संस्थळ मार्तंड उदंड जाहले

Submitted by सिद्धेश्वर विला... on 29 June, 2019 - 01:53

संस्थळ मार्तंड उदंड जाहले

कानपिचक्यांचे पेव सुटले

कळप बनविती कूत्र्यावानी

समुद्रा जणू गटार चिकटले

मार्तंड उदंड जाहले , मार्तंड उदंड जाहले

स्वये विकृतीची खाण

लोका सांगे रामबाण

चेहरा सोज्वळ शालीन

मनःकणामध्ये घाण

गाभण्यापुरतेच वळू उरले

मार्तंड उदंड जाहले

मार्तंड गाती गुणगान

चेले होती बेभान

येता हटके लिखाण

मार्तंड माजवी तुफान

जणू स्वामित्वच विकत घेतले

मार्तंड उदंड जाहले

मार्तंड पिटतो हाकाट्या

धावत येति साऱ्या गोट्या

एकमेकांस प्रतिसाद देत सुटले

तेचतेच शिळे शब्द वेचून लिहिले

मार्तंड कसले , गोटे साले

हिशोबात राहुनी आपापले पाहावे

देतोय एक गर्भित इशारा तुम्हाला ,

समजले कि नाही समजले

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults