Submitted by जोतिराम on 17 June, 2019 - 08:36
तिचा प्रियकर तिचा जराही विचारच करत नाहीये, आणि तिची फक्त एकच अपेक्षा आहे की, त्यानं तिला समजून घ्यावं. म्हणून ती म्हणतेय की
तो दुअर्थ बघ जरासा
मी होऊन बघ जरासा
वाटे हवी मज साथ अन तू
जवळून बघ जरासा
मोहित मी तुला अन
तू होऊन बघ जरासा
जे सांगून टाकलेले
समजून बघ जरासा
आता पिसाटलेले
आवरून बघ जरासा
रंगीत लगाम त्याची
आवळून बघ जरासा
आहे तुझीच मी जर
जा थांबुन बघ जरासा
दुसऱ्या जगात माझ्या
हरवून बघ जरासा
तो जो राग अंतरीचा
हो सोडून बघ जरासा
सर्वस्व साधणारे बीज प्रेम
रुजवून बघ जरासा
जवळून बघ जरासा
हरवून बघ जरासा
-जोतिराम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुरेख
सुरेख