ईठ्ठल दरसन

Submitted by Asu on 26 June, 2019 - 05:35

ईठ्ठल दरसन
(लेवा गण बोली)

काहीबी करीसन
कसंबी करीसन
पायदळी चालीसन
उठाबशा काढीसन
पंढरपूराले जायाचं आनं ईठ्ठल दरसन घेयाचं
तुयशी माया घालीसन
टिया कपायी लाईसन
हाती टाय घेईसन
तालावर नाचीसन
पंढरपूराले जायाचं आनं ईठ्ठल दरसन घेयाचं
पाऊस नसू दे
शेती नासू दे
नशीब रुसू दे
कायबी व्हऊ दे
पंढरपूराले जायाचं आनं ईठ्ठल दरसन घेयाचं
अभंग म्हनीसन
रिंगण घालीसन
दौडत जाईसन
जपतप करीसन
पंढरपूराले जायाचं आनं ईठ्ठल दरसन घेयाचं
ठीन तसं राह्याचं
सुखदुख चरनी वाह्याचं
भक्तिभावानं राह्याचं
हरीचे गुन गायाचं
पंढरपूराले जायाचं आनं ईठ्ठल दरसन घेयाचं

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पाऊस नसू दे
शेती नासू दे
नशीब रुसू दे
कायबी व्हऊ दे
या ओळींत उपरोधाचा भास झाला मला.
बाकी वारी करणं हे नशीबवानांनाच शक्य आहे. माझ्यासारख्या आस्तिक नास्तिक सीमेवर असलेल्या माणसाला एकाच वेळी
भक्तिभाव व अंधश्रद्धा दोन्ही वाटते वारी.

छान

माझ्यासारख्या आस्तिक नास्तिक सीमेवर असलेल्या माणसाला एकाच वेळी
भक्तिभाव व अंधश्रद्धा दोन्ही वाटते वारी. >>>> प्रामाणिकपणा आवडला