हॉटेल मॅनेजमेण्ट नंतर नोकरीच्या संधी

Submitted by सस्मित on 10 July, 2019 - 03:40

नमस्कार.
ही माहिती माझ्या भाच्यासाठी हवी आहे.
त्याने नामांकित कॉलेजमधुन हॉटेल मॅनेजमेण्ट पुर्ण केलं आहे. सध्या एका ५ स्टार हॉटेलमधे अनुभवासाठी नोकरी करत आहे.
आधी त्याच हॉटेलमधे ६ महिन्याची अप्रेन्टिसशिप केलेली आहे.
त्याला परदेशात नोकरीची संधी कशी मिळेल त्याबद्दल माहिती हवी आहे.
माबोवरचं कुणी ह्या फील्ड्मधुन बाहेर देशी गेलंय का नोकरीकरता?
ऑनलाईन काही साईट असतील तर सांगा.
एजन्सीज् - एजंट वैगेरे बद्दल महिती असेल तर सांगा.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे माहिती मिळत नसेल तर भाच्याला त्याचा कॉलेजच्या सिनियर्सला/ जिथे काम करत असेल तिकडे सिनियर्सकडून माहिती काढायला सांगा,,,

अ‍ॅप्लाय करायला लागेल. नौकरी/ मॉन्स्टर वर फील्ड टाकून. व लोकेशन हवे ते टाकून. क्रूझ कंपनीत पण मस्त जॉब्स असतत हॉस्पिटॅलिटीचे. ते त्याला कन्सिड र करायला सांगा. एकच फारिन कंट्री असे नाही. देशो देशी फिरत राहतात. किंवा कोणा शेख / अमीर किंवा बिलिनएर सिई ओ टाइप च्या पर्सनल याटवर ही नोकर्‍या असतात. पगार चांगले . मालिक का सुनना पडता. वो तो सब जगह है. दस्तुरखुद्द अमिरिका युरोपचे माहीत नाही पण व्हाइट लोक्स जिथे सुट्टीला जातात त्यादेशांत उत्तम रिजॉर्ट असतात तिथे ट्रेन्ड मॅन पावरची गरज असते. हाता खालचा स्टाफ त्या देशाचा अस्तो पण मॅनेजर व्हाइट लोकांच्या गरजा संभा ळेल असा ट्रेन्ड लागतो.

त्याचे फील्ड काय आहे. म्हणजे हाउस्कीपीन्ग शेफ सर्विस का सेल्स का फ्रंट ऑफिस

राजू७६, अनुभवी लोकांना विचारण्म चालु आहे.
अमा, धन्यवाद. सध्या शेफ सर्विस ची नोकरी आहे.
बार अटेंडर मधे स्पेश्यलायझेशन केलंय. कोकटेल्स अ‍ॅन्ड मिक्सिंग.

शेफ असेल तर तुरंत इन्स्टाग्राम अकाउंट उघडून तिथे स्वतः केलेल्या उत्तम पदार्थांचे फोटो रेकॉर्ड ठेवायला सुरू करा. व कॉकटेल्स ऑफ कोर्स.
एक शेफ मोरिमोटो आहेत त्यांचे मी फॉलो करते. एकदम टॉप क्लास टॅलेंट. अशी कीर्ती संपादन झाली की कंपनी बोलवून घेइल कोणतीपण.
सेलब्रिटी कल्चर साठी थोडे हात पाय मारावे लागतील. प्लस वर्ल्ड बारटेंडिंग स्पर्धा अस्तात तिथे जायचे. सध्याची कंपनी पाठवते का बघा. नेटवर्किन्ग जबरदस्त लागते अशा फील्ड मध्ये.

मालदीव्ज
पोर्टो रिको
दुबई,
शारजा
मस्कत
कॅरिबिअन बेटे,
रशि या व इस्ट युरोपिअन कंट्रीज
हवाई,
श्रिलं का, थायलँड कंबोडिया इथे खूप संधी नेहमी उपलब्ध असतात. वट्ट न्यु जर्सी, एडिसन एल ए एस एफ बर्लिन पॅरिस रोम च हवे असेल तर आधी इथे अनुभव कमवल्यास ओपनिंग मिळेल. मारिऑट, हायात वगैरे मेजर चेन्स च्या ऑनलाइन साइ टांवर जॉब लिस्टिन्ग आहे का ते बघून घ्या. चीअर्स

शेफ असेल आणि त्याला आवड असेल तर क्रूझ वर किंवा प्रवासी शिप वरप्रवासीचांगली संधी मिळु शकते. पगार देखिल चांगलाच असतो