अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आल्या आल्या माडी ताई आल्या Proud
इंनोसन्स खूप छान दाखवते ती !>>>>>>> हो मला पण आवडते ती. बाकी ती इतकी वेंधळी,, बावळट हॉटेल मॅनेजर कशी वगैरे वगैरे बाजूला ठेऊन बघते.

नाही, राजेंनी ते लपवले. फायनली , आज डबड्याच्या कानाखाली बसणार. Flamenco

अजनबी, यु आर राईट ! मला तर ती शुर्पणखाच वाटते. एवढी ढब्बाडी बाई, सगळी लाज सोडुन एका येड्याच्या मागे लागलीय.

खूप छान झाला कालचा भाग. शुभ्राच्या अभिनयाला दाद द्यायलाच हवी. थप्पड सीन पण भारी झाला एकदम.आसावरीने शुभ्राची हात जोडून क्षमा मागितली. तिला तिची चूक समजली आहे.

काल शुभ्राचे, सोहमचे भांडण सॉलिड होते अगदी जराही ओव्हर वाटले नाही. काय फाड फाड बोललीय शुभ्रा आणि सोहंम निर्लज्जपणे डिफेन्ड करत होता, एकदम रिऍलिस्टिक वाटले. आम्ही तर टाळ्या वाजवल्या बुआ.

<<.आसावरीने शुभ्राची हात जोडून क्षमा मागितली. तिला तिची चूक समजली आहे.>> हो! म्हणाली कि मी आई म्हणून कमी पडले. आमच्या घरातले म्हटले कि नाही जास्तच झालीस आई म्हणून Lol

आता बबड्या आसावरीचा कान चावणार व म्हणणार वेळीच माझा कान उपटला असता तर ही वेळ आली नसती! Lol

खूप छान झाला कालचा भाग. शुभ्राच्या अभिनयाला दाद द्यायलाच हवी.काल शुभ्राचे, सोहमचे भांडण सॉलिड होते अगदी जराही ओव्हर वाटले नाही. काय फाड फाड बोललीय शुभ्रा आणि सोहंम निर्लज्जपणे डिफेन्ड करत होता, एकदम रिऍलिस्टिक वाटले. >>>>>>> अगदी अगदी . खर्या आयुष्यात जसे नवरा- बायको भाण्डतात तसे भाण्डले दोघे. तेप्र मला वाटत पहिल्यान्दाच इतकी लाउड बोलली, ओरडली असेल ह्या सिरियलमध्ये. तिच्या ह्याआधीच्या सिरियल्समध्ये तिला अस लाउड झालेल बघितल नव्हत. पण तेप्रने सुपर्ब केलय. निजो, गिओ सुद्दा बेस्ट!

डिट्टो वर कोणीतरी लिहिलं तसच झालं, आसाने हात भाजून घेतला बबड्याला मारलं म्हणून. इतकं कसं कोणी आंधळं प्रेम करु शकतं ?

थोडी वेगळी माहिती इथे देत आहे.
सतीश राजवाडे ची प्रथमच दिग्दर्शित वेब सिरिज "समांतर" ,जी सुहास शिरवळकरांच्या समांतर याच कादंबरीवर आधारित आहे.ती एम एक्स प्लेअरवर आज रिलीज झाली आहे.आताच पहिला भाग पाहिला.स्वपनील जोशी नेहमीपेक्षा वेगळ्या रोलमध्ये आहे.

डिट्टो वर कोणीतरी लिहिलं तसच झालं, आसाने हात भाजून घेतला बबड्याला मारलं म्हणून. >>> ह्याचा अर्थ आपण डबड्याला मारलं हे तिला चुकीचं वाटतय आता Angry

डबड्या निघुन गेलाय, त्याची काळाजी वाटणं हे वेगळ आणि त्याला मारून आपली चूक झाली असं वाटण वेगळं. म्हणजे निजो बदलली नाहीये अजुन.

आसाने हात भाजून घेतला बबड्याला मारलं म्हणून. >>> त्यापेक्षा आधी स्वत:ला दोन मारून, बबड्याला चार पाच सणसणीत ठेवायच्या, किमान दोन तरी.

अपेक्षेप्रमाणे आज आसा माती खाणार. काय तर म्हणे माझ्या डबड्यावर मी हात का उचलला म्हणून. डबल ढोलकी आहे ही बाई. आधी म्हणते की हे मी आधीच करायला हवे होते. आता काय तर हात पोळवायला निघालीय, धन्य आहे ही माऊली . डबड्या हा उंच बरणी आहे तर आसा ही डालडाचा डबा आहे.

बाकी शुभ्राचे काम आवडले. राजेंना काय काय सोसावे लागतेय. बरं, डबड्या कुठे गेला असेल? मित्रांकडे नाही, कॅफेत नाही, प्रज्ञाकडे नाही. मग कुठे गेला असेल? का दाढी काढायला गेला?

रश्मी.. Lol डबल ढोलकी....!!!
पण खरेच..राजेंना अगदी पश्चात्ताप होत असेल हिच्याशी लग्न केल्याचा...काय काय खेंगटं मागे लागली!
...........
आधीचंच आयुष्य किती मस्त चललं होतं त्यांचं ! विनाकारण सुखाचा जीव दु:खात घातला.......

नताशाताई,अंजूताई,रश्मीताई,आंगो जी +++++११११११११११
आसा डबल ढोलकी, डबड्याची आई डबडी.
आत्ताच नवीन प्रोमो पाहिला.कोंबडीचा म्हणतो शुभ्राने त्याची माफी मागावी. तर ही आसा राजेंना सांगतेय तुम्ही शुभ्राला सांगा माफी मागायला.
राजेंना मुळी पारखच नाही बघा माणसांची.उतारवयात कसलं बावळट ध्यान बांधून घेतलंय गळ्यात.
अजून 9 लाखांचे आणि वेळोवेळी घेतलेल्या पैश्यांबद्दल काही सांगितले नाही त्यांनी घरात. तेपण मला बावळटच वाटतात Angry

राजेंना मुळी पारखच नाही बघा माणसांची.उतारवयात कसलं बावळट ध्यान बांधून घेतलंय गळ्यात.>>>> Biggrin

राजेंचे असे झालेय. Hammer

डबड्याची आई डबडी. >>>>>>>> Rofl

आसाने हात भाजून घेतला बबड्याला मारलं म्हणून. इतकं कसं कोणी आंधळं प्रेम करु शकतं ? >>>>>>> नैतर काय. शुभ्रा त्यावेळी कपाळावर हात ( मनातल्या मनात) मारुन घेत होती अस तिच्या एक्सप्रेशन्सवरुन वाटत होत.

बाकी शुभ्राचे काम आवडले. राजेंना काय काय सोसावे लागतेय. राजेंना अगदी पश्चात्ताप होत असेल हिच्याशी लग्न केल्याचा...काय काय खेंगटं मागे लागली! >>>>>>>>>> +++++++११११११११११

डबडया एकतर प्रज्ञाकडे असेल किव्वा ' अभिज किचन' मध्ये असेल. प्रज्ञाकडे असायची शक्यता जास्त वाटतेय. एकतर दरवाजा उघडायला एवढा वेळ लावला तिने , नन्तर तिने झोपलेली अस खोटच साग्नितल असेल. राजेन्नी शुभ्रा आणि आसाला बरोबर घेऊन जायला हव होत हिच्याकडे. शुभ्रा तडक बेडरुममध्ये गेली असती हिच्या.

रश्मी, स्माईली भारीये!!!!

डबड्याची आई डबडी. >>>> Lol

राजेंना मुळी पारखच नाही बघा माणसांची.उतारवयात कसलं बावळट ध्यान बांधून घेतलंय गळ्यात.> +११ Lol Lol

लग्नाला तयार होती माडी
पण राजेंनी प्यायली होती ताडी
डबड्याची आई डबडी
राजेंना वाटली ती भाबडी

लग्नाला तयार होती माडी
पण राजेंनी प्यायली होती ताडी
डबड्याची आई डबडी
राजेंना वाटली ती भाबडी>>>> Rofl Rofl छान आहे चारोळी

चारोळी मस्तच! Rofl

चंपा>> सगळे एपीसोड एकदम बघणार. दंडवत घ्या केवढे पेशन्स! Wink Proud

सगळे म्हणजे त्या आठवड्यातले सगळे. रविवारी दुपारी आणि रात्री एकामागे एक दाखवतात सहा भाग. मध्ये मध्ये म्यूट करून बघायचे.

Pages