मुंबई गटग - वृत्तांत

Submitted by कविन on 7 April, 2009 - 06:15

(डिस्क्लेमरः हा एक ओळीचा वृत्तांत खास पर्‍यासाठी. पर्‍या तू फक्त येव्हढच वाच. रविवारी पिव्हीआरला जमलो. धम्माल केली :))

दक्स चा वृत्तांत वाचलात ना? मुलुंड चा पण गटग तसाच झाला, फक्त १२ च्या ऐवजी ३- ३.५ तास आणि कोरम जरा कमी होता इतकच बाकी भावना शेम टु शेम Wink

पर्‍या मुंबईत येणार म्हणाला म्हणुन अगदी आयत्या वेळेला ठरवलेला गटग, आधी मलाच खात्री नव्हती होत, खरच जमणार सगळे की मी एकटीच भोज्जाला हात लावुन येणार ते. एकतर हा माझा पहीलाच गटग त्यात परत विनयने मलाच कार्यवाह करुन घोड्यावर चढवलेल म्हणजे एकटीच का होईना पण जाण भागच होतं.

सगळ्यांना फोना फोनी करुन मुलुंड च पिव्हीआर मॉल निश्चीत केलं. आधी ठाण्याच गडकरी ठरत होत ते लली आणि यो च्या सांगण्या वरुन पिव्हीआर वर ठरवलं. मी, विनय, पर्‍या पहिल्यांदाच मॉलच (आणि एकमेकांच पण) तोंड बघणार होतो.

पर्‍याने नवर्‍याला नी लेकीला घेउन ये अशी प्रेमळ धमकी दिली होती म्हणून नवरोबांना शुक्रवार पासुनच सांगुन ठेवल होत. तरी परत शनिवारी त्याची (म्हणजे नवरोबाची) भुण भुण चालु होती. सगळ्यांना फोन करुन विचार बघ कॅन्सल तर नाही ना झालं? नाहीतर फोन करुन डोंबिवलीलाच बोलाव आपल्या घरी. त्याला चिंता एकतर मेगा ब्लॉक, त्यात मी त्याची सानु सकट वरात काढणार, बरं भेटणारे सगळ्यांना प्रथमच बघणार. मग बोलायच काय? ह्या सगळ्या भुणभुणीला कानाआड करुन (म्हणजे नेहमी प्रमाणेच) मी जायचच हे डिक्लेअर केलं. मग त्याचाही नाईलाज झाला असावा (गुणी नवर्‍या प्रमाणे तोही तय्यार झाला)

रविवारी सकाळी यो चा समस आला, "सॉरी, नाही जमु शकणार" . माझा चेहरा बघुन नवर्‍याने विचारलच "काय ग कॅन्सल का?" ते तसच उडवुन मी बाकीच्यांना समस केले. म्हंटल बघु कोण नक्की येतय ते तरी. विनय, पर्‍या ने लग्गेच "नक्की येतोय" म्हणुन समस केले. लली ने पण यो पाठोपाठ "सॉरी कळवल", विशाल ने फोन केला दुपारी १.५ ची फ्लाईट आहे ३.५ ला मुंबई तिथुन घरी. थोड उशीरा येईन.

पण चला येईन तर म्हंटल म्हणून मी खुश. म्हंटल मी धरुन ४ मेंबर तर नक्की झाले. आशु आणि मंजु डी आशु ची मिटींग लवकर संपली तर येणार होत्या म्हणजे धड ना ह्या दगडा वर धड ना त्या. म्हणजे नक्की येणारा कोरम ४ जणांचा. मी मग घरुन जरा उन्ह उतरल्यावर निघायच ठरवल. विचार केला जर सगळेच टांगारु झाले तर सानुला तिथे फिरवुन एका नातेवाईकांकडे जाऊन घरी परतायच.

नशिबाने ट्रेन ने फारसा धोका न देता मुलुंडला वेळेत पोहोचवलं. आणि आम्ही तिघे वेळेच्या आधिच पिव्हीआरला पोहोचलो. कट्टा मालक विनयचा ५ मि. फोन आला, येतोच आहे म्हणुन आणि काय आश्चर्य खरच ५ मि. तो आमच्या समोर आला पण. पर्‍या पण ५.४५ पर्यंत आला. मग आमचा थंड जागा शोधण्याचा कार्यक्रम करुन झाला नी आम्ही सिसिडीत जाऊन बसलो.

कट्टा मालक म्हणजे मला जरा ३५-४० च्या दरम्यानचा आडव्या बांध्याचा माणुस वाटला होता (म्हणजे आमच्या इथे एक विनय वेलणकर म्हणून वैद्य आहेत त्यांच्या सारखा हा विनय असणार अस वाटल होत) प्रत्यक्षात मात्र अपेक्षाभंग झाला. दिसण्यात अपेक्षाभंग झाला असला तरी बाकी बाबतीत नाही झाला. एकदम दिलदार माणुस (मालक तुम्ही दिलेल्या कॉफीला जागले बर का ;))

पर्‍या ला जसा इमॅजीन केला होता तसाच निघाला (म्हणजे इरसाल ;)) समिर येणार ही नविन पण सुखद बातमी होती. एक एक करत सगळी टाळकी जमली. आम्ही सगळे मिळुन १० जण होतो (२ मोठी - सानु - माझी लेक आणि निरजा - मंजु डी ची लेक), ३ मुली (मी, आशु नी मंजी) आणि ५ लहान मुल - पर्‍या, समिर, विशाल आणि विनय, विश्वेश (माझा नवरा) होतो. त्यात आशु सगळ्यात शेवटी आली ती येईपर्यंत कोणि जायच नाही म्हणुन पर्‍याने सगळ्यांना दम भरला होता.

एक एक येईल तसा "ओळखा कोण" चा खेळ खेळुन झाला. त्यात पण परेश नी मंजुला मस्त गंडवल आणि कोणीच कोणाला ओळखु शकल नाही . मंजु नी आशु ला सम्या मालक वाटला, नी विनय पर्‍या वाटला.

गप्पा कट्ट्यावरुन सुरु होऊन नेहमीची वळण घेत घेत गेल्या. पर्‍याला श्रिखंडा वरुन थोड पिडुन झाल (म्हणजे नेहमी कट्ट्यावर पिडतो तेच). आशु आल्यावर थोडावेळ "विशाल" गिर्‍हाईक होता मस्करीच. बिचारा मुग गिळुन बसला होता Biggrin . पर्‍याचे पंचेस जबरदस्त होते (ते इथे सांगण्या सारखे नाहीत उगाच का व्ही & सी करा :G) (खाजगीत विचाराल त्याला तर तो "नाव" बघुन सांगेल - आता ह्यावरुन समजा की लोकहो) परेश ने मला गिर्‍हाईक बनवुन माझी पण मस्करी करुन झाली ललित वरुन. केव्हढ मोठ्ठ लिहितेस. एका ओळीत सांग ना काय ते म्हणुन. म्हणुन त्याच्यासाठी वृतांत एका ओळीत सुरुवातीला लिहीलाय.

कोण काय काय करत (करत नाही) त्या सगळ्याची उजळणी झाली. वय विसरुन एकमेकांची मस्करी चालली होती. आम्हाला वाटत होत आता बहुतेक हाताला धरुन आम्हाला बाहेर काढणार सिसिडी वाले पण नाही त्यांना सवय असावी अशा वागण्याची .

कॉफी प्यायली. बील आलं तेव्हा सगळे चित्पावन उदार राजा सारखे वागत होते. टीटीएमएम काय पण टिटीएमटी पण नाही चक्क टिएमएमएम चालल होतं (तुझ मी आणि माझ पण मीच) शेवटी मालकांनी बील भरल, पर्‍या आम्हाला डोंबिवली पर्यंत लिफ्ट देईन म्हणाला (पण ट्रॅफिक नी रोड पहाता मला ट्रेन सोयिस्कर होती) सगळच आक्रित. बहुतेक हा फरक पुण्यातले मुळचे वाड्यातले चित्पावन नी मुंबापुरीत राहुन बदललेले चित्पावन अशामुळे असावा (आता माझ्यावर संक्रांत येणार पुणेकर हाणणार मला.लोक्स मजेत घ्या, सगळेच दिलदार हायती, पुणेकर मला हाणु नका तिकडे आल्यावर स्वःखर्चाने पार्टी द्या म्हणजे माझ म्हणण खोडुन निघेल ;))

खरच बाहेरच्या कोणि बघितल असेल तर वाटणारही नाही कोणाला ही खिदळणारी खोडं पहील्यांदा भेटतायत म्हणुन. खुप मज्जा आली. असा मस्त गॄप जमवुन दिल्या बद्दल मायबोलीचे आभार.

गुलमोहर: 

(पर्‍या ला जसा इमॅजीन केला होता तसाच निघाला (म्हणजे इरसाल Happy )>>>>>

कविन्.....हा पर्‍या कोण सांग गं....मला वाटतं मी ओळखतो....म्ह्णून विचारलं......नुस्तं नावावरून आणि त्याच्या वर्णनावरून....

Pages