पावसाळी रानभाजी- पेस

Submitted by मनिम्याऊ on 10 July, 2019 - 02:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पेस वेलीची पाने
हि रानभाजी पावसाळ्यात आंगणात, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर आपोआप उगवते. साधारण आपाट्याच्या आकाराची पण जरा जाड़सर आणि गडद हिरव्या रंगाची पाने असतात.

IMG-20190708-WA0003.jpg

याचा बराच मोठा वेल होतो
IMG-20190708-WA0001.jpg

कांदा -1 उभ्यात चिरलेला
टोमॅटो -1 चिरलेला
लसूण पाकळ्या - 5, 6 बारीक चिरून
सुक्या लाल मिरच्या- 2
मोहरी - एक लहान चमचा
हळद - एक लहान चमचा
हिंग - पाव चमचा
तेल - फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम पाने स्वच्छ धुवून चिरून घ्या.
IMG_20190710_112720.JPG

एका कढईत थोडे तेल गरम करुन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर सुक्या लाल मिरच्या, हिंग, हळद घाला.

आता यात चिरलेला लसूण आणि कांदा घालून लालसर रंगावर परतून घ्या. कांदा चांगला परतला की नंतर त्यात टोमॅटो घाला व 5 मिनिटे शिजू द्या.

टोमॅटो शिजला की पेसची पाने घाला व झाकण ठेवून 5-7 मिनिटे वाफ येऊ द्या.

गरम गरम ज्वारीच्या भाकरी किंवा पाखडीच्या भाताबरोबर खा. सोबत कच्चा कांदा/ मिरचीचा ठेचा असल्यास अहाहा...

IMG_20190710_120703.JPG

वाढणी/प्रमाण: 
2
अधिक टिपा: 

कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय खावू नये.

याच भाजीला फ़ास / पासवेल असेही म्हणतात. (कोणाला शास्त्रीय नाव माहित असेल तर सांगा)

पूर्व विदर्भात विशेषत: नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आणि MP तील बालाघाट भागात पेसभाजी आवडीने खाल्ली जाते.

या भाजीची ओळख आम्हाला लहानपणापासून सांभाळण्यार्या आणि आता घरातीलच एक सदस्य बनलेल्या पण मूळच्या बालाघाटी असलेल्या बाईंनी करून दिली.

माहितीचा स्रोत: 
आमच्या किरणबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चवदार वाटतेय भाजी.

कुरडूशिवाय मी अजुन कुठलीच रानभाजी खाल्ली नाहीये. Sad

चवीचा अंदाज येत नाहीये>>
चवीला किन्चित खारट आणि meaty. (थोड़ीफ़ार गोड्या पाण्यातल्या fish सारखी चव असते)

कोकणातहि हि पानं असलेल्या वेली बर्‍याच पाहिल्यात पण आंम्हाला नाहि माहित कि हि भाजी आहे अन बनवली जाते..

@कोकणातहि हि पानं असलेल्या वेली बर्‍याच पाहिल्यात पण आंम्हाला नाहि माहित कि हि भाजी आहे अन बनवली जाते..>>>
रानभाजी पूर्ण ओळख पटल्याशिवाय खायची रिस्क अजिबात घेऊ नका.

> आम्हाला लहानपणापासून सांभाळण्यार्या आणि आता घरातीलच एक सदस्य बनलेल्या पण मूळच्या बालाघाटी असलेल्या बाई > रोचक! अधिक जाणून घ्यायला आवडेल.