काय डिटेल प्लान केला आहे हे सांगितलं तर काही टिप्स लोक सांगतील.

स्वतः जाणार आहोत म्हणजे तुम्हाला सतत जागरुक राहावे लागते. अचानक अडचणी येतात, प्लान बदलावा लागतो. सतत आजुबाजूस विचारणा करावी लागते. गटामध्ये लहान मुले, वयस्कर यांच्या आवडीनिवडी, कुवत पाहून जमेल तेवढे पर्यटन करावे लागते. काही वेळा तर दर्शन राहू दे पण परत येणे हे सुद्धा कसेबसे पार पाडावे लागते.
फार लोकांच्या जबाबदाऱ्या घेऊ नये आणि येणाऱ्यांंना कल्पना द्यावी लागते.
गट मोठा असला की हॉटेलवाले रुमच्या भाड्यावर अडून बसतात. शिवाय दुपारी चारनंतर रुमचे रेट काहीच्याकाही वाढवतात.
स्वत: गेल्याने ट्रिप स्वस्तात होते म्हणून बरेच जण जॉईन होण्यास उत्सुक असतात पण सावधान! तीन चार ओटो केल्यास शहरात हरवण्याची शक्यताही असते.
तुम्हास एखादा पुर्विचा अनुभव असेल तर उत्तमच. आग्रा ,दिल्लीत ओटोवाले लुबाडतात. लॉकरमध्ये मोबाईल, पर्स ठेवणे सावधान. इतर शहरांत मात्र फार मदत करणारेच लोक भेटतात.

Srd,
घाबरवू नका हो त्यांना!

राजेन्द्र,

मेट्रोचे अ‍ॅप डाऊनलोड करा. फार चांगली सोय आहे ती.
पहाडगंज, करोलबाग या भागांत हॉटेल बघा. पहाडगंज पोलिस स्टेशनासमोर महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांना फोन करून बूकिंग करू शकाल.

दिल्लीहून आग्रा, मथुरा अशी टूर असते. तुम्हांला स्वतः जायचं असेल, तर दिल्लीहून सकाळी शताब्दी एक्सप्रेस आहे. ताजमहाल, पुराना किल्ला असं बघून संध्याकाळी झेलमने परत दिल्लीस येऊ शकाल.

दिल्लीत रोज दोनतीन स्थळं बघता येतील. उदा., निजामुद्दीन दर्गा, सुंदर नर्सरी, हुमायूंचा मकबरा, झू अगदी शेजारी आहेत.
राष्ट्रपती भवनाचं नवं म्यूझियम झालं आहे. ते जरूर बघा. इंडिया गेट, त्रिमूर्ती भवन, इंदिरा गांधी यांचं घर हेही तिथून जवळच आहेत. त्रिमूर्ती भवनाहून रेल्वे म्यूझियम लांब नाही. नॅशनल म्यूझियमही जवळच आहे. ते जरूर बघा. तिथे ५-६ तास नक्की लागतात.
कुतुब मिनार, लोटस टेम्पल यांच्याजवळ मेट्रो स्टेशनं आहेत.
लाल किल्ला, सिसगंज गुरुद्वारा, चांदनी चौक यांच्यासाठी कश्मिरी गेट / चांदनी चौक मेट्रो स्टेशनं आहेत.

मेट्रोचं कार्ड घेतल्यास रोज तिकीट काढण्याची कटकट वाचते.

दिल्ली खरे तर मस्त आहे. भांडायची कधी पण तयारी हवी. पण टुरिस्ट ना ते काही करत नाहीत. दिल्लीत एक डॉल्स म्युझीअम पण आहे. मस्त आहे.
जुन्या सरकारी पद्धतीचे आहे. कोणी बारकी पोरे बरोबर असल्यास नक्की बघा. सर्व देशांतल्या बाहुल्या आणून ठेवल्या आहेत. जनपथ वर शॉपिन्ग करा. पंढारा रोड ला पण कबाब वगैरे मस्त मिळतात. मेट्रो चांगली आहे आपल्या मुंबई लोकल पेक्षा.
दिल्ली हाट मध्ये सर्व देशा तील हस्तकला वस्तू मिळतात व साड्या सूट्स वगैरे.

Pages