ठाणे मधील चांगले Neurologist आणि रक्त शुद्धीकरणाचे उपाय सुचवा

Submitted by समाधी on 25 June, 2019 - 11:00

ठाणे मधील चांगले Neurologist डॉक्टर सुचवा प्लिज

माझा अजून एक धागा आहे ज्यात मी एका त्वचा विकाराबद्दल विचारले होते, पण कोणी काही सांगितले नाही. पण त्यामुळेच त्रास वाढून असे होतेय. ड्रमो ची औषधे चालू आहेत, त्यात एक स्टेरॉईडची गोळी आहे सोबत आयुर्वेदिक औषध सुद्धा दिलेय रक्त शुद्धीकरनासाठी .

इथे कोणाला रक्त शुद्धीकरनासाठी काही उपाय माहीत असतील किंवा चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा प्लिज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रक्त शुद्धीकरण आणि न्यूरॉलॉजिस्ट??? ... तुम्हाला युरोलॉजिस्ट म्हणायचं असणार. राजावतच्या समोर ती उंच इमारत आहे त्यात एक युरोलॉजिस्ट आहेत, रुग्णालय ही आहे. त्यांचा अनुभव चांगला आहे.

कुठे म्हणे ?>>> ठाणे

फक्त एम्बीबीएस डिग्री घेऊन जनरल प्रॅक्टिस करणारे >>>> फक्त MBBS होवून दवाखाना घातलेले व्यवस्थित प्रॅक्टिस करणारे आहेत. आणि मी कटाक्षाने MBBS कडेच जाते. माझा उलटलेला व्हायरल माझ्या घराजवळच्या MBBS doctor बाईंनीच बरा केला. त्यांच्या हातून जमण्याजोगं नसेल तर स्पेश्यालिस्टकडे पाठवतात. माझ्या घरच्या ५ मिनिटांच्या परिघात आधी दोन MBBS होते. त्यातले एक expire झाले आणि एकांनी वयोमानामुळे निवृत्ती घेतली. त्यांचे दवाखाने बंद व्हायच्या आत ह्या तिशीच्या आतल्या मुलीचा दवाखाना सुरू झाला होता. घराजवळ ५ मिनिटांच्या अंतरात ३ डेन्टिस्ट, २ आयुर्वेद्/होमिओपथी दवाखाने, ५ प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत (त्यातले १ लहान मुलांसाठी). बाकी MD च्या कन्सल्टिंग देखील जवळ आहेत. हीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात ठाण्यात सगळीकडे आहे Happy . ठाणे राहण्याच्या दृष्टीने चांगलं वाटण्यासाठी हे एक मुख्य कारण आहे.

रक्त शुद्धीकरण आणि न्यूरॉलॉजिस्ट??? ... तुम्हाला युरोलॉजिस्ट म्हणायचं असणार. >>> त्यांना दोन्ही हवे असणार.

युरोलॉजिस्ट - डॉ. वैशंपायन
न्यूरॉलॉजिस्ट - डॉ. विनायक जोशी

आरारा प्रतिसाद पटला.

स्टिरॉइड शक्यतो घेऊ नये, त्याचे वजन आणि इतर इफेक्ट आहेत, पण काही केसेस मध्ये त्याशिवाय पर्याय नसतो.प्रेग्नन्सी मध्ये प्रिमॅच्युअर ची जोखीम असल्यास स्टिरॉइड देऊन अवयव जास्तीत जास्त विकसीत करतात.

(इथे साफी चं नाव आलं, मला हा धागा वाचून अगदी पहिलेच 'मग रोज साफी घ्या' असं लिहायची नैसर्गिक रिऍक्शन होती.)आमच्या हॉस्टेल मध्ये पिंपल ला एकदम प्रसिद्ध औषध होते.सगळ्या घ्यायच्या.तसंच एक वैद्यनाथ सुरक्ता होतं पण ते साफी इतकं कडू नसल्याने कमी परिणामकारक असेल असं पब्लिक ला वाटून कोणी घ्यायचं नाही.

lichen planus to r/o peumphigous vulgaris , हा त्वचेचा आजार निदान झाला आहे, जो लवकर बरे होत नाही, त्याला स्टेरॉईड च घ्यावे लागते असे सांगितले डॉक्टर नी,

मग त्यावर काही आयुर्वेदिक उपचार आहेत तर बघू म्हटले तर त्यांनी रक्त शुद्धीकरण साठी औषध दिले, पण हे एक वर्षापेक्षा ह
जास्त वेळ जाऊनही काही फरक दिसत नाहीये म्हणून टेन्शन ने डोक्याचा त्रास होऊ लागला.

स्टेरॉईड चा एकही डोस चुकला की पुरळ वाढते

स्टिरॉइड शक्यतो घेऊ नये, त्याचे वजन आणि इतर इफेक्ट आहेत, पण काही केसेस मध्ये त्याशिवाय पर्याय नसतो. +११११

साइड इफेक्ट आहेतच पण त्याला पर्याय सापडत नाहीये सध्यातरी

रक्त शुद्धीकरण आणि न्यूरॉलॉजिस्ट??? ... तुम्हाला युरोलॉजिस्ट म्हणायचं असणार. >> नाही, न्यूरॉलॉजिस्ट च म्हणायचे आहे, डोक्याच्या त्रासासाठी

रक्तशुद्धीकरणासाठी औषध म्हणजे फारच जनरालाईझ्ड झाले. नक्की काय झालंय हे बघितल्याशिवाय कोण (डॉक्टर) असे औषध सांगेल? अन सांगितले तरी ज्या डॉक्टरांनी रोग्याला तपासून औषध दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त कोणाकडून घेऊ नका.

स्टिरॉइड शक्यतो घेऊ नये, त्याचे वजन आणि इतर इफेक्ट आहेत, पण काही केसेस मध्ये त्याशिवाय पर्याय नसतो.
<<

मॉडर्न मेडिसिन तज्ञांच्या देखरेख व सल्ल्याशिवाय स्टिरॉइड शक्यतो कधीही घेऊ नये, त्याचे वजन आणि इतर इफेक्ट आहेत, पण काही केसेस मध्ये त्याशिवाय पर्याय नसतो.

↑ There. Now that is the correct statement.

Submitted by अश्विनी के on 4 July, 2019 - 11:31

<<

सो टोटल ऑफ १. (अक्शरी एक फक्त.)

***
५ प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत (त्यातले १ लहान मुलांसाठी). बाकी MD च्या कन्सल्टिंग देखील जवळ आहेत.
<<

"प्रायव्हेट हॉस्पिटल" म्हणजे "जीपी" नव्हे.
जी पी म्हणजे जनरल प्रॅक्टिस. छोटा दवाखाना, फक्त ओ.पी.डी. प्लस काही सलाईन लावलेले काही तास झोपणारे पेशंट्स.

एमडी कन्सल्टन्ट म्हणजे पुन्हा जीपी नव्हे.

प्युअर एमबीबीएस करून जनरल प्रॅक्टिस बंद झालिये हो कधीची Sad

सो टोटल ऑफ १. (अक्शरी एक फक्त.) >>> ह्म्म घरापासून चालत ५ मिनिटांच्या आत आता हा एकच आहे.

बाकिचं लिहिलेलं जीपी नाही हे माहित आहे हो Happy पण डॉक्टर्स भरपूर available आहेत हे सांगण्याच्या ओघात लिहिलं. आणि जवळपास साड्या ड्रेसचं दुकान नसलं तरी चालेल, थिएटर नसलं तरी चालेल ..... डॉक्टर हवाच.

प्युअर एमबीबीएस करून जनरल प्रॅक्टिस बंद झालिये हो कधीची Sad >>>> पण का असं? फॅमिली डॉक्टर लेव्हलला चांगले असतात की ते. आम्हाला ऑफिसात पण MBBS doctor दिले आहेत रोज एक दीड तास. मस्त ट्रीट करतात. कॉलनींनाही पॅनेलवर MBBS.

आम्हाला ऑफिसात पण MBBS doctor दिले आहेत

हे लोक नेमकं सांगतात आणि उगाच महागडी औषधं देत नाहीत. तुम्हाला /कर्मचाऱ्यांना बरं करणं एवढंच ध्येय असतं . इतर अर्थ नसतो.

रक्तशुद्धी साठी रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण मधासोबत घेणे. आहार हलका, पालेभाज्या युक्त असावा. पोट वेळेवर व्यवस्थित साफ झाले पाहिजे. कडकडून भूक लागल्यावरच जेवण करावे. कोमट पाणी प्यावे.

Pages