ठाणे मधील चांगले Neurologist आणि रक्त शुद्धीकरणाचे उपाय सुचवा

Submitted by समाधी on 25 June, 2019 - 11:00

ठाणे मधील चांगले Neurologist डॉक्टर सुचवा प्लिज

माझा अजून एक धागा आहे ज्यात मी एका त्वचा विकाराबद्दल विचारले होते, पण कोणी काही सांगितले नाही. पण त्यामुळेच त्रास वाढून असे होतेय. ड्रमो ची औषधे चालू आहेत, त्यात एक स्टेरॉईडची गोळी आहे सोबत आयुर्वेदिक औषध सुद्धा दिलेय रक्त शुद्धीकरनासाठी .

इथे कोणाला रक्त शुद्धीकरनासाठी काही उपाय माहीत असतील किंवा चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा प्लिज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Very experienced and knowledgeable person Dr. J Nathan.
Please check the ph. No. And address on Google. He is from Dadar and comes in Thane on specific days

प्राक्टो वर सर्च करा. डॉक्टरचा अनुभव, रेट रि व्यु सर्व माहिती एकत्रित मिळेल. आजार काय आहे पेशंटच? त्या नुसार शोध करता येइल
न्युरोलोजीत पण आणि सेगमेंट असतील ना.

समाधी जी तुम्हाला इथं कुणीही ट्रोल करणार नाही. तेव्हा आजार काय आहे हे सांगितले तर पुरक माहिती मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.

J Nathan म्हणजे जनक नाथन का?

अमा, ऑनलाइन चेक करून निर्णय घेणे जमत नाहीये, मिश्र रिव्ह्यू आहेत, डोक्याला मुंग्या येतात, तापतेय खूप डोके, तसे पेशटला अजूनही त्रास आहेत ज्याची औषधे चालू आहेत त्यात वयही झालेय थोडे

Dr. Nathan Shushrusha Hospital Dadar. Dr. Khadilkar Bombay Hospital Tel No. 22072489 Dadar Clinic No. 24183886

ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये डॉ योगेश गोडगे आहेत. अतिशय अचूक निदान करतात. माझ्या सास-यांना त्यांचीच ट्रीटमेंट चालू आहे.

Thanks

Neurologist
<<
सर्जन की फिजिशियन?

धन्स लोकं

आरारा ,

डोक्याला मुंग्या येतात, तापतेय खूप डोके, तसे पेशटला अजूनही त्रास आहेत ज्याची औषधे चालू आहेत त्यात वयही झालेय थोडे

यावर डॉक्टर सुचवा, जास्त काही कळत नाही, सध्या दुसऱ्या आजारावर औषधे चालू आहेत

ताई,
मी नांव घेऊन डॉक्टर सांगणार नाही, ते अनएथिकल होते. जस्ट जनरल ऑब्झर्वेशन सांगतो. प्लीज माफ करा.

तर मुंबई. ठाणे/कल्याण-डोंबिवलि/नवी मुंबई हे सगळं मी मुंबई प्रकारात धरतो. या मुंबईची गम्मत अशी आहे, की अख्ख्या भारतातूनच नव्हे, तर सगळ्या अशिया खंडातून अन मध्यपूर्व अफ्रिकेतूनही इथे उपचार घेण्यासाठी लोक येतात. ऑब्स्क्युअर कठीण उपचार इथे लीलया अ‍ॅफोर्डेबली होतात.

मेन प्रॉब्लेम आहे, तो नॉर्मल बेसिक उपचारांचा. फक्त सुपरस्पेशालिस्ट अन सुपरडुपर स्पेशलिस्ट आहेत. बेसिक कन्सल्टन्ट्स नाहीत अन सगळी जीपी नॉन अ‍ॅलोपथीची आहे. यांना कट देईल तो मोठा डॉक्टर ते सांगतात.

डोक्याला मुंग्या अन तापलेले डोके हे सध्या दुसर्या आजारांवर चाललेल्या उपचारांमुळे*ही* असू शकते. (त्या मुळे*च* असेल असे नव्हे. पण उदाहरणार्थ डायमॉक्स उर्फ अ‍ॅसिटाझोलामाईड नामक गोळी हे सिम्प्टम्स तयार करू शकते. हे जस्ट *एक* उदाहरण आहे.)

हे ज्यांच्याकडे उपचार सुरू आहेत त्यांच्या सल्ल्याने ते सांगतील त्यांना दाखवा. डोक्याला मुंग्या येणे अन डोके तापणे हा न्युरॉलॉजीस्ट साठीचा आजार मला तरी वाटत नाही.

नेहेमीच्या साधारण डोके दुखीसाठी डी.एम. न्यूरो अन नाहीच तर एमसीएच न्यूरो ला दाखवून सीटी स्कॅन. एमाराय, ईईजी अन अनेक तपासण्यावाले बरेच पेशंट्स मी पहात असतो.. तेव्हा बघा बुवा.

पुन्हा एकदा, निरुपयोगी प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

ता.क.
मेंदू तज्ज्ञच हवेत तर तुम्हाला न्युरोफिजिशियन उर्फ डी.एम. न्यूरो पदवी वाले डॉक्टर हवे आहेत. त्यांच्यापैकी गूगलून पहा..

आरारा थँक्स, ताणतणावामुळे तसे होत होते/आहे.
माझा अजून एक धागा आहे ज्यात मी एका त्वचा विकाराबद्दल विचारले होते, पण कोणी काही सांगितले नाही. पण त्यामुळेच त्रास वाढून असे होतेय. ड्रमो ची औषधे चालू आहेत, त्यात एक स्टेरॉईडची गोळी आहे सोबत आयुर्वेदिक औषध सुद्धा दिलेय रक्त शुद्धीकरनासाठी .

इथे कोणाला रक्त शुद्धीकरनासाठी काही उपाय माहीत असतील किंवा चांगले डॉक्टर माहीत असतील तर सांगा प्लिज.

आयुर्वेद रसशाळेचे 'सेप्टिडर्म' रक्तशुद्धी करण्यासाठी तसेच रक्तदुष्टी,त्वचा विकार,खाज सुटणे यावर उपयुक्त आहे. पण हि औषधे डॉ.च्या सल्ल्यानेच घ्या.

१) Dr. Reckeweg R60 Blood Purifier Drop
२००रु बॉटल.
हे पाहा.
---------------–------------

Medisynth co. , Navin Mumbai,
Beckoment skin care - creams no 1,2,3 . . 20. (७५रु/२० ग्राम ट्युब)
ही औषधं ओवर द काउंटर होमिओपॅथी औषध दुकानात तयार मिळतात.
बरेच नं आहेत वेगवेगळ्या स्किन केअरसाठी.

एकावेळी एकच औषध घेणे. तीनचार दिवसांत गुण दिसला पाहिजे.
२)
>>>ड्रमो ची औषधे चालू आहेत, त्यात एक स्टेरॉईडची गोळी आहे सोबत आयुर्वेदिक औषध सुद्धा दिलेय रक्त शुद्धीकरनासाठी .>>>
- हास्यास्पद प्रकार . स्टेरॉईडची अधिक आयुर्वेदिक!!

३) रक्त अशुद्ध झाल्याने असा निष्कर्ष असेल तर आयुर्वेदिक औषधीसुद्धा आहेत.
कुटकी, दारुहळद (हळद नव्हे).) - फक्त उत्तराखंडमध्येच होतात पण आता जवळपास गायब आहेत. काही खासगी उत्पादक (बैद्यनाथ वगैरे) आहेत.
तयार औषध - आरोग्यवर्धिनि गोळी.
मंजिष्ठ - केरळात आहे. गुरुवायुरला येऊन कुणा राजाचा रक्तदोष चमत्काराने बरा झाला नसून मंजिष्ठामुळे झाला असावा. तिकडे हॉटेलातही मंजिष्ठ घालून उकळलेले गरम पाणी देतात. तयार औषध - महा/मंजिष्ठादि काढा.
विश्वास ठेवून एका वेळी कोणतेही एकच औषध घेणे.

//"त्वचा विकाराबद्दल विचारले होते, पण---"//
प्रतिसाद चुकून इकडे दिला.

अन सगळी जीपी नॉन अ‍ॅलोपथीची आहे >>>> आमच्या इथे गल्लोगल्ली अ‍ॅलोपथी जीपी, डेन्टिस्ट व प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत Lol . अधुनमधुन होमिओपथी व आयुर्वेदाचे डॉक्टरही दिसतात. त्यातले जे जुने अनुभवी आहेत त्यांच्याकडे गर्दी असते.

बेसिक कन्सल्टन्ट्स नाहीत अन सगळी जीपी नॉन अ‍ॅलोपथीची आहे. यांना कट देईल तो मोठा डॉक्टर ते सांगतात. >>> नाही हो नाही. मला तर हॉस्पिटलमधूनच राकेश सिंग (त्यांच्या नावाअधी डॉ लावायच्या योग्यतेचा तो माणूस नाही) यांचे नाव सुचवण्यात आले होते. तिथे बाकीच्या पॅथींचा काही संबंधच नव्हता, होती ती फक्त अ‍ॅलोपथी.

आणि अ‍ॅलोपाथीची डीग्री घेतलेल्या माणसाला देवघरात बसवावे अशी परिस्थीती आज जराही नाही (एके काळी होती) . ४-५ डीग्री असलेल्या अ‍ॅलोपथीच्या डॉक्टरला मोठ्या आजाराचे निदान ३ महिने करता येत नाही हा स्वानुभव आहे. आणि त्याच जागी BAMS असलेले डॉक्टर मात्र निव्वळ लक्षणांवरून रोगाचे योग्य निदान करू शकत असले तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा?

Submitted by माधव on 3 July, 2019 - 15:40
<<

हे जे कुणी राकेश सिंग नामक गृहस्थ आहेत, त्यांच्या समोर जाऊन तोंडावर हे इथे लिहिले आहे ते सांगा असे ही सुचवितो. काये ना, नेटवर निगेटिव्ह रिव्ह्यूज लिहिण्यात मजाही येते, अन सोपेही असते. समोर तोंडावर सांगताना, एकतर हिम्मत लागते, अन खोटे आरोप केले तर ते सिद्ध करायची जबाबदारी अंगावर येते. नैका?

दुसरे,
तुमचे ओरिजिनल बायस मला ठाऊक असल्याने तुम्ही आयुर्वेदावरच विश्वास ठेवा अन अयुर्वेदिकच औषधे घ्या हे उत्तम असे सुचवितो.

रच्याकने,
नुसत्या सिम्प्टमवरून "योग्य" निदान करून त्या महोदयांनी भैषज्यकल्पना किंवा चरकसंहितेप्रमाणेच औषधयोजना केली होती ना? की घाणेरडी 'केमिकल्स' दिली होती तुम्हास?

आमच्या इथे गल्लोगल्ली अ‍ॅलोपथी जीपी, डेन्टिस्ट व प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत
<<
वॉव!
कुठे म्हणे ?

फक्त एम्बीबीएस डिग्री घेऊन जनरल प्रॅक्टिस करणारे किती आत्मे तुमच्या भागात आहेत हे समजून घ्यायला नक्कीच आवडेल. कारण गम्मत सांगतो, माझ्या वर्गातल्या २०० मुलांपैकी फक्त ३ मुलं फक्त एमबीबीएस डिग्रीवर प्युअर जीपी करतात. बाकी १०-१२ एमबीबीएस मेडीकल ऑफिसर आहेत, पण ती जीपी नव्हे. शासकीय सेवा आहे. अन हा ट्रेंड "माझ्या वर्गातल्या" मुलांचा आहे. म्हणजे किती जुना ते तुम्हाला ठाऊकच आहे.

बाकी या विषयावर माझ्याकडून इथे विराम.

***

ताणतणावामुळे तसे होत होते/आहे.
<<
छानच. मग न्युरोलॉजिस्टपेक्शा ताणतणावाचे मानसोपचार संबंधी काऊन्सेलर वगैरे जास्त योग्य ठरावेत.

आता बदललेला धागा विषयच पहायचा, तर "रक्तशुद्धीकरणा"चा अन माझा काही संबंध नसल्याने त्याबद्दल मी काही बोलणार नाही.

"आमच्यात" नॉर्मली अशुद्ध रक्त उजव्या जवनिकेतून फुफ्फुसात जाऊन शुद्ध होते, लिव्हर अन किडनी नामक अवयव त्यातिल विषारी घटक नष्ट करतात किंवा शरीराबाहेर फेकून देतात. अन अगदीच यांच्या ताकतीबाहेर जाऊन युरिया बिरिया केमिकल्स रक्तात साचली असतील तर डायलिसिस नामक यंत्र वापरून ते स्वच्छ केले जाते.

तेव्हा याबद्दल टोटलच पास.

***

वैधानिक इशारा : इंटरनेटवर औषध सांगणार्‍या वैदूंपासून सावधान!

ड्रमो ची औषधे चालू आहेत, त्यात एक स्टेरॉईडची गोळी आहे सोबत आयुर्वेदिक औषध सुद्धा दिलेय रक्त शुद्धीकरनासाठी.
<<

अनेक आजारांना स्टिरॉईडच द्यावेच लागते.

स्टिरॉईड हे विष नसून नॉर्मली आपल्या शरीरात तयार होणारे थायरोक्झिन किंवा इन्शुलिन सारखेच एक हार्मोन आहे. ते कसे कुठे केव्हा किती वापरावे, याला सखोल शास्त्रीय ज्ञान व पाया लागतो.

पण, याचा जादुची छडी वापरल्यासारखा येणारा इफेक्ट पाहून जादुगाराऐवजी जंबुर्‍याने ती छडी चालवली की रग्गड साईड इफेक्ट येतात. त्यामुळे "स्टिरॉईड वाईट" अशी कन्सेप्ट हे जंबुरेच जनमानसात तयार करतात.

साध्या खोकल्यासाठी ज्येष्ठमधाची काडी चघळली जाते. हा मूळ आयुर्वेदिक इलाज आहे, पण ज्येष्ठमधात नैसर्गिकरित्या स्टिरॉईड असते, व त्यानेच खोकला दाबला जातो, हे किती लोकांना ठाउक आहे? << संदर्भ : - हास्यास्पद प्रकार . स्टेरॉईडची अधिक आयुर्वेदिक!!>>

तर ते एक असो.

ते जे काय शुद्धीकरण दिलंय ते हमदर्दचं "साफी" आहे का? कारण ते या प्रकारात सगळ्यात जास्त फेमस आहे. अन ते आयुर्वेदिक जरी म्हणवले जात असले, तरी ते आयुर्वेदिक नसून युनानी औषध आहे. Lol

नसांचे आजार बेकार कारण पॅरेलाईज करु शकतात. तेव्हा डोक्याला मुंग्या येत असतील तर एखाद्या न्युरोलॉजीस्टला दाखवणे उत्तम.

Pages