अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आसावरी आता एक नंबरची चालू वाटायला लागली आहे. राजेंनी दिलेलं कार्ड त्यांना न सांगता सोम्या ला दिलं. बरं लक्षात नसेल तेव्हा तर आता सांगायचं , नवरा उपाशी राहिलेला चालतो आणि म्हणे प्रेम विवाह.. सोहम फारशी पुसताना चा शॉट तर अगदी टुकार झालेला, त्यातून ही बाई म्हणते "babdya जमीन पुसतोस?" जमीन?? Seriously? Ladya, farshi asa shabd suchu naye?

त्यातून ही बाई म्हणते "babdya जमीन पुसतोस?" जमीन?? Seriously? Ladya, farshi asa shabd suchu naye? >>> जमीन पुसणे एवढे ऑड का वाटतय Uhoh खूप कॉमन आहे हे.

राजेन्च्या नव्याकोर्या जीन्स भाण्डीवालीला दिल्या त्याचा हसतखेळत बदला घेतला राजेन्नी पिवळी साडी लपवून. तेच जर बबडयाच्याबाबतीत तिने केल असत तर त्याने घर डोक्यावर घेतल असत.

आसाला व्हिडिओ कॉल करता येतो पण SMS पाठवता येत नाही का? राजेन्साठी चिठ्ठी लिहून ठेवली, टिप्पीकल ओल्डस्कूल आहे ही!

आसा आणि शुभ्राच पॅचअप झाल सुद्दा? Uhoh

मायलेक दोघही एकजात स्वार्थी. दोघही आपल्या जोडीदारान्ची पर्वा करत नाही.

कारखानीसान्नी प्रज्ञाला स्वखर्चाने दुबईला पाठवून दयाव.

शुभ्रा कढईला ' कढाई' बोलत होती का? Uhoh

राजे आणी शुभ्रा या दोघांनी आता एकत्र सल्ला मसलत करुन घरात सगळी कडे गुप्त कॅमेरे बसवावेत म्हणजे डबड्याचा दाढीविरहीत खरा चेहेरा दिसेल. आसा ही एक अत्यंत मुर्ख आई आहे, एकदम हलक्या कानाची.

सोहम खरच वशिल्याचा तट्टु आहे.

आज शुभ्राने मूर्खपणा केला. तिने आजोबान्साठी काही दिवसान्साठी सुट्टी घेतली कामातून. वर्क फ्रॉम होम चालू आहे. आपल्या कामाची पेनड्राईव्ह तिला बॉसकडे पाठवायची होती. एकतर तिने स्वतः तरी पेनड्राईव्ह दयायला जायच होत ऑफिसात किव्वा कोणालातरी ऑफिसमधून पाठवायला सान्गायच. पण हिने काय कराव? डबड्याला सान्गितल पेनड्राईव्ह घेऊन ऑफसमध्ये जायला. हिला माहितीये ना की आपला नवरा काय लायकीचा आहे ते, कुठचच काम त्याच्याकडून धड होत नाही, तरीही हिची अक्कल कुठे चरायला गेली? Angry आता बॉसचा ओरडा खातेय. बॉस तिला नावाने हाक मारत होता. Uhoh

डबड्या गेला प्रज्ञाबरोबर शॉपिन्गला, तिथे पेनड्राईव्ह दुकानातच विसरुन आला. Angry ह्या नालायकामुळे रस्त्यावर माणसे हरवतात, तिकडे पेनड्राईव्ह काय चीज आहे!?

डबड्याचा दाढीविरहीत खरा चेहेरा दिसेल. Rofl

सध्या आसावरीला अत्यंत मूर्ख दाखवण्यासाठी आणि डबड्याला फुल टू व्हिलन दाखवण्यासाठी ज्या काही आयडिया लेखक माथी मारतोय त्यापेक्षा काहीतरी भन्नाट आयडिया केड्याने दाखवल्या असत्या का?

डायरेक्ट शुभ्रा, तु अस बोलत होता बॉस. >>>> आमच्याकडे नावानेच हाक मारतात . आम्ही पण बॉसला नावाने हाक मारतो

आसाने नव्या जीन पँट कोणत्या भागात दिल्या?>> १५ तारखेच्या

ATM card वरचे नाव आसावरीला वाचता येत नाही का?
किती गुळूमुळू भांडतात हे लोक! सगळे भेटले की दुसरेच काहीतरी बोलत बसतात. डबड्याला समोर बसवून तो काय काय करतो ते सांगून, त्याचा जाब विचारायची अक्कल कोणालाच नाही.
शुभ्रा फक्त संताप व्यक्त करते पण डबड्याकडे लक्श देत नाही. राजे आसावरीला खूष ठेवण्यात व्यस्त, आसावरी डबड्यावरच्या प्रेमात आंधळी + मूर्ख.
काहीतरी चांगले दाखवल्यावर ईथे कळवा. तोपर्यंत मालिका बघणे बंद.

बॉस तिला नावाने हाक मारत होता. >>> मिसेस कुलकर्णी किव्वा मिसेस शुभ्रा तरी म्हणायच ना. >> असं मिसेस कुलकर्णी किव्वा मिसेस शुभ्रा
कोणी बोलत असेल असं वाटत नाही. सिरीयल किंवा सिनेमे सोडल्यास. Happy बॉस नावानेच हाक मारतो. आणि वयाने मोठा असेल तर तू बोलतात.

ऑफिसमध्ये नॉर्मली मराठी स्टाफ असला तर एकमेकांना नावानेच हाक मारतात किंवा भारीभारी डायरेक्ट सर नेम ने. बॉस सुद्धा नावानेच हाक मारतात पण जर स्टाफ सिनियर असेल किंवा वयस्कर असेल तर अहो जावो. हिंदी / इतर भाषिक सुद्धा नावाने हाक मारतात फक्त आप ताप करतात. राधिकाच्या ऑफिसमद्ये नाही का पानवलकरांना गुरु अहो पानवलकर असे हाक मारायचा व इतर लोक काय ते पुढे सर जोडतात।

ओहो अस आहे का? आमच्या ऑफिसमध्ये अजूनही अहो जाहोच बोलतात ज्युनिअर्स ना.

तो वडिलान्च्या वयाचा पानवलकर राधिकाला जेव्हा राधिकावहिनी म्हणतो तेव्हा कसतरीच वाटत.

पण आता ह्यांच्यापेक्षा राजे आणि शुभ्रा मुर्ख वाटतात. >>>>>>>>>>> ++++++++++११११११११

बबडया कमी होता की काय म्हणून आता आजोबा त्रास दयायला लागले शुभ्राला?! त्यान्ना वाटत आपली अडचण होते बबडया आणि शुभ्राला, सो आता ते वृध्दाश्रमामध्ये जायला राहणार आहेत कुणालाही न सान्गता. आता सगळ खापर पुन्हा तिच्यावरच फुटेल. आसा आणि राजे जेव्हा त्यान्ना त्यान्च्या घरी आजोबान्ना घेऊन जाणार होते तेव्हा आजोबान्नी ' जावयाच्या घरच पाणी सुद्दा प्यायच नसत' सान्गून धुडकावून लावल त्यान्ना.

बॉस तिला नावाने हाक मारत होता. >>> मिसेस कुलकर्णी किव्वा मिसेस शुभ्रा तरी म्हणायच ना. >> असं मिसेस कुलकर्णी किव्वा मिसेस शुभ्रा
कोणी बोलत असेल असं वाटत नाही. सिरीयल किंवा सिनेमे सोडल्यास. >>>+११११
कॉर्पोरेट मध्ये कुठे कोणी अहो जाहो करतात, वय जास्त असो वा कमी शक्यतो नावानेच हाक मारतात. मी माझ्या बॉसला नावाने बोलावते अन माझे रिपोर्टि मला नावाने हाक मारतात

Pages