षटकार पृथ्वी प्रदक्षिणांचा - कॅप्टन च्या जहाजातून

Submitted by मीना उत्तरा on 22 June, 2019 - 09:49

नमस्कार मंडळी.

मी सुरवात करत आहे छोट्या लेख मालिकेला.

सचिन माझा नवरा - कॅ.उपेंद्र गोगटे. गेली 41 वर्ष मर्चंट नेव्हीतील नोकरी, अफाट जग प्रवास 121 देश फिरलेला, तब्बल सहा वेळा झालेल्या पृथ्वी प्रदक्षिणा...युद्ध, समुद्रातील चाचेगीरी,अनेकविध वादळे....काय आणि किती ?..विविध थरारक अनुभवानी समृद्ध आयुष्य... आज त्याच्या वयाच्या साठीच्या निमित्ताने मी हे त्याचे अनुभव त्याच्याच शब्दात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा आहे तुम्हाला वाचायला आवडेल.
ता.क. मी माझ्या फेसबुकवर जानेवारी पासून ह्या विषयावर लेख पोस्ट करत आहे. तिकडच्या काही वाचकांनी मला मायबोली वर लिहिण्याचा आग्रह केला म्हणून हा प्रपंच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... दर्यावर्दी आयुष्य जगलेल्या व्यक्ती व त्यांच्या गोष्टी यांचे कायम सगळ्यांना आकर्षण वाटत राहिले आहे.

तुमचे मायबोलीवर स्वागत. लेखमाला वाचायला आवडेल.

अरे वा... दर्यावर्दी आयुष्य जगलेल्या व्यक्ती व त्यांच्या गोष्टी यांचे कायम सगळ्यांना आकर्षण वाटत राहिले आहे.
तुमचे मायबोलीवर स्वागत. लेखमाला वाचायला आवडेल.>>>+११११

मायबोलीवर तुमचं स्वागत! Happy

मला समुद्राचं आकर्षण अगदी लहानपणापासुन आहे.मर्चंट नेव्हीत काम करणार्या माणसाचा प्रत्येक दिवस नवनवीन संकट आणि घटनांनी संपन्न असतो.म्हणुन तुमची लेखमाला वाचायला खुप आवडेल. Happy

सहा वेळा झालेल्या पृथ्वी प्रदक्षिणा>>> बापरे, सिंदबाद जहाजीच होते तुमचे मिस्टर.नक्की वाचणार.