बाईपण आणि आईपण

Submitted by छोटी on 9 July, 2019 - 05:54

"आई, आई$$$$$" बाहेरूनच आलेल्या आवाजवरूनच मला लगेच कळलं, काहीतरी बिनसलं आज रोशनाच... बरं झालं तिच्या आवडीचं थालीपीठ लोण्यासह तैयार आहे असा मी मनातल्या मनात विचार केला... "good evening,princess" तिने घरात येणाऱ्या 15 वर्षाच्या लेकीला हसून घरात घेतलं.... वैतागलेला चेहरा, 3/4 th जीन्स, निळा t शर्ट , एका side ला backpack, nike चे shoes अशी माझी धडाकेबाज 15 वर्षाची राजकन्या आज भयानक मूड मध्ये होती.
"आई ,मला एक सांग?"
"एक"
"गप ग, आई...मी आज प्रचंड वैतागली आहे"
"बरं, हातपाय धु, बाहेर ये...मस्त थालीपीठ , लोणी ... even कोल्ड cofee पण आहे तैयार "
"मला नाही खायचं काही, भूकच मेली सगळी आज.. आई शपथ, त्या काकू भेटल्या ना परत तर "
Oops प्रकरण आज पेटलेलं दिसत आहे... पहिले पोटातली आग विजवावी लागेल मग बघू...
"कुठल्या काकू, काय झालं?"
"बघ, मी आणि सुनिधी बस मधून येत होतो...एक काकू आमच्याकडे म्हणजे सुनिधीकडे विचित्र बघत होत्या... त्यांना विचारले तर त्या आमच्यवरच उचकल्या की तुम्ही असे छोटे कपडे घालतात आणि पुरुषांमधल्या सैतानाला जगवतात त्यांच्यामध्ये काय तो पेटवतात आणि त्यामुळे तुम्ही नाही जळलात तरी कोणाला तरी जळत ना ... असं बरंच काही बोलल्या त्या...स्त्री स्त्रीची दुष्मन असते and all....म्हणजे आई म्हणजे twinkle आणि असिफा वर बलात्कार काय आमच्यामुळे झाले" आणि पोर रडायला लागली ना हमहमसून... अरे बाप रे, दिसत त्यापेक्षा भयानकच वळण घेतलं बाबा ह्या बाईपण... बाईच्या जातीला... स्त्री आहेस तू...तुझे कपडे, तुझं वागणं ह्या सगळ्यांनी... घरातून नाही पण बाहेरून कुठून तरी येणारच होतं... आज शिरलंच शेवटी माझ्या घरात... "बाळ, रडू नको" म्हणत तिला थोपटलं.. गोंजारलं... "बाळ रडू नको... हात पाय धुऊन घे आणि ये आपण, बोलूया नक्की या विषयावर"
रोशना गेली फ्रेश व्हायला.. मी मनात बऱ्याच शब्दांची जुळवाजुळव सुरवात केली...असे अनेक अनुभव , अनाहूत सल्ले मन पटलावर तरळत होते... रोश फ्रेश होऊन आली... तेवढ्यात बेल वाजली... मी दार उघडून सुनिधीला पण घरात घेतलं..
"आई, माझी नव्हती ग काही चूक"... माझी ही दुसरी लेक...लौकिक अर्थाने ती माझ्या मुलीची मैत्रीण पण आहे ती पण माझीच मुलगी...
"पहिले दोघी तुम्ही खाऊन घ्या मग बोलू"...मस्त पैकी गरमागरम थालीपीठ लोणी असून सुद्धा पोरींनी सुरवात चिवडत केली..पण एक घास तोंडात गेल्यावर भूक चाळवली आणि जे काही खाल्लं ना पोरींनी मग कुठे शांत झाल्या त्या...त्यांना शांत करून मग मी सांगायला सुरुवात केली " कसं असत ना, एक जुनं घर असतं, त्यात कोळी आपलं जाळ पसरवत जातो... मालकाला माहीतच नसत की असं काही आहे आपल्या घरात... थोड्या वर्षांनी मालकाला वाटत हे जाळ इथे असायलाच पाहिजे त्या शिवाय सगळं चुकीच होईल... मग कोणीतरी येऊन त्यांना समजावत की नाही जाळ काढायला पाहिजे नाहीतर घर खराब दिसेल, नुकसान होईल... कसे बसे ते मालक तैयार होतात ...मग ते जाळे काढतात ...पण तो पर्यंत त्या जाळ्यामुळे तो भाग काळा झाला असतो परत मालक म्हणतात बघा म्हटलो होतो ना नव्हता काढायला पाहिजे..झाली ना भिंत काळी...
असंच काहीसं आपल्या मधल्या काही लोकांच आहे ... त्यांनी काही विचार डोक्यात एवढे पक्के करून ठेवले आहेत ते बदलणं किंवा तो चुकीचा आहे हे समजून घेणं त्यांच्यासाठी अशक्य आहे... बलात्कार मुलीच्या कपड्यामुळे होतात हे इतकं घट्ट बसलं आहे की अजुन काही सुचतच नाही... फिरून फिरून तिथेच येतात ते...जिथे तिथे moral policing करतात..."
" बघ ना आई, किती बोलल्या त्या, insult केला आमचा"
"हे बघ, त्या ज्या कोणी होत्या त्यांची आणि तुमची काही दुश्मनी नाही , कोणाचं तरी भलं व्हावं ह्या उद्देशाने बोलल्या असतील त्या असं आपण समजू आणि ते विचार मनातून काढून टाकू... त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा राग, रोष, किंतु मनात ठेवू नका... आणि insult तर केलाच नाही... रोश, मी मागच्या महिन्यात तुला ड्रेस आणला तो तुला आवडला नाही तु काय केलास?"
"मी तुला सांगितलं मला नाही आवडला ड्रेस आणि मला पाहिजे तसा बदलून आणला"
" correcto, माझ्याबद्दल तुला काही राग...किंवा मी तुझा insult केला अस वाटलं का?"
" छ्या!! काहीतरीच काय ? उलट मला किती छान ड्रेस मिळाला..."
" बस मग हेच हेच करायचं... हा सल्ला तुम्हाला आवडला नाही ... सोडून द्या ... आपण आज त्यातून काहीतरी नवीन शिकूया... त्या निमित्ताने आपण ह्या विषयावर बोलूया"
"आई" दोघी एकदमच ओरडल्या
"एक एक करून बोला.. 2 कान असले तर मेंदू मला एकच आहे..."
"आई, हे बलात्कार मुलींच्या कपड्यामुळे होतात अशी फालतू idea आली कशी" सुनिधी ने विचारलं " हो मला पण हेच विचारायचं होत...असं कसं कोणी विचार करू शकतात ना" रोशनेपण सुनिधींची री ओढली..
" कधी कोणाला ही संकल्पना सुचली ह्याचा इतिहास नाही माहिती मला पण...पण जेव्हापासून ह्या विषयावर ऐकलं, बोलली, वाचलं तेव्हापासून एक वाक्यप्रचार नेहमी प्रचारात आला आहे... आगीजवळ लोणी नेलं तर लोणी वितळणारच"
" ह... मग"
" मग काय, अरे ह्याचा अर्थ म्हणजे पुरुष जन्माला येतानाच स्त्री बद्दल आकर्षण घेऊन आला, त्यामुळे स्त्री किंवा मादीकडे असणारी अशी नजर स्वाभाविक आहे...पण आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये काही नियम बनवले गेले, आपल्यावर संस्कार केले गेले त्यामुळे काही पुरुष मनाला आणि नजरेलाही लगाम घालायला लागले... पण काही लोकांमध्ये तो सैतान अजूनही जागा आहे... म्हणजे आग ही स्त्री आणि लोणी म्हणजे पुरुष... म्हणजे स्त्री जवळ गेला की पुरुष हा असाच वागायला पाहिजे अशीच बऱ्याच जणांची समजूत आहे... त्यामुळे स्त्रियांनी स्वतः वर बंधन घालायला पाहिजे मग काय साडीच घालायला पाहिजे,पदर डोक्यावर पाहिजे, अमुक नाही करायचं तमुक नाही करायचं... पण ह्यानेही नालायकपणा थांबला नाही ... अत्याचार होत राहिले..मग अजून बंधन... पण लोक हे विसरले जसा लोण्याचा धर्म आहे वितळणं तसाच आगीचा धर्म आग का सोडेल...बंधन आगीवरच का... भलेही त्यासाठी तिच्यावर पाणी ओतून तिला विजवली तरी चालेल... पण बंधन म्हणजे बंधन.. थोडा प्रयत्न लोण्यासाठी करून बघा असा विचार केलाच गेला नाही...त्याला टाका ना बंधन... कडाक्याच्या थंडीत गोठवून टाका बर लोण्याला मग बघू कसा वितळतो ते... त्या उपर वितळला तर कडक शिक्षा म्हणून त्याला कायमचा नष्ट करा..."
"आई आई, काय बोलते आणि लोणी, आग काही समजत नाही आहे " दोन्ही पोरी एकसुरात ओरडल्या...
"Sorry हा पोरींनो, वाहवत गेली मी... मला एवढंच म्हणायचं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंवा तेव्हाच्या काळात त्यांना जे काही सुचलं ते त्यांनी अमलात आणलं.. मग कपडे , दिसणं, वागणं, बोलणं मुलींच्या सगळ्यातच त्यांना खोट दिसायला लागली... वर्षानुवर्षे हाच समज प्रचलित झाला ... त्यांना स्त्रियांना दोष देणं सोप्प होत गेलं... पण सगळेच काही वाईट नव्हते काहींना स्त्रियांचं मन समजलं, काही स्त्रियांना आपलं अस्तित्व समजलं त्या सगळ्यांनी ह्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आज आपण एवढ्या स्वतंत्र पणे जगू, वावरू शकतो... ही काही एका दिवसाची गोष्ट नाही.. बऱ्याच पिढी ह्या वातावरणात पिचल्या गेल्या.. आणि अजून काही genration लागतील विचार बदलायला तो पर्यंत अश्या काकूंना get well soon म्हणायचं आणि आपण मात्र कणखर बनायचं"
" अच्छा, अच्छा म्हणून आम्हाला नको असताना पण कराटेचा क्लास लावला गेला... we always have chilly spray in bag"
" बरोबर पण ह्या external गोष्टी झाल्या... तुम्हाला महत्वाच्या म्हणजे तुमच्या 6th sense वर काम करायचं आहे.. जसं पुरुषांना आकर्षण दिलं तसं स्त्रियांना 6th sense दिला आहे.. तो वापरायला शिका... नुसत्या गप्पा मारायच्या नाही बस, कॉलेज, शाळेमध्ये आणि पुढे गेल्यावर कामाच्या ठिकाणी... आजूबाजूला कोण काय करत आहे ह्यावर आपली नजर हवी, कोणी चुकीच्या नजरेने बघत असेल आणि काही झालं तर तुम्ही काय करणार ह्याचा plan डोक्यात तयार पाहिजे म्हणजे action घ्यायला easy होईल... train your mind, brain and body in such way that... No one will touch you without your permission.... "
"आई, एकदम sherlock homes वाली feeling येते आहे"
"मग तसच alert राहायचं... माणसाला ओळखायला शिकायचं...कोण आपल्याशी का बोलत आहे... का मैत्री करतो आहे... ह्याची ग्वाही आपलं मन आपल्याला देत... त्यावर विश्वास ठेवायचा...सुरवातीला नाही जमणार लगेच मला किंवा सुनिधींच्या मॉम बरोबर बोलायच्या आणि practice करायची... आणि ह्याउपर जरी काही झालं तरी tension नछो, आम्ही सगळे जण तुमच्या पाठीशी राहू... "
"व्वा आई ,सगळं frustation उडन छु झालं ग... आपली किती चीड चीड होत होती ना सुनी"
"हो ग रोश, आई तू नेहमीच आमच्याबरोबर रहा... "
"माझ्या बछड्या ग... " म्हणत मी माझ्या पोरींना माझ्या नसलेल्या पदराखाली घेतलं... आणि आईची नजर असतेच आपल्या पिल्लापाशी...

अर्चना चौधरी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान