मुंबई गटग - वृत्तांत

Submitted by कविन on 7 April, 2009 - 06:15

(डिस्क्लेमरः हा एक ओळीचा वृत्तांत खास पर्‍यासाठी. पर्‍या तू फक्त येव्हढच वाच. रविवारी पिव्हीआरला जमलो. धम्माल केली :))

दक्स चा वृत्तांत वाचलात ना? मुलुंड चा पण गटग तसाच झाला, फक्त १२ च्या ऐवजी ३- ३.५ तास आणि कोरम जरा कमी होता इतकच बाकी भावना शेम टु शेम Wink

पर्‍या मुंबईत येणार म्हणाला म्हणुन अगदी आयत्या वेळेला ठरवलेला गटग, आधी मलाच खात्री नव्हती होत, खरच जमणार सगळे की मी एकटीच भोज्जाला हात लावुन येणार ते. एकतर हा माझा पहीलाच गटग त्यात परत विनयने मलाच कार्यवाह करुन घोड्यावर चढवलेल म्हणजे एकटीच का होईना पण जाण भागच होतं.

सगळ्यांना फोना फोनी करुन मुलुंड च पिव्हीआर मॉल निश्चीत केलं. आधी ठाण्याच गडकरी ठरत होत ते लली आणि यो च्या सांगण्या वरुन पिव्हीआर वर ठरवलं. मी, विनय, पर्‍या पहिल्यांदाच मॉलच (आणि एकमेकांच पण) तोंड बघणार होतो.

पर्‍याने नवर्‍याला नी लेकीला घेउन ये अशी प्रेमळ धमकी दिली होती म्हणून नवरोबांना शुक्रवार पासुनच सांगुन ठेवल होत. तरी परत शनिवारी त्याची (म्हणजे नवरोबाची) भुण भुण चालु होती. सगळ्यांना फोन करुन विचार बघ कॅन्सल तर नाही ना झालं? नाहीतर फोन करुन डोंबिवलीलाच बोलाव आपल्या घरी. त्याला चिंता एकतर मेगा ब्लॉक, त्यात मी त्याची सानु सकट वरात काढणार, बरं भेटणारे सगळ्यांना प्रथमच बघणार. मग बोलायच काय? ह्या सगळ्या भुणभुणीला कानाआड करुन (म्हणजे नेहमी प्रमाणेच) मी जायचच हे डिक्लेअर केलं. मग त्याचाही नाईलाज झाला असावा (गुणी नवर्‍या प्रमाणे तोही तय्यार झाला)

रविवारी सकाळी यो चा समस आला, "सॉरी, नाही जमु शकणार" . माझा चेहरा बघुन नवर्‍याने विचारलच "काय ग कॅन्सल का?" ते तसच उडवुन मी बाकीच्यांना समस केले. म्हंटल बघु कोण नक्की येतय ते तरी. विनय, पर्‍या ने लग्गेच "नक्की येतोय" म्हणुन समस केले. लली ने पण यो पाठोपाठ "सॉरी कळवल", विशाल ने फोन केला दुपारी १.५ ची फ्लाईट आहे ३.५ ला मुंबई तिथुन घरी. थोड उशीरा येईन.

पण चला येईन तर म्हंटल म्हणून मी खुश. म्हंटल मी धरुन ४ मेंबर तर नक्की झाले. आशु आणि मंजु डी आशु ची मिटींग लवकर संपली तर येणार होत्या म्हणजे धड ना ह्या दगडा वर धड ना त्या. म्हणजे नक्की येणारा कोरम ४ जणांचा. मी मग घरुन जरा उन्ह उतरल्यावर निघायच ठरवल. विचार केला जर सगळेच टांगारु झाले तर सानुला तिथे फिरवुन एका नातेवाईकांकडे जाऊन घरी परतायच.

नशिबाने ट्रेन ने फारसा धोका न देता मुलुंडला वेळेत पोहोचवलं. आणि आम्ही तिघे वेळेच्या आधिच पिव्हीआरला पोहोचलो. कट्टा मालक विनयचा ५ मि. फोन आला, येतोच आहे म्हणुन आणि काय आश्चर्य खरच ५ मि. तो आमच्या समोर आला पण. पर्‍या पण ५.४५ पर्यंत आला. मग आमचा थंड जागा शोधण्याचा कार्यक्रम करुन झाला नी आम्ही सिसिडीत जाऊन बसलो.

कट्टा मालक म्हणजे मला जरा ३५-४० च्या दरम्यानचा आडव्या बांध्याचा माणुस वाटला होता (म्हणजे आमच्या इथे एक विनय वेलणकर म्हणून वैद्य आहेत त्यांच्या सारखा हा विनय असणार अस वाटल होत) प्रत्यक्षात मात्र अपेक्षाभंग झाला. दिसण्यात अपेक्षाभंग झाला असला तरी बाकी बाबतीत नाही झाला. एकदम दिलदार माणुस (मालक तुम्ही दिलेल्या कॉफीला जागले बर का ;))

पर्‍या ला जसा इमॅजीन केला होता तसाच निघाला (म्हणजे इरसाल ;)) समिर येणार ही नविन पण सुखद बातमी होती. एक एक करत सगळी टाळकी जमली. आम्ही सगळे मिळुन १० जण होतो (२ मोठी - सानु - माझी लेक आणि निरजा - मंजु डी ची लेक), ३ मुली (मी, आशु नी मंजी) आणि ५ लहान मुल - पर्‍या, समिर, विशाल आणि विनय, विश्वेश (माझा नवरा) होतो. त्यात आशु सगळ्यात शेवटी आली ती येईपर्यंत कोणि जायच नाही म्हणुन पर्‍याने सगळ्यांना दम भरला होता.

एक एक येईल तसा "ओळखा कोण" चा खेळ खेळुन झाला. त्यात पण परेश नी मंजुला मस्त गंडवल आणि कोणीच कोणाला ओळखु शकल नाही . मंजु नी आशु ला सम्या मालक वाटला, नी विनय पर्‍या वाटला.

गप्पा कट्ट्यावरुन सुरु होऊन नेहमीची वळण घेत घेत गेल्या. पर्‍याला श्रिखंडा वरुन थोड पिडुन झाल (म्हणजे नेहमी कट्ट्यावर पिडतो तेच). आशु आल्यावर थोडावेळ "विशाल" गिर्‍हाईक होता मस्करीच. बिचारा मुग गिळुन बसला होता Biggrin . पर्‍याचे पंचेस जबरदस्त होते (ते इथे सांगण्या सारखे नाहीत उगाच का व्ही & सी करा :G) (खाजगीत विचाराल त्याला तर तो "नाव" बघुन सांगेल - आता ह्यावरुन समजा की लोकहो) परेश ने मला गिर्‍हाईक बनवुन माझी पण मस्करी करुन झाली ललित वरुन. केव्हढ मोठ्ठ लिहितेस. एका ओळीत सांग ना काय ते म्हणुन. म्हणुन त्याच्यासाठी वृतांत एका ओळीत सुरुवातीला लिहीलाय.

कोण काय काय करत (करत नाही) त्या सगळ्याची उजळणी झाली. वय विसरुन एकमेकांची मस्करी चालली होती. आम्हाला वाटत होत आता बहुतेक हाताला धरुन आम्हाला बाहेर काढणार सिसिडी वाले पण नाही त्यांना सवय असावी अशा वागण्याची .

कॉफी प्यायली. बील आलं तेव्हा सगळे चित्पावन उदार राजा सारखे वागत होते. टीटीएमएम काय पण टिटीएमटी पण नाही चक्क टिएमएमएम चालल होतं (तुझ मी आणि माझ पण मीच) शेवटी मालकांनी बील भरल, पर्‍या आम्हाला डोंबिवली पर्यंत लिफ्ट देईन म्हणाला (पण ट्रॅफिक नी रोड पहाता मला ट्रेन सोयिस्कर होती) सगळच आक्रित. बहुतेक हा फरक पुण्यातले मुळचे वाड्यातले चित्पावन नी मुंबापुरीत राहुन बदललेले चित्पावन अशामुळे असावा (आता माझ्यावर संक्रांत येणार पुणेकर हाणणार मला.लोक्स मजेत घ्या, सगळेच दिलदार हायती, पुणेकर मला हाणु नका तिकडे आल्यावर स्वःखर्चाने पार्टी द्या म्हणजे माझ म्हणण खोडुन निघेल ;))

खरच बाहेरच्या कोणि बघितल असेल तर वाटणारही नाही कोणाला ही खिदळणारी खोडं पहील्यांदा भेटतायत म्हणुन. खुप मज्जा आली. असा मस्त गॄप जमवुन दिल्या बद्दल मायबोलीचे आभार.

गुलमोहर: 

दिसण्यात अपेक्षाभंग झाला असला तरी बाकी बाबतीत नाही झाला.
अग ताई लोकांना वाटेल की मी ६० - ६५ चा आहे.
असतरी म्हणायचस की मी सगळ्यात लहान होतो ते...........

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

कविता, अगं मालकांनी परेशला लग्नाबाबत मारलेले फंडे पण राहिले की गं लिहायचे... आणि विशालच्या मायबोलीवरच्या खास मैत्रिणीबद्दल केलेली चर्चा आणि त्याला चढलेला आवेशपूर्ण रंग.. Wink ते पण राहिलं लिहायचं...

बाय द वे, त्या मैत्रिणीची आठवण काढल्यावर विशाल पण चुटपुटला... तिला लिफ्ट द्यायची संधी हुकली ना त्याची.. Lol

विशाल Light 1 Happy

विशाल्दा... आता वो Wink Light 1

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

४ लहान मुल - पर्‍या, समिर, विशाल आणि विनय, विश्वेश (माझा नवरा) होतो

अच्छा, म्हणजे तुझा नवरा या सगळ्या "माणसांत" नव्हता का !

टवाळा तो माबो व्यतिरिक्तचा लहान मुलगा होता, इथल्या लोकांच्या माहितीतले ४ च नग होते म्हणून ४ म्हंटल Wink चल आता एडीटुन टाकल, तो पण लॉग ईन न केलेला माबोकर झालाय पक्का गटग पासुन. मी नाही सांगितल तरी तोच विचारपुस करतो आपणहुन सगळ्यांची Happy

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

मंजुडे, खपल्या काढतेस. बघुन घेइन तुला ! Wink
____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

मला गंमत वाटली ती "आसेतुहिमाचल" समस्त स्त्री-वर्ग कसा एकाच पद्धतीने विचार करतो याची. बाकी सर्वाना काही ना काही वेगळी ओळख असते पण "नवरा" हा फक्त नवराच असतो. त्याची अशी काही वेगळी ओळख गंमतीतही करता येत नाही.

आणि विशालच्या मायबोलीवरच्या खास मैत्रिणीबद्दल केलेली चर्चा आणि त्याला चढलेला आवेशपूर्ण रंग.. >>> कोन कोन मैत्रिन?... आम्हाला कलायलाच पायजेल... दादा वो... सांगा नं...

सत्या इथेपण सेंच्युरी करायचा विचार आहे काय तुम्हा लोकांचा? Wink जगुद्या की शांतपणे. पुढच्या गटग ला या नी समक्ष भेटीत इचारा तुमच्या विशाल दा ना Biggrin

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

सत्या इथेपण सेंच्युरी करायचा विचार आहे काय तुम्हा लोकांचा?
>> मी म्हन्तो काय हरकत आहे...? पुण्याची झाली आता मुंबै का मागे Wink

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

विशल्या, तुझं भांडं फोडू काय? Proud

ए गपा रे ! चैन पडत नाही का? विशाल, म्हणून गप्प गप्प होतास होय?
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

का रे, असं का म्हणतोयस? Uhoh
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |

अगं अश्वे तिथल्या पोष्टी उडवल्यात अ‍ॅडमिननी, पण एका अर्थी बरंच झालं ते... नाही का?

कविता, छान लिहिलयस गं... मज्जाच केली . तुमचे फोटोज मला समीर च्या क्रुपेने बघता आले... छान आले आहेत. तुला ओळखल मी. पण बाकीच्या मुली ओळखल्या नाहीत मी.
---------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

कवितादी,
पुढच्यावेळी मी पण येणार. आम्हालाही तुम्हा सगळ्यांना भेटायची संधी मिळू दे की.

अरे जिन्स् न जॅकेट मला बी घालू द्या की रं,
मला बी गटग ला येऊ द्या की!! Happy

सस्नेह,
---------------------------------------------------
सुख म्हणजे दु:खाचा उरलेला गंध,
रडता-रडता हसण्याचा... आवडता छंद!

अनघा, बाकीच्या मुली म्हणजे मी आणि अश्विनी_के.... Happy हिरवा ड्रेस अश्विनी आणि उरलेली मी... Happy बाकी दोन छोट्या मुली आहेत.. पांढरा ड्रेस - सानिका (कविताची लेक) आणि केशरी टि-शर्ट - नीरजा (माझी लेक)

पुण्याच्या जीटीजेचेही फोटो मी पाहिले बरं का.... तुला ओळखलं मी (कारण नावासकट फोटो मिळाले Proud )

अरे कवे मला आता पुने ग ट ग चे पिक पाथ्व ग..

चला, मंजु निदान आता तोंड ओळख झाली म्हणायची.. (एकमेकिंची तोंडं पाहीलीत ना आपण फोटोमध्ये.)
प्रत्यक्ष भेटीचा योग कधी येतो ते बघुया.
----------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अनघा, बाकीच्या मुली म्हणजे मी आणि अश्विनी_के.... हिरवा ड्रेस अश्विनी आणि उरलेली मी... >>

मंजुडी तुला बाकी व्यापुन उरलेली मी असं म्हणायचय का? Wink

____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

विशाल, तूच रे तूच एकटा..... लिहून झाल्यावर कोणीच काही म्हटलं त्या वाक्यावर तेव्हा वाटलं की अनुल्लेख झाला Sad पण आज तू दिवस सार्थकी लावलास... Wink

'अश्विनीने व्यापून टाकल्यावर उरलेली मी' असं म्हणायचं होतं मला...... Wink

अश्विनी Light 1 Wink

कविता, अ‍ॅडही छान आहे! मात्र त्यात तुझा सहभाग कोणता?
अजिंक्य नवरे कोण आहे?

माझ्या मुलाचे नावही अजिंक्यच आहे.

मंजू, घेतले दिवे Happy मला कसं व्यापायला फार्फार आवडतं Proud btw हा विन्या एवढा भयानक क्लोज-अप काढेल हे मला माहित असतं तर मी पार दुसर्‍या टोकाला बसले असते.
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

किती छान लिहीलंय कविता..ए पुढल्या वेळी मला पण कळवा ना प्लीsssssssssssssssज...आता वाचुनच इतकी मज्जा आली..भेटल्यावर किती मजा येईल... Happy

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

ह्या जीटीजी ला आम्ही फुकटात मज्जा करुन आलो गं कवे तुझ्यामुळे..... मायबोलीमुळे मस्त मित्र्-मैत्रिणी मिळतात हे सिद्ध झालं.

अरे अरे.. मी हुकलो ना.. मी येत्या आठवड्यात येतो आहे मुंबईला Sad

अय्या!!! हा बाफ वर आला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या Happy अगदी १०-१५ मिनिटांचं एक उभ्याउभ्या गटग गडकरीला अटेंड केलं होतं पण माझं हे पहिलंच साग्रसंगीत गटग आणि मंजू व मी जाणार होतो. कुणीच एकमेकांना पाहिलं नव्हतं, आम्ही दोघींनीही एकमेकींना पाहिलं नव्हतं. मला आठवतंय त्याप्रमाणे ६-६.१५ ला मिटिंग संपल्यावर मंजूला मी कळवलं होतं की आता बाहेर पडतेय मिटिंगमधून, तर मी आता एवढ्या उशिरा काही येत नाही. तिचा प्रेमळ आग्रह आणि बाकिच्यांना परेशने अश्विनी आल्याशिवाय जायचं नाही असं सांगितलंय (माहेरचा माणूस हो! आडनावाने आणि ल्हानपण / युवतीपण Proud एकाच गावात घालवल्यामुळे) म्हटल्यावर मी तडक ठाणे स्टेशन गाठलं आणि नाहुरला उतरुन PVRला गेले. सगळेजण एवढे मोठे (घोडे) झाल्यावरही गेटटूगेदर होऊ शकतात ही माझ्यासाठी नवलाची गोष्ट होती. आता ती नित्याची गोष्ट झाली आहे. आता बरेच दिवसांत गटग झालं नाही तर चैन पडत नाही.

चित्पावन >>>> Lol बघा! उग्गाच नावं ठेवतात आम्हाला Lol लिमये, रानडे, भिडे, करमरकर अशी गँग होती की! पण कुलकर्णी आणि नवरेंनी कौतुक केलं हा त्यांचा मनाचा प्रामाणिक मोठेपणा Wink

Pages