आपण का लिहितो ?

Submitted by बिपिनसांगळे on 23 June, 2019 - 01:22

समस्त मायबोलीकर ,
नमस्कार .

आपण सारेच लिहिता. उत्तम लिहिता .

प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगळी. विषय वेगळे .पण कधी अडल्यासारखं हो तं. सुचत नाही किंवा डोक्यातलं शब्दात उतरत नाही.

तर कधी आपणच आपल्या वर खूष होतो , जेव्हा आपल्याला मनासारखं लिहीत येतं.

लेखन हि समाधी आहे. आनंद आहे. नशा आहे. पण त्या मध्येही आपण खाली- वर हिंदोळे घेत असतो .

तुम्हाला काय वाटतं? इतरांनाही कळू दे.

तुम्ही काय लिहिता? कसं लिहिता ? कशा पद्धतीने लिहिता? कुठल्या वेळेस लिहिता? केव्हा लेखनाचा आनंद मिळतो? तर कुठल्या अडचणी येतात ?

आपण या विषयावर व्यक्त व्हावं हि विनंती .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छोट्याश्या मेंदूतून कागदावर उतरलेलं असत. बर्याचदा अचानक काही तरी सुचत, आणि मग डोक जाम होत, जोपर्यंत डोक्यात आलेलं कागदावर येतनाही तोपर्यंत शांती लाभत नाही.
याच्याविषयी बोललो होतो. Light 1

मला तर खूप लिहावेसे वाटते....जसे कि भयकथा, रहस्य कथा पण शब्दात उतरवता येत नाही ......तेव्हा खरंच जे खूप सुंदर लिहितात त्यांचा मला हेवा वाटतो...

मस्त धागा.

काही गोष्टीं लिहायला आवडतात म्हणून लिहिल्या जातात आणि काही या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्याचं पाहिजे या तळमळीने.
काही वेळा काल्पनिक लिखाण कराव वाटतं आणि काही वेळा सत्याचे पदर उलगडून दाखवावे वाटतात.

त्यामुळे सुचलं की लिहिते होतात हात असं म्हणावं लागेल. Happy

Pages