इच्छा आणि अपेक्षा!

Submitted by अज्ञातवासी on 20 June, 2019 - 16:24

अपेक्षा सांग जरा,
त्यांच्यापायी उपेक्षा कशाला?
वाढतच जाणाऱ्या अपेक्षा ह्या,
प्रेमाचा अजबच खेळ हा!

कुणाच्या इच्छा, कुणाच्या अपेक्षा असतात,
इच्छा वाईट, अपेक्षा चांगल्या असतात,
जवळ तर ये, सांग तर,
अपेक्षा तरी नक्की काय असतात?

हवं ते पुढच्या क्षणात हवं असतं,
जेव्हा वाटेल तेव्हाच कवेत घ्यावस वाटतं,
इच्छांच फक्त आर्जव असतं,
त्या चुरडण्यातही एक मार्दव असतं.

इच्छेला नसतो कुणी वाली,
अपेक्षेची सर्वांशी मैत्री,
इच्छेला फक्त पूर्णत्वाची आस,
अपेक्षेला मात्र निराळाच ध्यास.

इच्छा वाईट असते, अपेक्षा चांगली,
अपेक्षेची अधिकारवाणी, इच्छेची नाकघासणी,
दोष नसे कुणाला, अक्कल नसे इच्छेला,
वाढतच जाणाऱ्या अपेक्षा ह्या,
प्रेमाचा अजबच खेळ हा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कविता!
पण पार गोंधळ केला हो माझ्या अगोदरच अल्प असलेल्या मतीचा. Lol
Light 1

सुंदर
इच्छा आणि अपेक्षात असलेला सुक्ष्म फरक ..
ब-याचदा आपण दोन्ही एक समजतो.

छान. अगदी गुंतागुंतीची कविता आहे.
लावुन लावुन वाचली तेव्हा कुठे डोक्यात शिरली.
शालीदा म्हणाले तसं "पार गोंधळ केला हो माझ्या अगोदरच अल्प असलेल्या मतीचा."

मन्या अग "नीट वाचल्यावर कळतेय" म्हणजे तेच ना सरसकट एकदा वाचून लगेच लक्षात येत नाही. नीट वाचावं लागतं समजण्यासाठी.

तसं पण वाचकांना गुंतवून ठेवण हे अज्ञातवासींच्या लिखाणाच कसब आहे. मग कविता असो किंवा कथा.
असंच काहीसं महाश्वेता यांच मत असाव असं मला वाटतंय.