रे मामा रे मामा रे....

Submitted by राजेंद्र देवी on 7 July, 2019 - 07:04

रे मामा रे मामा रे....

लहानपणा पासून भेटणारी सर्वात आवडणारी व्यक्ती म्हणजे आईचा भाऊ, मामा. सगळ्यात जास्त लाड करणारा, फिरायला नेणारा, खेळायला नेणारा, बरोबर खेळणारा, खाऊ देणारा, गोष्टी सांगणारा हा आवडता मामा. कधी हा मोठा तालेवार असतो अन झुकू झुकू गाडीतून याच्या गावी जाणे म्हणजे पर्वणीच असते. मामाच्या गावाला जाऊया तूप रोटी खाउया हे आपले ब्रीदवाक्य असते. थोडे मोठे झाल्यावर याच्या शिवाय आपले पान हलत नाही. मनातल्या गोष्टी याचा जवळ सांगितल्या शिवाय चैन पडत नाही. पुढे प्रेमात वगैरे पडल्यावर मदतीला हाच धाऊन येतो. सर्वतोपरी साहाय्य करतो. लग्नात पण याचा मान मोठा. तसेच कार्य निभाऊन नेण्यात याचा मोठा वाटा असतो. याचा सल्ला घेतल्या शिवाय कार्य संपुर्ण होणे कठीण. याच्या नावाचा बाहेरच्या जगात पण फार उपयोग होतो. वाहन चालवताना तो रस्त्यावर चौका चौकात भेटतो, तर एखादे काम करून घेण्यासाठी आपण याचा वापर करतो. कधी कधी मजेने आपण एखाद्याला आपण मामा बनवतो तर काही जुन्या मैत्रिणी आपल्या मुलांना आपली मामा म्हणून ओळख देऊन आपला मामा बनवतात. क्वचितच हा आपणास दुष्ट स्वरूपात दिसतो जसे शकुनीमामा, बाहुबलीतील मामा, सैराट मामा, पण ही मोजकीच उदाहरणे, पण इतरत्र मात्र तो एकदम सुस्वरूप, मनमिळावू, सहाय्यक, मित्र, ह्याच स्वरूपात दिसतो.
असो, सर्व लाडक्या भाच्याना समर्पित.

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.