सुखावलो दत्ता

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 June, 2019 - 10:42

सुखावलो दत्ता
************

सुखावलो दत्ता
तुजला पाहता
जाहलो वाहता
कोंडलेला

मोहाचा पिंपळ
धुनीत जळला
जन्माचा सरला
एक गुंता

आता विभूतीचे
कौतुक मनाला
लाविले भाळाला
विनोदाने

गाता दत्त दत्त
सरले ते भय
सुखाचे उपाय
कळू आले

नेई मज बापा
हव्या तैश्या वाटा
दत्ता अवधूता
झालो तुझा

विक्रांत भाग्याचा
चाकर दत्ताचा
चुकार सेवेचा
प्रिय झाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
००००००

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलंय.
तुमच्या जीवनात दत्त महाराजांचे अनन्यसाधारण असे स्थान आहे; ह्याची प्रचिती वेळोवेळी तुमच्या कवितेत दिसुन येते. Happy पुलेशु!

खुप छान...तुमच्या जीवनात दत्त महाराजांचे अनन्यसाधारण असे स्थान आहे ह्याची प्रचिती वेळोवेळी तुमच्या कवितेत दिसुन येते +++१....हे अगदी खरयं

यांना कविता म्हणण्यापेक्षा भजनं म्हणणं मला आवडेल. एखाद्या संगितकाराकडून चाल लावून भावगीते/ भक्तीगीते गाणाऱ्या गायक,गायिकेकडून गाऊन घेतली तर खूपच लोकप्रिय होतील.

मोहाचा पिंपळ
धुनीत जळला
जन्माचा सरला
एक गुंता >>>>> व्वाह... सुरेखच... Happy