भूक.

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 17 June, 2019 - 02:35

भूक.

गाडी रस्त्याच्या कडेला लावून ती वाट पाहत होती, अन तिची नजर समोरच्या गर्दीत गेली... तिचं ही...हो तीच, कडेवरच बाळ तेच गोड, मोहक....एकटक पाहताना तिचं विचारचक्र चालू होतं.... ओळख पटली अन हसली ती स्वतःशीच...

त्यादिवशी हनुमान जयंतीला भंडाऱ्यात दिसली पायघोळ साडीत अन आज दिसतेय इफ्तारी सोडण्यासाठी जमलेल्या जाफरभाईच्या रेस्टॉरंट समोर...बुरख्यात...

भुकेला धर्म नसतो... ओळख पटली अन हसली ती स्वतःशीच...

©मयुरी चवाथे-शिंदे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

कल्पना१ Happy

चेहऱ्यावरचा नकाब हटवून जेवता येतं, बुरखा घातलेला असतो.

(कथेचा आशय वेगळा आहे )