आयुष्याच्या वाटेवर..

Submitted by मन्या ऽ on 21 June, 2019 - 03:33

आयुष्याच्या वाटेवर..

आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात
काही विस्मृतीत
जातात ; तर
काही मनात घर
करतात..
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

मनात घर करणारे
खोलवर रुजतात;
त्यांची साथ
हवीहवीशी वाटत
असताना मात्र
साथ सोडुनिया जातात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

त्यांच्या परतण्याची
वाट पाहत असताना
डोळेही पाणावतात.
त्यांच्याही मनात
तेच असतं ;
सांगताना मात्र
कचरतात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..
त्यातले काहीजणच
मात्र मैत्रीला जागतात..

(दिप्ती भगत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खर आहे

@पद्म अशी पाखरे येती हे सुधीर फडके यांच सुंदर गाणं तुम्हाला कविता वाचुन आठवलं.यातच सगळ आलं.प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

अज्ञातवासी प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

शिवली, महाश्वेता प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

@ JayantiP नाही हो कॉपीपेस्ट नाहीये ताई. Happy
माझ नाव दिप्ती भगत आहे.आणि प्रत्येक कवितेच्या खाली मला माझं नाव लिहिण्याची सवय आहे.प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy