ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या

Submitted by सिद्धेश्वर विला... on 17 June, 2019 - 08:56

ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या

झोळीत भावना कैक

शब्द कुठं अन कसं पेरू ?

याचीच पडलीय मला मेख II

शब्द तो परतुनी येता

भावना ती तीव्र होई

शब्द तो परतुनी येता

भावना ती तीव्र होई

उतरता दौतीतुनी तर

मन मात्र शांत होई

तृप्त होता मन माझे

शब्द होई नाहीसा

भावनांनी पुन्र्जन्मायचा

घेतला आहे वसा II

शब्द जोडे भावनेला

साद मन जे घालिती

सोडवी कोडे क्षणात

भावना ज्या मांडती

शब्द वाहे भावनांना

नित्य फिरुनी जन्मती

शब्द माझा सोबती , गड्या

अन ..............

शब्द ती सरस्वती II

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली..

ओंजळीत शब्द मोजकेच माझ्या
झोळीत भावना कैक
शब्द कुठं अन कसं पेरू ?
याचीच पडलीय मला मेख II
- या ओळी सुरेख.

शब्द माझा सोबती , गड्या
अन ..............
शब्द ती सरस्वती II
- आवडली अन समजलीही.

धन्यवाद सर्वाना ,, कविता आवडली आणि समजली , दोन्ही पुरस्कार मिळाले तेही आजच .. एक सामना हरला आणि लगेच दुसरा जिंकलाही .. सोन्याहून पिवळं