मुलासाठी ना व सु च वा

Submitted by manasi0987 on 21 June, 2019 - 06:46

मु ला साठी स वरून संस्कृत नाव हवे आहे. किंवा ज्या नावाचा अर्थ कृष्ण किंवा विष्णु असेल असे नाव हवे आहे.कृपया सुचवावे.किंवा एखादे छान नाव वरील criteria madhe नसेल बसत तरीही हरकत नाही.धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्विल
सर्वेश
श्रेयांश

शर्विल हे कृष्णाचे नाव आहे की शंकराचे? पण छान आहे आणि सध्या लोकप्रियही आहे. क्रिश हे नावही सध्या खूप लोकप्रिय आहे. हे अर्थात कृष्णचे लघुरूप.

ज्याचे ईंग्रजीकरण सहज करता येईल असे नाव ठेवा. जसे आनंद - अँडी, विक्रम - व्हिकी, सुधीर- सिड, क्रिश- ख्रिस
म्हणजे कसे बोलताना आपण एकदम मॉडर्न असल्यासारखे वाटेल.

Samridh समृध
अथांग
सार्थक
सारंग
सारथी
शौनक
स्वयं
सुश्रुत

श्याम मनोहरांचे उत्सुकतेने मी झोपलो नावाचे पुस्तक वाचा. त्यातल्या पहिल्या दीर्घकथेत स वरुन सुरू होणारी बरीच नावे सापडतील.

सुदर्शन
श्रीनिवास
सहस्रजीत
शोभित
श्याम
साकेत
श्रीहरी
समेह

सौमीक : सोम (चंद्र?) विषयक, संबंधी.
नविन नावात व्यवस्थित अर्थ असेलच असे नाही, ऐकायला कसे वाटते यावरून ठरवतात.

सनक
सनातन
सनंदन
सनतकुमार

४ कुमारांचे नावं "स" वरून

सत्यम
सार्थक
सत्यजित
सौमिल - माझ्या एका गुज्जू मित्राच नाव आहे. बोलताना सारे सोमिल म्हणतात.

विष्णु सहस्त्रनाम पोथी उघडावी, डोळे मिटून पानावर बोट ठेवावे . डोळे उघडून बोट ज्या नावावर असेल ते नाव श्रध्दापुर्वक ठेवावे.