लेखाचं शिर्षक पाहून संभ्रमात पडलात ना?
साधारण मार्चच्या मध्यावर मला एके दिवशी विशाल्_कुलकर्णी ची खरड आली की पल्ली येतेय मार्च एन्ड ला तेव्हा पूण्यात गटग करायचा विचार आहे. मी हो म्हणाले खरी पण मनात धास्ती होती की पल्लीला आपण फार नाही ओळखत... मग कसं काय करायचं?
२८ मार्चला सकाळी विशालचा परत फोन आला की उद्या सगळे पुण्यात भेटतोय म्हणून... २९ चं गटग तसं छोटं पण एकदम इन्ट्रोडक्टरी होतं. विशाल, सायली (सौ. विशाल), अज्ञात, मी, पल्ली, श्रावणी आणि विल्लप थोड्या वेळा करीता भेटलो... बाहेर पडलो ते ठरवून की ४ ला एक गटग करायचं. पल्ली तशी फोनवरून वेळोवेळी बर्याच लोकांच्या सम्पर्कात होती. साधारण १/२ तारखेला पल्लीचा फोन की राज्या, लिम्बूला वेळ आहे ४ ला, गटग करूया का? मग जय्यत तयारी सुरू झाली.... ठिकाण तर आम्ही ठरवलं होतं, पल्लीचं घर.... आता कोण कोण येणार याची यादी मग कॉन्टॅक्ट्स सुरू झाले, मेला-मेली, फोना-फोनी... माझ्या फोनला तर उसंतच नव्हती.. मागचा आठवडा हापिसचं काम बाजूला ठेऊन सगळं माबोचंचकाम केलं
शनिवार ४ एप्रिल ला साधारण ६ वाजता पल्लीच्या घरी जमायचं, गप्पा गोष्टी करायच्या ८ च्या पुढे जितके उरतील त्यानी एकत्र जेवायला बाहेर जायचं असं ठरलं.... बेत तर ठरला.. इन्व्हिटेशन चा मेलही पाठवण्यात आला.
गटगचा दिवस उजाडला... मी ४ वाजता येते म्हणून सांगूनही ५ ला पोचले, आणि पोचल्या पोचल्या पल्लीच्या शिव्या खाल्ल्या, माझ्या मागोमाग येऊ घातलेला राज्या माझ्या आधीच तिथे पोहोचला होता...
हळू हळू लोक यायला लागले, माझ्या पाठोपाठ, लिंबू आणि तन्मय (लिम्बूचा मुलगा) आले. इन्व्हिटेशन तर पाठवलंय आता कोण कोण येतंय कोण कोण नाही याचीच धास्ती होती... ऐनवेळी १००% कन्फर्म असलेले काही मेंबर गळाले महत्वाच्या कामामुळे
गेल्यापासून आमच्या तोंडाला आराम नव्हता, नुसती बडबड, खिदळणं सुरूच होतं.... पहील्यांदा भेटलोय असं वाटलंच नाही... अगदी जन्म-जन्मांतरीची ओळख असल्या सारख्या मुली तर एकमेकांना 'ए टवळे' शिवाय हाकसुद्धा मारत नव्हत्या...
मंडळी जमली... मी, पल्ली, राज्या, नयना, लिंबू, तन्मय, अनघावन, कृष्णाजी, सौ वैशाली, (कृष्णाजी ची पत्नी), उमेश कोठीकर, दीपुर्झा, झकास.... सगळे जमले. खाण्याच्या डिशेस मध्ये; आम्ही बाजूला... गप्पा सुरू झाल्या... विनोद... खिदळणे...
गृहकृत्यदक्ष अशा राज्याने सर्वांना त्याच्या हातचा कडक-मस्त्-जबरदस्त चहा पाजला..
नवा मेंबर आत आला कि त्याला पाणी देण्या अगोदरही आम्ही ओळख परेड करायला लावली. म्हणजे आत बसलेल्या माबोकरांपैकी 'कोण' "कोण" आहे ते ओळखायचं. उमेश कोठीकर कोणालाही ओळखू शकला नाही, नयना; लिंबूला आणि राज्याला ओळखू शकली नाही.. मला तर सर्वांनीच ओळखलं... आणि दीपुर्झाने ही सर्वांना ओळखलं.
खरंतर आदल्या दिवशी मी राज्याला समसवर म्हटलं अरे जर का सगळे मुखदुर्बळ निघाले तर करायला काहीतरी अॅक्टिव्हीटी हवी की, काय करूया? मग त्याने असेच नेहमीचे अन्ताक्षरी, वन मिनिट असे (टुकार) खेळ सुचवले होते बॅकप म्हणून... पण त्यांची काही गरजच लागली नाही (सुदैवाने)
एका अत्यंत आवडत्या विषयावर बरीच ऊहापोह झाली
८ वाजता; लवकर निघणार्या मंडळींकरिता आलू पराठा मागवण्यात आला, त्यांनी खाल्ला आणि आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहून घेतलं.. ९ वाजता पराठे खाऊन मंडळी गेली... मग आम्ही उरलेले गप्पा मारत बसलो.... आत्तापर्यंत हलके हलके विषय घेऊन बोललो होतो, मग वयोमानानुसार वास्तववादी विषय निघाले. एक जरूर शिकले की माणूस म्हणून एखाद्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. या गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही... रात्री १२ वाजता आठवण झाली की आपण जेवलेलोच नाही.... ऑर्डर केलेलं जेवण गरम करून जेवायला बसलो.... ते तासभर... जेवणात फार कुणाचं लक्षं च नव्हतं...सगळं लक्ष गप्पांमध्ये. जेवल्यावर काही मंडळी जाऊ लागली पण हायवे वरून जाण्यास इतरांनी विरोधच केला.. मग परत गप्पा रंगल्या.... .... गप्पा मारून सुकलेले घसे पल्लीच्या हातची फॅन्टास्टिक कॉफी पिऊन ओले केले, परत गप्पा पर्व सुरूच.... मग जड वातावरण अजून हलकं होण्यासाठी मी २ गाणी गायली, पल्ली, राज्या तल्लीन होऊन ऐकत होते, आणि झकास माझ्या समोर डोळे मिटून बसला होता, मला वाटलं त्याला झोपंच यायला लागली (माझं गाणं ऐकून) मी गाणं म्हणायचं सोडून जी हसत सुटले....
दिपुर्झा झकास ला खूप ओरडला आणि म्हणाला तू दक्षिच्या मागं जाऊन बस
(किंवा झोप) समोर काय झोपतोस?
राज्या तर रात्री १२ च्या गाडीने गावाला जाणार होता, तो आत्ता निघतो मग निघतो करत तिथेच...
अखेर चक्क उजाडलं, गप्पा संपल्या नव्हत्या... अख्खे १२ तास सम्पले होते. गटग तात्पुरतं संपलं होतं पण मनात अजून सुरूच होतं... पाय निघत नव्हता तरी सर्वजण निघाले.
इथे, ऑनलाईन भेटता भेटता कुणाची ओळख कशी झाली, कधी झाली कधी वाढली ते समजलंच नाही. पल्लीशी तर मी २९ मार्चच्या गटगच्या आधी अर्धा तास आधी पहील्यांदा बोलले होते. पण भेटल्यावर अज्जिबात असं वाटलं नाही की आपण पहील्यांदाच भेटलोय म्हणून... ज्यांना शक्य होतं, शक्य म्हणण्यापेक्षा ईच्छा होती ते आले त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच. विशेष करून लिंबू आणि कृष्णाजी... लिम्बू येईल की नाही याची शाश्वती मला स्वत:ला नव्हती, कृष्णाला सुद्धा मी फोन केला तेव्हा तो ऑफिसातून घरी निघाला होता मग इकडे गटग ला येणार होता, उशिरा का होईना पण त्याने सपत्नीक हजेरी लावली... नयना, अनघावन सुद्धा लांब रहात असूनही, आणि जाण्या-येण्याची गैरसोय असूनही वेळात वेळ काढून आल्या.... उमेश कोठिकरच्या घरी सुरेश वाडकर त्याची वाट पहात बसले होते म्हणून तो ९ ला गेला... आम्हा बाकीच्यांना तर काय उद्योग नव्हतेच...
विशेष कौतुक पल्लीच्या मुलीचं श्रावणीचं.... तशी माझ्याशी तिची बर्यापैकी ओळख झालेली होती.... पण इतर सर्व लोक अनोळखी असूनही ती आमच्यात खूप मिक्स झाली होती... तिच्या वयाचंच काय पण आसपासचं सुद्धा कोणीही नव्हतं (बुद्धिने आम्ही सर्व तिच्यापेक्षाही त्यावेळी लहान होतो :फिदी:) तरिही ती आमच्यात रमली, मध्येच चित्रं काढून स्वत:चं स्वत:ला रमवत होती... पण तिने एकदाही नाराजीचा सुर काढला नाही, अज्जिब्बात त्रास दिला नाही... आमच्या बरोबर बराच उशिर जागी होती.... पल्लीची मुलगी खरंच खूप शहाणी आहे.
लिम्बूचा मुलगा ही माबोकर नसूनही आमच्यात छान रमला, बाबांचं वेगळंच रूप त्याने त्या दिवशी पाहीलं (असेल) लिम्बूने मात्रं सांगितले की त्याला माबोवर सदस्यत्व घेऊ देणार नाही, अन्यथा तो अभ्यास काही करायचा नाही...
रोजच्या त्याच त्यात रोटिनमधून वेगळं काहीतरी करावं असं आपल्याला सर्वांनाच वाटतं पण नक्की काय हा प्रश्न पडतोच.... हे गटग हे त्यावर एक जालिम, रामबाण औषध होतं म्हणा/उत्तर होतं म्हणा.. काहीही म्हणा.
पण....... गटग करावं, आणि असं वेगळं आयुष्य निदान थोड्या वेळाकरिता का होईना जगावं अशी प्रेरणा देणार्या मायबोलीचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे एकदम जोरात आभार...
****************************************************
दक्षिणा
****************************************************
दक्षे,
दक्षे, दीप्या...मुख्य भाग तर कुणी लिहिलाच नाही..
मोबाइल पाण्यात पडल्याचा. ;).. दीप्या काय र ??
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
झक्याकडे
झक्याकडे नेट बंद असल्याने त्याने मला मेलवर वृतांत पाठवला होता, तो मी जसा च्या तसा देत आहे.
मी फक्त पोस्टमन आहे 
यातला प्रत्येक शब्द अन शब्द झक्याचा आहे
१) राज्याने बनवलेला कडक चहा.
२) दक्षिणाचा बोलतानाचा दमदार कोल्हापुरी आवाज आणि तितकाच हळुवार गज़ल म्हणनारा आवाज.
३) दिप्याचा तिसरीकडेच भरकटणे
४) पल्लीचे बहारिन मधील अनुभव कथन , दिप्याचे मन लावुन ऐकणे आणि बाकीच्यानी तिला फ़्लश मारुन सतवणे
५) पल्लीने बनवलेली ( दोनदा) सुपर्डूपर कॉफ़ी
६) पल्ली आणि दक्षिणाने उरकलेलं सगळं काम. त्यामुळे आम्हाला आराम.
७) श्रावनीची धमाल गम्मत जम्मत
८) खिदळने खिदळने आणि खिदळने.
९) दक्षिणाचे लोळुन लोळुन हसने (बेरकी मान्जर ह्या जोकवर) आणि राज्या आनि माझ डस्ट बिन च्या जोकवरचं गडगडाती हसणं
१०) सगळ्यानी मला आणि दिप्याला रात्री २ वाजता जावु न देण्यासठी घातलेली भिती / कहान्या
११) टफ लाईफ चे किस्से आणि पॉझिटीव्ह अप्रोच शिकवनारे अनुभव
१२) पाहिलेला गरमागरम पराठा :ड
१३) खाल्लेले जेवन
१४) पल्लीच्या स्टॉक मधील बेसन लाडु आणि करन्ज्याचा उडालेला धुव्वा.
१५) दारु, सिगारेट , बिडी, कॉलेज, आवडलेल्या मुली ह्यावरील चर्चा (ती देखील मी आणि दिप्या ह्यासारख्या पापभिरु माणसानी केलेली)
१६) दक्षिना, मी आनि राज्याची पॅशन वरील चर्चा.
१७) शेवटी निघताना गवसला निखळ आनन्द.
कॉलेजनंतर असा ग्रुप जमन्याची पहिलीच वेल. अगदी रात्रभर गप्पा मारुन मॅरेथॉन ग़ ट ग़ पार करुन घरी गेलो तरी फ़्रेशच वाटत होतं ग्रेट. आतापर्यन्त अटेन्ड केलेल्या ग ट ग मधील हे निर्विवाद सर्वोत्क्रुश्ट ग ट ग.
दोन तास बसुन परत यायच्या तयारीने गेलोलो मी आनि दिप्या सकाळी ६ वाजेपर्यन्त गप्पा ठोकत बसलो सगळ्यांशी, जनु काहि आम्ही ह्याना अनेक जन्म ओळखत आहे.
************
To get something you never had, you have to do something you never did.
भो आ क फ >>>>>>
भो आ क फ >>>>>>

दक्षे
************
To get something you never had, you have to do something you never did.
खूप छान -
खूप छान - वर्णन आणी ग ट ग दोन्हीही.
राज्या,
राज्या, तोंड पाडू नकोस... डोण्ट यू वरी.. मै हू ना..
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
दक्षे,
दक्षे, मस्त लिहिलयस
ओळख परेड आवडली 
~~~
कट्टे की लली, ना पुणे की, ना मुंबई की
डोण्ट यू
डोण्ट यू वरी.. मै हू ना.. >>> म्हणुनच तो काळजी करतोय
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
कशाला
कशाला टाकलास गं दक्षे हा वृत्तांत...
आम्हाला खिजवायला
____________________________________________
कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !!
खिज लेका,
खिज लेका, तुला यायला काय झालं होतं मग

तू तर आला नाहीसच, सायलीला ही पाठवलं नाहीस...
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
खिज लेका>>>>
खिज लेका>>>> हा हा हा हा....
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
अरे
अरे वा.........धम्माल केलेली दिसतेय तुम्ही तर.......
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
वा काय मजा
वा काय मजा आली असेल! नाईट आउट म्हणजे धमालच !
जळवा लेको !!
मस्तच. काय
मस्तच. काय ऐश केलीय सगळ्यांनी. ए.. मी पण.. मी पण... अजून २-३ महिण्यांनी उसगावातून कायमचा पुण्यनगरीत स्थलांतरीत होतोय. तेव्हा पण एखादा असाच धम्माल गटग करुया ना...... दक्ष ने काय वॄतांत टाकलाय... आणि त्यानंतर प्रत्येकाने दिलेली जोड.. वाह.. पूर्ण दृष्य जसंच्या तसं तरळलं डोळ्यांसमोर...
जीयो ऽऽ
भरीस
भरीस दक्षेने त्याला "खडा चमचा" की कायसासा क्रायटेरिया सान्गितला
>>>
कोहराम नामक मेहुलकुमारच्या सिनेमात अमिताभ बच्चन ही कन्सेप्ट नाना पाटेकर ला सांगतो....
_______
बात चले कोई यार मिले तो हाथ मिला दे ताली...!!!
कोहराम
कोहराम नामक मेहुलकुमारच्या सिनेमात >>>
अंक्या ;).. कुठुन-कुठिन शोधुन काढतो रे सिनेमे..?
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
दक्षे,दिपू,
दक्षे,दिपू,झकास व्रुत्तांत.वाचून मजाही आली आणि मिसल्याची हळहळही वाटली.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
पुण्याच्य
पुण्याच्या गटग मध्ये हेरगिरी करावं असं काहीही घडलं नाही. >>>
हे हे हे...फक्त दीप्याच्या मोबाइल ची गोष्ट सोडली तर
कट्टा आणि पुण्यात झालेल्या परवाच्या गटगचं वैशिष्ट्यंच हे आहे की आम्ही सर्वांना सामावून घेतो, सर्वांचं स्वागत करतो.
>>> तुला माबोच्या भाषेत १००००० मोदक..
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
मजा केलीत.
मजा केलीत. पल्लीला भेटायची इच्छा होती. आता पुढल्या वेळेस..
दक्शे, मला खास तुझ गाण ऐकायची खूप इच्छा आहे. पुढल्या वेळेस मी खास त्याकरता येणार. आणि तुझ्यासमोर अर्धोन्मिलित झक्कासला पहायची ही तेवढीच जबरदस्त इच्छा आहे तेंव्हा तो तुझ्या समोर हवाच.. अर्धे डोळे मिटून..
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
लोकहो,
लोकहो, पुणे-झक्की संमेलन आणि हे संमेलन - दोन्ही वृत्तांत वाचल्यावर बरीच धमाल केलीतसं दिसतंय.
मी स्वतः या दोन्ही संमेलनांना उपस्थित नसतानाही या दोन्ही संमेलनांच्या वृत्तांतांनी मला आनंद दिला. तो आनंद इतरांनाही होत असणार.
------------------------------------
It's good that you can laugh at yourself.
फोटोंबद्द
फोटोंबद्दल धन्यवाद, कविता..

तुमच्या दोन्ही मेल्स मिळाल्या.
सैफ आणि करिना ही होते तर गटग ला
---------------------------------
देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी
होय रे
होय रे किरू कोरम साठी त्यांचा स्पेशल गेस्ट अॅपिअरन्स होता
-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035
http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अॅड बघा.
Donate Eye - Bring Light to Blind
GTG चा
GTG चा व्रुतान्त लिहण्या इतपत वेळ मी नाही व्यतित करु शकलो पण जो काही वेळ घालविला तो काही ज्ञानात अमाप भर घालणार्या अर्थपुर्ण चर्चांनी सत्कारणी लागला!

दक्षिणा, दिपु, राज्या, आणि बारा पिंपळावरचा मुंजा (एकच वेळी बर्याच GTG हजेरी लावतो म्हणून) लिम्बु आदी सार्यांचा व्रुतांत छान!
मला केवळ तास सव्वातास सर्वांसोबत मिळाला पण छान झाला एकंदरीत GTG,
संयोजिकांचे अभार मानायलाच हवे!
आणि आता सर्वांना कळाले होते की नव्हते ह्यावर साधक बाध चर्चा करण्या ऐवजी एक छानसा जम्बो GTG ठरवा पाहू! ( ह्या संयोजनाची जबाबदारी लिंबुने आपल्या शिरावर घेण्यास हरकत नसावी कुणाची!
)
तरी
तरी म्हंटलं पल्ली हल्ली दिसत का नाही..? बरच सोसलं बिचारिने. तुमचा कुणाचा फोन तिने उचललाच तर तिची खबरबात घ्या बरे.. बिच्चारी..
दक्षे? तू गझल म्हणतेस? आणि मग लोक झोपतात? वाह....
गप ए सत्या,
गप ए सत्या, पल्लीच्या साबा सध्या अजारी आहेत त्यामुळे ती माबोवर येत नाहीए. नाहीतर मी रोज तिची खबरबात घेतेच आहे.
तु नकोस काळजी करू इतकी... तिची..
>>दक्षे? तू गझल म्हणतेस? आणि मग लोक झोपतात? वाह...>> बघ की रे..
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
LOL
LOL किस्ना,
पण तुला आठवत असेल आपल्या जीटीजीतले, तर मी उल्लेख केला होता बघ तेव्हा कि, गेल्या वर्षीच मी लिम्बीच्या गावाला "ग्यारण्टेड पावसात" जायचे असे बहुतेक सर्व बीबीन्वर पुकारत होतो, काहीच प्रतिसादच मिळाला नाही म्हणून मग माझा उत्साह मावळला! (शिवाय त्यावेळेस माझी परिस्थिती देखिल जाम हलाखीची होती!) पण असो!
आता जुलै चा ववि जवळ आलाय, तो होऊन जाऊदे, मी ऑक्टोम्बर्/नोव्हेम्बरचे बघतो
तेव्हा कस? सगळिकडे हिरवळ असेल, लिम्बिच्या गावाकडची पेरणी-लावणि इत्यादी उरकले असेल
पाऊसही थोडा कमी होऊन हवेत सगळीकडे शीतल गारवा असेल
अन तरीही ओढेनाल्यान्ना पाणि असेल डुम्बायला
शिवाय, पहिल्या पावसामुळे पाणि भरल्याने आपापल्या बीळातुन बाहेर पडलेले लाम्बटे पुन्हा नव्याने बीळात घुसुन गायब झालेले अस्तील!
येऊन जाऊन, सीझनला मस्त खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेले खेकडे मात्र बीळातुन बाहेर पडुन पायात कडमडतिल अन त्यान्च्या रिकाम्या बिळात लाम्बट्यान्नी अतिक्रमण केलेले असेल
दिवाळि होऊन गेल्यामुळे बोनसमुळे बहुतेकान्चे खिसे गरम अस्तील
अन अशा वातावरणात मग आपण ठरवू, कसे?
किशोर मी
किशोर मी पण तुझा निषेध करतोय... वृत्तांत न लिहिल्या बद्दल >>>>
इन्दरदेवा, का असा पामरावर अन्याय करताव!!
मी १ तासच जेवढं एन्जोय केलं त्याचा तपशील बारा तासाच्या व्रुतान्तात आलाच आहे!
हं लिंब्या
हं लिंब्या काय म्हणतोस ते तू?
..... इति लेखनसीमा... >> ती तर लिंब्याची पळवाट आहे...
हा घ्या
हा घ्या माझा वृत्तांत...
३ एप्रिल ला दक्षिणाचा फोन आला की ४ तारखेला गटग आहे;येणारेस का? नाही म्हणणयाचा प्रश्नच नव्हता.फक्त रात्री लवकर परत जायचे होते. मा बो वरील सर्व मित्रमंडळी भेटणार म्हणून उत्सुकता वाटत होती. पल्लीबाईंना फोन करून करून कंटाळलो पण ढिम्म. शेवटी कार्यवाहक दक्स ने सगळी महिती पुरविली.जसे कोठे,कधी वगैरे. मी विचारले कोण कोण येणार तर शिष्टासारखी म्हणते कशी"तेथे येऊनच बघ!" ६ वाजता पोचायचे होते पण उशीर झाला. मी पल्लीच्या घरी पोचलो तर दार आतून बंद होते आतून. मी बेल वाजवली तर पल्लीच आली समोर.दुधवाल्याला किंवा पेपरवाल्याला जास्त वेळ उभा राहिला की आपण ज्या नजरेने बघतो तसे बघत म्हणते"येस?" धीर गोळा करून ती नजर टाळत स्वत:चे नाम आठवत म्हटले"मी उमेश" लगेच पल्लीचा चेहरा हसरा झाला आणि दार उघडले एकदाचे! आत अनोळखी मंडळी खाली ऐसपैस गाद्यांवर बसली होती.मला अनोळखी बघून हे कोणते नवीन जनावर आले कंपूत असे सगळे माझ्याकडे बघत होते. मी पण बसून घेतले ऐसपैस्.ओळख वगैरे होऊ लागली. लिंबुटिंबु ला बघून मनातली आयुष्यात एकदा तरी डब्लू डब्लू एफ खेळायची उर्मी परत जागी झाली(त्यांच्यांशी मा बो वर झडलेल्या मागच्या सलामीमुळे).पण त्यांचे वय आणि एट अॅब पॅक्स बघता विचार टाळला.मा बो मुळे क्रांती पेक्षा शांती श्रेष्ठ हे गटग मुळे पटले. कबुतरे सोडून शांती पसरत नाही हे लिंबुटिंबु चे म्हणणे ही पटले.सोबत आणलेली चॉकलेट्स लिंबुदांनी कबुतरे सोबत आणलेली नसल्यामुळे आम्हीच वाटून घेतली.दक्षिणा लग्नाघरच्या पोक्त बाईसारखी सगळ्यांना काय हवे नको ते बघत वावरत होती......पल्ली यजमान आणि अध्यक्षस्थान ग्रहण करून आम्हालाही बोलायची संधी देत होती. कृष्णाजी थाटात आले आणि लगेच ऐसपैस मांडी मारत मी बसलेली गादी चराचर व्यापून उरले.तरीही मी नेटाने बसायची एक बाजू लावून धरली होती.
......दिपूर्झा .झकास, कृष्णाजी,राज्या, अनघा,नयना,कृष्णाजींच्या पत्नी धमाल उडवीत होते. राज्याची आणि दक्षिणाची जुगलबंदी तर झकासच सुरू होती. राज्या हसत हसत दर मिनिटाला दक्स कडून मनातल्या मनात कळवळत जोरकस टाळ्या घेत होता.(बिचारा वर्षभर तरी उजव्या हाताने काहीच करू शकणार नाही आता)दिपूर्झा मध्येच बारीकमधे मस्त टपल्या मारीत होता. झकास तर मस्तपणे मजा घेत होता सगळ्यांची. मधेच राज्या विचारतोय दक्स ला"म्हणजे तुला काय वाटतं माझ्या डोक्यात मेंदू आहे?" हा हा हा्असण्याचा गडगडाट नुसता.कोट्यावर कोट्या सुरू नुसत्या.
.................मधेच पल्लीबाईंनी बहारीन येथे नोकरीचे महत्व या विषयावर क्लास सुरू केला.शंकासमाधान झाले.दिपूर्झाने पण सांगितले की त्याच्या गोल ब्लॅडर चे ऑपरेशन झाले होते..तेंव्हा बिचारा तीन दिवस पाण्यावाचून राहिला होता.ब्लॅडर गोल असते हे मला प्रथमच कळले.मध्येच मा बो वरील कंपूबाजी आहे की नाही यावर पण चर्चा झडली. एकंदरीत धमाल सुरू होती.मोबाईल पडली,जाग आली काय काय विनोद! नयना आणि अनघा पण मज्जा करीत होत्या.दक्स तर नुसती धमाल्.आलू पराठे मस्त चट्टामट्टा केले.फोटो काढायची तर धूमधाम सुरू होती.पल्लीचे पिल्लू फारच गोड आहे.तिची नुसती मस्ती सुरू होती.आयुष्यात प्रथमच स्वावलंबाने खायच्या डीश स्वतः नेवून ठेवल्या.भांडी घासायचे स्वावलंबन शिकायची मात्र संधी पल्लीने नाही दिली.नाहीतर उकिडवे बसलेला भांडी घासतांनाचा फोटो मा बो वर येतो की काय याने जीव धास्तावला असता.
मला,नयनाला,अनघाला आणि कृष्णाजींना लवकर जायचे होते म्हणून आम्ही निघालो. जेवण्याचे काँट्रीब्यूशन द्यायच्या वेळी कॉलेजचे दिवस आठवले.रात्री दक्स ला फोन केला पण नो रिप्लाय्.मग तिने सांगितले की ते इतके लोळत चतुष्पाद हसत होते की माझ्या द्विपाद फोनच्या बोलण्याचे त्यांना अवाजच नाही गेले. रात्री दक्स ने लोकांना गझल म्हणून झोपविले हे ही कळले.कायमचे झोपणार नव्हतेच कारण सकाळी सगळ्यांना जायचे होते.
एकंदरीत मज्जा आली.त्या गटग च्या रात्रीत अजूनही जीव घोटाळतो आहे!!
>>>> ती तर
>>>> ती तर लिंब्याची पळवाट आहे...
गप्पे इन्द्रा, साला शेवटी ज्या रन्गाचा चष्मा घातला तसेच दिसणार!
लेका, ती पळवाट नसुन "समोरच्या पार्टीला" मुद्दा मान्डायला दिलेली "सन्धी" अस्ते!
उमेश, लिखाण
उमेश,
लिखाण करताना डावीकडे समास सोडावा, परिच्छेद पाडावा असलं काही शिकलायंस की नाही?
----------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/7028 - वृतांत पुणे गटग
----------------------------------------------------
Pages