आपण का लिहितो ?

Submitted by बिपिनसांगळे on 23 June, 2019 - 01:22

समस्त मायबोलीकर ,
नमस्कार .

आपण सारेच लिहिता. उत्तम लिहिता .

प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगळी. विषय वेगळे .पण कधी अडल्यासारखं हो तं. सुचत नाही किंवा डोक्यातलं शब्दात उतरत नाही.

तर कधी आपणच आपल्या वर खूष होतो , जेव्हा आपल्याला मनासारखं लिहीत येतं.

लेखन हि समाधी आहे. आनंद आहे. नशा आहे. पण त्या मध्येही आपण खाली- वर हिंदोळे घेत असतो .

तुम्हाला काय वाटतं? इतरांनाही कळू दे.

तुम्ही काय लिहिता? कसं लिहिता ? कशा पद्धतीने लिहिता? कुठल्या वेळेस लिहिता? केव्हा लेखनाचा आनंद मिळतो? तर कुठल्या अडचणी येतात ?

आपण या विषयावर व्यक्त व्हावं हि विनंती .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिपिनदा.. खुप छान विचार! लिहिणार्याच्या मनात त्यांच्या लेखनाच्या वेळी काय विचार येत असावेत? हा विचारच खुप गुढ आहे.
भावनांची सरमिसळ कशी होते?आणि कागदावर अलगद उतरते. यानिमित्ताने कळेल. Happy

पहिला प्रश्न का लिहितो?
- लेखाच्या विषयासंबंधी आवड असणारे वाचक यावेत,त्यांनी वाचावे. कौतुक, टाळी, त्यांचे विचार अपेक्षित.
मधल्या वयात सोडून लहान /ज्येष्ठांना टिंगलसुद्धा आवडते.

पण कधी अडल्यासारखं होतं. सुचत नाही किंवा डोक्यातलं शब्दांंत उतरत नाही.
- पुढची पायरी. म्हणजे लिहायचं, संवाद साधायचं नक्की झालेलं असतं, त्यात अगोदरच्या दोनचार वेळी भट्टी जमलेली असतेही. पण मग कधी आपलं आपल्यालाच समजतं हे लेखन जरा मेकप थापल्यासारखं वाटतंय. एवढा विचार येणंसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. दोनतीन दिवस थांबून रचना बदलण्याचं सुचतं.

तुम्ही काय लिहिता? कसं लिहिता ? कशा पद्धतीने लिहिता?

काही घटना, प्रसंग घेऊन त्यास लेखनाचा आकार देणं सिद्धहस्त लेखकांचं काम. ते अशक्य. थोडी गमतीदार वाक्यं, विनोद करून उरकणे एवढीच पद्धत. पण पांढऱ्यावर काळे ( किंवा नाईट थीम काळ्यावर पांढरे) करतो.
शैली म्हणाल तर थोडक्यात उरकणे. ललित करण्याची उगाच खटपट नाहीच.

@ बिपिन
का लिहितो हे जेवढं महत्त्वाचे तेवढेच कुठे लिहितो.
तुमचे बालसाहित्य, ललितलेख सारं काही कथा/कादंबरी या एका ठिकाणी टंकता . त्यामुळे रसभंग होते. मायबोलीवर हे विभाग वेगळे का आहेत याचा विचार व्हावा. कृपया हे लक्षात घ्याल तर बरे होईल.

मस्त विषय बिपिनदा. कथानक सुचण्यापासून ते वाचकांपर्यंत पोहोचवणे ही एक thought process असते. या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावरील अनुभुतीत लेखकाचा contentment factorखूप महत्त्वाचा असतो.

१. का लिहितो?>>
आधी प्रयत्न, पुढे गोडी आणि आता व्यसन म्हणून !

२.काय लिहिता? >>>
लेखनप्रवास असा झाला :
वृत्तपत्रांत वाचकपत्रे, मग लेख , पुढे छापील मासिकात ललितगद्य व सामाजिक, आता आरोग्यलेखन.

३. कसं लिहिता ? >>
खूप विचार करून विषय निवड , मग मुद्दे, कच्चे लेखन, शब्दकोश संदर्भ आणि संपादन.

४. केव्हा लेखनाचा आनंद मिळतो?>>
प्रथम जेव्हा विषय सुचतो तेव्हा आणि मग
वाचकांचे प्रतिसाद व प्रोत्साहन मिळाल्यावर.

५ .तर कुठल्या अडचणी येतात ?>>>
आरोग्यलेखनात एखादया वाचकाने आगळावेगळा प्रश्न विचारला, तर त्याच्या उत्तरासाठी अधिकृत संदर्भ शोधताना. कारण जालावरील सामान्य संदर्भ खात्रीचे नसतात.

दत्तादादा मला वाटते बिपीन यांचा हा धागा आणि एक बालकथा या कथा/कादंबरी या विभागात आल्यात फक्त. चुकून झाले असावे.

नाही हो JayantiP तसं काही नाहीये. बिपिन यांना मायबोलीवर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मला आवडते त्यांचे लेखन.

कुमार१ तुमचे लेख आवर्जून वाचतो. तुमच्या लेखातले प्रत्येक वाक्य न वाक्य महत्वाचे असल्याने तुम्हाला फारच जबाबदारीने लिहावे लागत असेल याची जाणीव आहे. तुमच्या पुढील लेखनास शुभेच्छा!

@ शाली तुमच्या माहितीसाठी या लिंक देतोय ज्या कथा/ कांदबरी विभागात नको होत्या.
१) https://www.maayboli.com/node/69705
काकूंच्या क्लिनरची करामत
२) https://www.maayboli.com/node/70189
दुर्बिण
३ ) https://www.maayboli.com/node/70224
बालकथा- पहिला प्रवास
४) आणि आज- आपण का लिहितो
आता तुम्ही म्हणालका चुकून लिहिले आहे. ही गोष्ट कोणीतरी आधी देखील एकदा त्यांच्या लक्षात आणून दिली आहे पण पण त्यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केले असे वाटते. म्हणून मला आज ती प्रकर्षाने सांगायची आहे. नाहीतर यापुढेही असेच चालू राहील.

दत्ताजी बिपिन माणूस खरा आहे. चूकले तरी तूम्ही जेष्ठांनी मनाला लावून घेऊ नये. शाली धन्यवाद.
नवीन Submitted by JayantiP on 23 June, 2019 - 14:02
माझ्या प्रतिसादाचा उद्देश या चुका भविष्यात होऊ नये हाच आहे यात मी कुठेही मनाला लावून घेतले नाही.

शाली, धन्यवाद.
तुमचेही मनोगत येऊद्या. पु ले शु.

तुम्ही काय लिहिता?
-कविता, लघुलेख, पाककृती, काही आठवणी,कथा वैगरे वैगरे.

कसं लिहिता ?
- जमेल अन् सुचेल तसं. एक संकल्पना पकडुन मग तिची सविस्तर मांडणी करणे. त्यासाठी लागणारी सामग्री/माहिती एकत्र करते नेट किंवा इतर स्त्रोत वापरुन.

कशा पद्धतीने लिहिता?
- हा प्रश्न समजला नाही.

कुठल्या वेळेस लिहिता?
- माझ्या मते लेखनाला वेळ नसते. कधी office मध्ये बसल्या बसल्या वेळ असेल तर, कधी पहाटे चहाचा मग हातात घेऊन, तर कधी रात्री सगळं आवरल्यावर कधी ही छोट्या छोट्या कल्पना डोक्यात येत असतात. वेळ असेल तर लगेच मी ते लिहिते. एक छोटीशी डायरी अन् पेन मी नेहमी माझ्या सोबत ठेवते. संकल्पना छोट्या डायरी मध्ये लिहिते मग त्याचा विस्तार सविस्तर पने वहीमध्ये, आणि हो यात कच्चे-चिट्टे असतात. बहुतेक लेखन कागदावर उतरवते, जमेल तसं मग पोस्ट करायचं.

केव्हा लेखनाचा आनंद मिळतो?
- मनातली संकल्पना पाहिजे तशी पानावर उतरली की मग आनंद होतो अन् वाचकांना ती आवडली की भरुन पावलो.
कोणी काही बदल सुचविले तरी आनंदच.

तर कुठल्या अडचणी येतात ?
- एकच टाईप करायला लागणारा वेळ.

* बाकी बिपिन सांगळे खरच चांगला धागा आहे हा.

आभारी आहे साऱ्यांचा .
आपापली लेखनप्रक्रिया तपासून पाहता येईल प्रत्येकाला .
पुप्रशु .

तुम्ही काय लिहिता?
लघुलेख, कथा,कोतबो ।

कसं लिहिता ?
- अँड्रॉइड वरती मराठी कीबोर्ड वापरून।

कशा पद्धतीने लिहिता?
- जमेल तसे, माझ्या चाहत्यांना आवडेल ते।

कुठल्या वेळेस लिहिता?
- शक्यतो सकाळी संडासात, टॉयलेट पॉट वर असताना।

विषय चांगला आहे.

मला वाटतं मराठी आंजावरचे बरेचसे लेखक हे स्वतःचे अनुभव ललित लेखनात लिहतात.
किंवा कथा लिहू शकणारे वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लोकांकडून आलेले ३-४ अनुभव एकत्र गुंफुन कथा बनवतात.
पूर्णपणे शून्यातून कल्पना, निर्मिती करू शकणारे जे थोडेफार असतील त्यांच्या डोक्यात काय चालतं याबद्दल मलापण उत्सुकता आहे. मला वाटतं ते थोडे 'सायको' असतात Lol

साऱ्यांचे आभार .
लेखन प्रक्रिया ही गुंतागुंतीची गोष्ट आहे .
या धाग्यातून नवीन लेखकांना मार्ग मिळावा , असं मला वाटत .

खुप विचार करुनही मला माझ्या लिहिण्याची नक्की प्रोसेस समजली नाही.
मी आजवर मायबोलीवर जे प्रकाशित केलय त्यातले बरेचसे स्वानुभवावर आधारीत असल्याने मला कधी प्लॉटची आवश्यकता पडली नाही. भाषण करायचे असले तर त्याची अगोदर तयारी असावी लागते पण गप्पा मारताना त्याची आवश्यकता वाटत नाही. माझे लेखन हे मी स्वतःशी गप्पा मारत लिहितो. एक ओळ संपता संपता पुढची डोक्यात येते. हे कुणी तरी वाचणार आहे, त्याला ते आवडायला हवे असं काही डोक्यात नसते. कच्चे लिखान, मग अंतिम लेखन, शेवटची डागडूजी हे असलं काही मी करत नाही. त्यामुळे माझ्या लेखनात शब्दांचा खुप पसारा होतो, पल्हाळ लावले जाते. मुद्दे सोडुन मी कुठेही भरकटतो. कधी कधी मागे जावून पुन्हा थोडेसे वाचावे लागते मग पुन्हा रस्ता सापडतो. Lol

मी जे काही अल्प लिहिले, बरे वाईट जसे काही लिहिले त्याला मायबोलीवर वाचकांचे खुप प्रेम मिळाले हे मात्र निर्विवाद आहे. या लेखनाने मला अनेक मित्र-मैत्रीणीही दिल्या. या प्रतिसादाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या वाचकांचे आज मनापासुन आभार मानतो. खुप खुप धन्यवाद!
__/\__

जे जे आपणासी ठावे, भंजाळूनी सोडावे अज्ञ जना.
माठाच्या माथा ओतून ज्ञाना, करावे त्या शहाणा.
असले जरी अर्धवट ज्ञान, तरी मिळाया जनी मान,
काढतो मी धागे या ठाई, उणंदुणं होता करतो लढाई.
शब्दांचे शस्त्र घेऊन हाती, दुष्टांची मग जिव्हा कापी.
मला काही लिहिता येत नाही हे मान्य आहे. पण दिसामाजी
काहीतरी लिहावं असं रामदास स्वामी बोललेत म्हणून लिहितो.
मोबल्यावर एकेक अक्षर टंकत जुळवाजुळव करत लिहितो. अचानक एखादी गोष्ट क्लिक होते व ओबडधोबड शब्दांत उतरवून टाकण्याची घाई होते.
मला जे पटेल ते लिहीतो पण खवचट, खिजवणारे प्रतिसाद आले की संयम सुटून तुटून पडतो. कारण मी लिहीलं ते मला खूप प्रिय असते. आवडलं, बदल सुचवणारे प्रतिसाद यावेत हीच अपेक्षा असते.
रिकामटेकडा असल्याने हुक्की आली तर केव्हाही लिहीतो. रात्री एक वाजता मला लिहीण्याचा खूप जोर येतो.‌ सकाळपर्यंत लिहित बसतो.

जे जे आपणासी ठावे, भंजाळूनी सोडावे अज्ञ जना.
माठाच्या माथा ओतून ज्ञाना, करावे त्या शहाणा.
असले जरी अर्धवट ज्ञान, तरी मिळाया जनी मान,
काढतो मी धागे या ठाई, उणंदुणं होता करतो लढाई.
शब्दांचे शस्त्र घेऊन हाती, दुष्टांची मग जिव्हा कापी.
मला काही लिहिता येत नाही हे मान्य आहे. पण दिसामाजी
काहीतरी लिहावं असं रामदास स्वामी बोललेत म्हणून लिहितो.
मोबल्यावर एकेक अक्षर टंकत जुळवाजुळव करत लिहितो. अचानक एखादी गोष्ट क्लिक होते व ओबडधोबड शब्दांत उतरवून टाकण्याची घाई होते.
मला जे पटेल ते लिहीतो पण खवचट, खिजवणारे प्रतिसाद आले की संयम सुटून तुटून पडतो. कारण मी लिहीलं ते मला खूप प्रिय असते. आवडलं, बदल सुचवणारे प्रतिसाद यावेत हीच अपेक्षा असते.
रिकामटेकडा असल्याने हुक्की आली तर केव्हाही लिहीतो. रात्री एक वाजता मला लिहीण्याचा खूप जोर येतो.‌ सकाळपर्यंत लिहित बसतो.

Submitted by JayantiP on 24 June, 2019 - 23:55

दिसामाजी
काहीतरी लिहावं -------

कितीही लिहावे कसेही लिहावे कुठेही लिहावे फक्त लिहिताना आपला आयडी काय आहे हे न विसरावे ...
थोडक्यात आयडी प्रमाणे इकडे बसतो ऐवजी बसते ...लिहितो ऐवजी लिहिते असे हवे ना ज्योती जी

मी काही कथा ह्या कल्पनेने तयार केल्या आहेत. पण बऱ्याच कथात माझ्या जवळच्या लोकांचा किंवा माझा अनुभव जमेत धरून कथा गुंफल्या आहेत. माझे आवडते लेखक व.पु, काळे, रत्नाकर मतकरी ह्यांच्या कथा लेखनाची शैली सुध्दा आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला आहे. कथा केव्हाही सुचतात पण माझ्याकडून पेपरवर उतरवण्यात खूपच दिरंगाई होत असते. अर्थात घराकडे मी आधी लक्ष देत असते म्हणूनही.
बिपन तुम्ही विषय छेडल्यामुळे मी थोडी मोकळेपणाने व्यक्त झाले.

बापरे
प्रत्येकाची विचार करण्याची, लिखाणाची पद्धत किती वेगवेगळी असते.. म्हणजे कोणी फक्त आवड म्हणुन लिहित, कोणी सुचलं म्हणुन लिहित, कोणाला tp करायचा असतो, तर कोणाला कौतुकाचे चार शब्द पाहिजे असतात.
आता मी का लिहते त्यावर सांगते जरा. मी अनुभव तर मुळात लिहितच नाही, कारण प्रत्येकाकडे स्वताचे असे खुप संग्रहातले अनुभव असतात. मी जे काही लिहते ते फक्त छोट्याश्या मेंदूतून कागदावर उतरलेलं असत. बर्याचदा अचानक काही तरी सुचत, आणि मग डोक जाम होत, जोपर्यंत डोक्यात आलेलं कागदावर येतनाही तोपर्यंत शांती लाभत नाही.

Pages