जोशी ३७७ कांड

Submitted by थॅनोस आपटे on 12 July, 2019 - 10:53

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन मंत्री प्रदीप जोशी यांची एक दृकश्राव्यफीत सध्या समाजमाध्यमांमधे व्हायरल झालेली आहे. ही फीत आपण पाहिलेली आहे असे गृहीत धरले आहे. याची लिंक मागू नये कृपया. (मायबोली हे त्यासाठी योग्य व्यासपीठ नव्हे)

जोशी हे वयस्कर इसम आहेत. त्यांना पदावरून निलंबित केले आहे असे समजते. त्यांचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. तो मुलगा सज्ञान आहे किंवा नाही याची कल्पना नाही. दोघांमधे शारीरिक संबंध असल्याचे फीतीवरून समजतेच आहे. सध्या या बाबत जी नवीन माहिती पुढे आली आहे त्यावरून हा मुलगा जोशींच्या प्रेमात होता. मात्र नंतर बदनामीच्या भीतीने जोशींनी त्याला टाळायला सुरूवात केली. त्यामुळे तो सतत फोन करू लागला. जोशींनी फोन करून ठेवला. मात्र त्याने इतर मार्गाने संपर्क ठेवला. कदाचित संबंध उघड करण्याची धमकी दिली.

यानंतर तो मुलगा बेपत्ता आहे. त्याच्या मित्रांचा असा आरोप आहे की त्याचा खून झाला असावा. त्यामुळेच त्या मित्रांनी ही फीत व्हायरल केली आहे असे बोलले जात आहे. या बाबतीत भारतीय जनता पक्ष किंवा संघपरिवाराने प्रतिक्रिया दिलेली नाही. मुख्य माध्यमांत सुद्धा त्याची बातमी नाही.

एका स्थानिक वृत्तपत्रात बातमी आलेली आहे. हे प्रकरण कदाचित पेटण्याची शक्यता दिसते.
पण या घटनेवरून अनेक प्रश्न उभे ठाकतात.

१. कुणाचे वैयक्तिक संबंध कसे असावेत याकडे पाहण्याचा भारतीय समाजाचा दृष्टीकोण कधी बदलणार ?
२. समलैंगिक संबंध उघड होण्याची भीती का वाटावी ?
३. काही वर्षांपूर्वी उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा या संदर्भातील कायदा दुरूस्तीला प्रचंड विरोध होता. हे अनैतिक आणि अनैसर्गिक आहे असे त्यांचे म्हणणे होते. तसेच या विषयावरून पुरोगामी मंडळींची गलीच्छ टिंगल करण्यात देखील ही मंडळी व्यस्त असायची.
४. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची देखील टर उडवण्यात कट्टरवादी उजव्या विचारसरणीचे लोक पुढे होते.
५. आज मात्र याच विषयावरून समाजमाध्यमांमधे चर्चा चालू असताना या संघटनांकडून ३७७, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या समर्थनार्थ मुद्दे येत आहेत. हा सकारात्मक बदल समजायचा की कातडीबचाव धोरण समजायचे ?

एकूणच निरोगी मानसिक समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने आपण कुठे आहोत याचा विचार या निमित्ताने व्हायला हवा.
बाकी गुन्हेगारी घटनांचा तपास या संबंधित यंत्रणा करतीलच.

संदर्भ :
64532667_10214279621721325_8410405027746676736_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संघात जाणारे असे करुच शकत नाही , हे कुभांड आहे किंवा वावडी उठविण्यात आलेली आहे. यामागे फुरोगाम्यांचा अथवा काँगीचा हात असौ शकतो. मागे संजय जोशी नामक प्रचारकांची सीडी अशीच आली होती. बिचारे तेव्हापासुन वनवासातच गेलेत. तेव्हाही काँगी-फुरोगाम्यांनीच ते ष्डयंत्र रचले होते